पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्ववाद्यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

रामनाथी आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय

१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन झाले. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली. त्यांनी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत

नवी मुंबई येथील डेली न्यूज बॅण्ड या दैनिकाचे संपादक श्री. दिनेश कामत यांची रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट !

नवी मुंबईतून प्रकाशित होणारे डेली न्यूज बॅण्ड या इंग्रजी दैनिकाचे संपादक श्री. दिनेश कामत यांनी नुकतीच गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमाला सहपरिवार सदिच्छा भेट दिली.

पुणे येथील हिंदुत्वनिष्ठ आनंद दवे यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट !

     रामनाथी, गोवा – येथील सनातनच्या आश्रमाला, पुणे येथील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आणि शिवसेनेचे शहर संघटक श्री. आनंद दवे यांनी १९ मे या दिवशी भेट दिली. आश्रमभेटीच्या वेळी त्यांनी आश्रमातील विविध विभागांत चाललेले राष्ट्र आणि धर्म विषयक कार्य जाणून घेतले…

पिंपरी-चिंचवड येथील भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस श्री. विलासभाऊ मडिगेरी यांची देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला भेट

पनवेल – पिंपरी-चिंचवड येथील भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस श्री. विलासभाऊ मडिगेरी यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी श्री. मडिगेरी यांच्या समवेत त्यांचे सहकारीही उपस्थित होते. आश्रमातील साधक श्री. शशांक जोशी यांनी त्यांना आश्रमात चालणार्‍या सेवांविषयी अवगत केले. हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर यांनी त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली…

शनिशिंगणापूर येथील माजी महिला सरपंचांची देवद (पनवेल) येथील आश्रमाला भेट !

श्री शनिशिंगणापूरच्या माजी सरपंच सौ. पुष्पाताई बानकर आणि सौ. कमलाबाई साबळे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला ११ एप्रिलच्या रात्री सदिच्छा भेट दिली.

शिवसेनेचे नेते खासदार श्री. संजय राऊत यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

शिवसेनेचे नेते आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार श्री. संजय राऊत यांनी १२ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

दैनिक गोमन्तकचे संपादक श्री. श्रीराम पचिंद्रे यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

गोव्यातील दैनिक गोमन्तकचे निवासी संपादक श्री. श्रीराम पचिंद्रे यांनी २१ फेब्रुवारीला सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट दिली.

हिंदुत्ववादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

हिंदुत्ववादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांनी नुकतीच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.