कीटक किंवा प्राणी यांनी दंश करणे / चावणे यावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

प्रत्‍यक्ष आजारांवर स्‍वउपचार चालू करण्‍यापूर्वी ‘होमिओपॅथी स्‍वउपचाराविषयीची मार्गदर्शक सूत्रे आणि प्रत्‍यक्ष औषध कसे निवडायचे ?’, याविषयीची माहिती वाचकांनी आधी वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !

संकलक : डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

पोषण मिळवण्याच्या हेतूने एखादा कीटक किंवा प्राणी याने आपल्या तोंडाने व्यक्तीच्या त्वचेचा चावा घेणे याला ‘चावणे’, असे म्हणतात. विषाचे रोपण करण्याच्या हेतूने एखादा कीटक किंवा प्राणी याने तोंडाच्या व्यतिरिक्त आपल्या शरिराचा अन्य भाग वापरून केलेल्या कृतीला ‘दंश’, असे म्हणतात. कीटक किंवा प्राणी यांनी चावल्यानंतर किंवा दंश केल्यानंतर ‘संबंधित भागाला सूज येणे, तेथील त्वचा लालसर होणे किंवा तेथे पुरळ उठणे, वेदना होणे, खाज सुटणे, त्या भागात उष्णता जाणवणे, बधीरता जाणवणे किंवा मुंग्या आल्यासारखे वाटणे’, अशी लक्षणे दिसतात.

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता

कीटक चावल्यास किंवा दंश केल्यास रुग्णाला कीटकापासून सुरक्षित ठिकाणी हलवावे. व्यक्तीच्या त्वचेत डांग्या आढळल्यास त्या काढाव्या. तेथील त्वचा हळूवारपणे साबण आणि पाण्याने धुऊन घ्यावी. तेथील त्वचेवर १०-१२ मिनिटे बर्फ किंवा थंडगार पाणी लावावे.

सर्पदंश झालेल्या किंवा विंचवाने चावलेल्या रुग्णाला बसवावे किंवा झोपवावे. त्याला शांत करावे. दंश केलेला भाग पेनाने आखून घ्यावा, तसेच दंश केल्याची नेमकी वेळ नोंद करून ठेवावी. दंश करणारा सर्प किंवा विंचू याचे छायाचित्र सुरक्षित अंतरावरून घ्यावे. यावरून त्याच्या जातीची नेमकी ओळख पटून त्यानुसार योग्य ते वैद्यकीय उपाय करणे शक्य होते. दंश झालेल्या भागाला जखम करून तेथील रक्त वाहू देणे, त्या भागाच्या अलीकडे घट्ट बांधणे, त्या भागातील विष तोंडाने शोषून घेणे  किंवा दंश झालेल्या भागावर बर्फ लावणे. सर्पाची जात कळली नसेल, तर प्रत्येक सर्पदंश विषारीच आहे, असे समजून त्यानुसार वैद्यकीय साहाय्य घ्यावे.

स्वउपचार करायची वेळ आल्यास, कोणती वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असली की, ते औषध घ्यावे, हे औषधांच्या नावापुढे दिले आहे.

१. डास चावणे

डॉ. अजित भरमगुडे

१ अ. स्टाफीसाग्रिया (Staphysagria)

२. ढेकूण चावणे

२ अ. हायपेरिकम् पर्फाेरेटम् (Hypericum Perforatum)

३. मधमाशी किंवा गांधीलमाशी चावणे

३ अ. अर्टिका युरेन्स (Urtica Urens) : चावा घेतल्यावर त्वरित हे औषध द्यावे.

३ आ. आर्निका मोन्टाना (Arnica Montana) : चावा घेतलेल्या ठिकाणी या औषधाचा मूल अर्क लावला असता सूज आणि वेदना २ घंट्यांमध्ये अल्प होतात.

३ इ. एपिस मेलिफिका (Apis Mellifica) : दंशामुळे सूज येऊन आग होत असेल, तसेच सुई टोचल्याप्रमाणे वेदना होत असतील आणि सूज आलेल्या जागी बर्फ लावला असता बरे वाटत असेल, तर हे औषध द्यावे.

३ ई. आर्सेनिकम् आल्बम् (Arsenicum Album) : आगीने पोळल्याप्रमाणे वेदना होत असतील, अतिशय अस्वस्थता असेल, पुष्कळ तहान लागत असेल आणि रुग्ण घाबरलेला असेल, तर हे औषध द्यावे.

३ उ. ॲसेटिकम् ॲसिडम् (Aceticum Acidum) : दंशामुळे होणारे ताप, दमा, इ. दुष्परिणाम टाळण्यासाठी हे औषध उपयुक्त आहे.

४. जळू चावणे

डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

४ अ. लॅचेसिस म्युटस (Lachesis Mutus)

५. विंचू चावणे

५ अ. लेडम पालुस्त्रे (Ledum Palustre) : विंचू चावताच हे औषध द्यावे.

५ आ. हायपेरिकम् पर्फाेरेटम् (Hypericum Perforatum) : विंचू चावल्यानंतर तीव्र वेदना होत असल्यास हे औषध द्यावे.

६. सर्पदंश

६ अ. आर्निका मोन्टाना (Arnica Montana) : सर्प चावलेल्या ठिकाणी सूज येऊन तो भाग काळानिळा पडतो आणि वेदना होतात. अशा वेळी हे औषध दर २ घंट्यांनी द्यावे, तसेच २ चमचे औषध एक कप पाण्यात टाकून ते दंश केलेल्या ठिकाणी सतत लावत रहावे.

६ आ. आर्सेनिकम् आल्बम् (Arsenicum Album) : ह्रदयाकडे जाणार्‍या असह्य वेदना होऊन पुष्कळ थकवा येणे, दंश केलेली जागा सुजून उलटी होणे, अशी लक्षणे असल्यास हे औषध दर अर्ध्या घंट्याने देणे.

६ इ. अमोनियम कार्बाेनिकम् (Ammonium Carbonicum) : सर्पदंशानंतर जर जखमेतून सतत काळ्या रंगाचे रक्त वहात असेल, तर हे औषध उपयुक्त ठरते.

६ ई. एकिनेशिया एंगस्टिफोलिया (Echinacea Angustifolia) : सर्प दंशामुळे अशक्तपणा येणे, अंग दुखणे, बोलणे मंदावणे, अशी लक्षणे दिसल्यास या औषधाच्या मूल अर्काचे १० थेंब दर ५ मिनिटांनी पाण्यातून द्यावे.

(टीप : कोणतेही विषारी किटक चावले असता हे औषध गुणकारी आहे.)

६ उ. नाजा ट्रिपुडियन्स (Naja Tripudians) :  दर १० मिनिटांनी या औषधाच्या मूल अर्काचे ५ थेंब जीभेवर सोडणे

७. उंदीर, कुत्रा, मांजर चावणे

७ अ. लेडम पालुस्त्रे (Ledum Palustre) : वरीलपैकी कोणताही प्राणी चावला असता हे औषध घ्यावे. हे धनुर्वात प्रतिबंधक असून यामुळे जखम दूषित (septic) होत नाही आणि वेदनाही त्वरित न्यून होतात. हे औषध पोटातून देण्याबरोबरच चावा घेतलेल्या जागेवरही लावावे.

७ आ. कॅलेंडुला (Calendula) : कुत्रा आणि मांजर चावले असता या औषधाचा मूल अर्क चावा घेतलेल्या जागेवर लावावा.

७ इ. हायड्रोफोबिनम (Hydrophobinum) : पिसाळलेला कुत्रा चावणे

हे औषध लिस्सीनम (Lyssinum) या नावानेही ओळखले जाते.

Leave a Comment