रामनाथी, गोवा – येथील सनातनच्या आश्रमाला, पुणे येथील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आणि शिवसेनेचे शहर संघटक श्री. आनंद दवे यांनी १९ मे या दिवशी भेट दिली. आश्रमभेटीच्या वेळी त्यांनी आश्रमातील विविध विभागांत चाललेले राष्ट्र आणि धर्म विषयक कार्य जाणून घेतले. या वेळी श्री. प्रशांत कोयंडे यांनी त्यांना आश्रमाविषयी माहिती दिली.
श्री. आनंद दवे विविध वृत्तवाहिन्यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रांत हिंदुत्वाची बाजू ठामपणे मांडतात. तसेच हिंदुद्रोही चित्रपटांच्या विरोधातील कायदेशीर प्रक्रियेत साहाय्य करतात. ते दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार आहेत.

समाजातील रज-तमाच्या
वातावरणात रहाणार्या तरुण पिढीने सनातनच्या
आश्रमातील साधकांचा आदर्श घेणे आवश्यक ! – श्री. आनंद दवे
आश्रमभेटीच्या वेळी घरादाराचा त्याग करून आश्रमात आलेल्या साधकांची सेवावृत्ती पाहून समाजातील रज-तमाच्या वातावरणात रहाणार्या तरुण पिढीने सनातनच्या आश्रमातील साधकांचा आदर्श घेणे आवश्यक असल्याचे मत श्री. आनंद दवे यांनी व्यक्त केले. ही भेट अविस्मरणीय असून आश्रमाला सहकुटुंब भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !