भूक न लागणे (Loss of Appetite) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

२प्रत्‍यक्ष आजारांवर स्‍वउपचार चालू करण्‍यापूर्वी ‘‘होमिओपॅथी स्‍वउपचाराविषयीची मार्गदर्शक सूत्रे आणि प्रत्‍यक्ष औषध कसे निवडायचे ?’, याविषयीची माहिती वाचकांनी आधी वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !

संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ या आगामी ग्रंथातील निवडक भाग प्रत्येक शुक्रवारी लेखाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी स्वउपचार करण्याच्या दृष्टीने साधक, वाचक, राष्ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख आपत्काळाच्या दृष्टीने संग्रही ठेवावेत. आपत्काळात डॉक्टर, वैद्य कुणीही उपलब्ध नसतील, त्या वेळी ही लेखमाला वाचून स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील.

डॉ. अजित भरमगुडे

काही वेळा कोणताही आजार नसतांनाही भूक मंदावते किंवा लागत नाही, उदा. वयोमानपरत्वे, शोक, शिसारी आणणारी दृश्ये किंवा दुर्गंध समोर असणे, ताण इत्यादी. प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स), रासायनिक संयुगे वापरून केलेला कॅन्सर विरोधी उपचार (किमोथेरपी) इत्यादी मुळेही भूक मंदावू शकते. अशा वेळी केवळ २-३ वेळा अन्नग्रहण करण्याऐवजी रुचेल आणि पचेल तसा छोट्या प्रमाणात आहार अनेकदा घेणे उपयुक्त असते. २ आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी भूक मंद असेल, तर उपचार करणे आवश्यक ठरते. भूक मंदावणे किंवा न लागणे या लक्षणाच्या व्यतिरिक्त कोणती वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असली की ते औषध घ्यावे, हे औषधांच्या नावापुढे दिले आहे.

१. अल्फाल्फा (Alfalfa)

१ अ. हे औषध पोषणावर सकारात्मक प्रभाव करते – या औषधामुळे भूक वाढते, तसेच पचनक्रिया सुधारते, त्यामुळे रुग्णाचे शारिरीक आणि मानसिक बळ, तसेच वजन वाढते.

१ आ. हे औषध कुपोषणाशी संबंधित मज्जातंतू-क्षीणता (Neurasthenia), निद्रानाश, मानसिक कारणांमुळे होणारे अपचन, या आजारांसाठी उपयुक्त असते.

डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

२. चायना ऑफिसिनॅलिस (China Officinalis)

२ अ. पोटामध्ये गच्चपणा जाणवून खाणे-पिणे नकोसे होणे

२ आ. अन्नाची चव पुष्कळ खारट लागणे

२ इ. काहीही खाण्याची किंवा पिण्याची इच्छा नसणे, सर्व प्रकारच्या आहाराबद्दल उदासीनता असणे

२ ई. पुष्कळ प्रमाणात चहा पिण्यामुळे भूक न लागणे, फळे खाण्याने व्याधी वाढणे

३. र्‍हस टॉक्सिकोडेंड्रॉन (Rhus Toxicodendron)

३ अ. पुष्कळ तहान लागणे; परंतु काहीही खाण्याची इच्छा नसणे

३ आ. तोंडाला कडू चव येऊन मळमळणे

३ इ. खाल्ल्यानंतर पोट गच्च होऊन चक्कर येणे

३ ई. दूध पिण्याची इच्छा होणे

३ उ. खाल्ल्यानंतर गुंगी येणे

४. कोल्चिकम् ऑटम्नाले (Colchicum Autumnale)

अन्नाकडे पाहिले असता भूक मरणे

५. सोरिनम् (Psorinum)

गंभीर आजारानंतर भूक न लागणे

Leave a Comment