मध्यप्रदेशातील देवकरण शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबियांसह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला दिली सदिच्छा भेट !

(डावीकडून) श्री. मनीष मिश्रा, श्री. श्रीवर्धन मिश्रा, श्री. देवकरण शर्मा, अधिवक्ता हर्षवर्धन शर्मा, डॉ. धर्मपाल शर्मा, श्री. कर्मवीर शर्मा, आश्रमदर्शन करतांना अधिवक्ता योगेश जलतारे

रामनाथी (गोवा) – गुरुकुलचे संचालक तथा रामायण-भागवतच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करणारे इंदूर, मध्यप्रदेश येथील श्री. देवकरण शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबियांसह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. श्री. देवकरण शर्मा यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौ. विष्णुदेवी शर्मा, त्यांचे ज्येष्ठ पुत्र मध्यप्रदेशच्या व्यावसायिक कर खात्याचे उपायुक्त डॉ. धर्मपाल शर्मा, कनिष्ठ पुत्र मध्यप्रदेशच्या उच्च शिक्षण विभागाचे आयुक्त श्री. कर्मवीर शर्मा (आय.ए.एस्.), मोठी सून सौ. श्रुती शर्मा, धाकटी सून सौ. अपूर्वा शर्मा, जावई श्री. मनीष मिश्रा, मुलगी सौ. माधुरी मिश्रा, नातू अधिवक्ता हर्षवर्धन शर्मा, नातसून सौ. आयुषी शर्मा, नातू श्री. श्रीवर्धन मिश्रा आणि नातवंडे कु. श्रेया मिश्रा, कु. मनस्विनी शर्मा, कु. परांबा शर्मा हे उपस्थित होते.

सनातनचे साधक अधिवक्ता योगेश जलतारे आणि साधिका सौ. गौरी आफळे यांनी त्यांना आश्रम दाखवून आश्रमात चालणार्‍या कार्याविषयी माहिती दिली. आश्रम पाहून सर्वांनी मन शांत झाल्याचे आणि आनंद जाणवल्याचे सांगितले. श्री. देवकरण शर्मा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या राष्ट्रीय हिंदु अधिवेशनात सहभागी होतात.

Leave a Comment