कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सातारा – पश्‍चिम महाराष्ट्रात २३ मे या दिवशी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. ‘रिश्टर स्केल’वर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. कोयना धरणापासून १० किलोमीटरच्या परिसरातील भागामध्ये हा सौम्य धक्का जाणवला. यात अद्याप कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झालेली नसल्याची माहिती पाटण महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment