पाठदुखी (Backache) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्‍य आजारांना वा अन्‍य कोणत्‍याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्‍ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्‍ठता, आम्‍लपित्त अशा विविध आजारांवर घरच्‍या घरी उपचार करता यावेत, या दृष्‍टीने होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे.

प्रत्‍यक्ष आजारांवर स्‍वउपचार चालू करण्‍यापूर्वी ‘‘होमिओपॅथी स्‍वउपचाराविषयीची मार्गदर्शक सूत्रे आणि प्रत्‍यक्ष औषध कसे निवडायचे ?’, याविषयीची माहिती वाचकांनी आधी वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !

संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे आणि डॉ. अजित भरमगुडे

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता

पाठीमध्‍ये मंद ते तीव्र वेदना होणे याला ‘पाठदुखी’, असे म्‍हणतात. काही वेळा या वेदना पायाच्‍या दिशेने पसरतात. या वेदना पडल्‍यामुळे झालेली दुखापत, जड वजन उचलणे, वयोमानपरत्‍वे किंवा मणक्‍यातील चकतीची झालेली झीज, इत्‍यादी यांमुळे होऊ शकतात. पाठदुखी होत असतांना प्रदीर्घ काळ बसणे, जड वजन उचलणे टाळावे. योगासने, व्‍यायाम, शरिराची ढब (posture) योग्‍य करणे, मालिश करणे यांनीही लाभ होतो. पाठदुखी या लक्षणाच्‍या व्‍यतिरिक्‍त कोणती वैशिष्‍ट्यपूर्ण लक्षणे असली की, ते औषध घ्‍यावे, हे औषधांच्‍या नावापुढे दिले आहे.

१. आर्निका मोन्‍टाना (Arnica Montana)

१ अ. आघातजन्‍य इजा (traumatic injuries) किंवा अति श्रमामुळेे पाठ दुखणे

१ आ. पाठीचा भाग दुखरा, लुळा, ठेच लागल्‍याप्रमाणे जाणवणे

१ इ. ज्‍या-ज्‍या जागेवर म्‍हणून झोपायला जावे ती-ती जागा अति कठीण भासणे

१ ई. प्रतिदिन वापरत असलेले मऊ अंथरूण; शरिराला स्‍पर्श होईल तेथे टणक लागल्‍याने कुठेही टेकवत नाही. कुठेतरी मऊ जागा/मऊपणा सापडेल, या शोधात अस्‍वस्‍थपणे सारखी जागा पालटत रहाणे

डॉ. अजित भरमगुडे

२. काली कार्बोनिकम् (Kali Carbonicum)

२ अ. पाठीमध्‍ये टोचल्‍याप्रमाणे तीव्र वेदना होणे

२ आ. पाठ मोडल्‍यासारखे जाणवणे

२ इ. पाठीमध्‍ये अशक्‍तपणा जाणवणे

२ ई. पडून राहिल्‍याने किंवा विश्रांती घेतल्‍याने वेदना अधिक होणे

२ उ. चालल्‍याने किंवा हालचाल केल्‍याने बरे वाटणे

२ ऊ. गर्भार स्‍त्रियांमध्‍ये किंवा गर्भपात झाल्‍यानंतर पाठ दुखणे

३. र्‍हस टॉक्‍सिकोडेंड्रॉन (Rhus Toxicodendron)

३ अ. अवघड वजनदार वस्‍तू उचलल्‍याने उसण भरणे, पावसामध्‍ये भिजणे, दमट कपडे घालून किंवा दमट अंथरूणावर झोपणे, यांमुळे पाठ दुखणे

३ आ. पाठीत ताठरता, ठेच लागल्‍याप्रमाणे आणि दाह जाणवणे

३ इ. हालचाल केल्‍यानंतर वेदना न्‍यून होणे

डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

४. ब्रायोनिया अल्‍बा (Bryonia Alba)

४ अ. पाठीमध्‍ये टोचल्‍याप्रमाणे वेदना होणे

४ आ. हालचाल केल्‍याने वेदना वाढणे

४ इ. दाब दिल्‍याने आणि पूर्ण विश्रांती घेतल्‍यानंतर वेदना न्‍यून होणे

५. बर्बेरिस् व्‍हल्‍गॅरिस् (Berberis Vulgaris)

५ अ. लघवी किंवा गुदाशय यांसंबंधी तक्रारीसह पाठदुखी असल्‍यास उपयुक्‍त

Leave a Comment