
ठाणे – येथे सनातन संस्था द्वारा आयोजित मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील साधकांसाठी ३ दिवसांचे बिंदूदाबन निवासी शिबिर पार पडले. येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतांना विविध शारीरिक विकारांवर बिंदूदाबन पद्धतीने उपचार कसे करावेत, याविषयीचे मार्गदर्शन निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी साधकांना केले. शिबिरामध्ये हाता-पायांवरील बिंदूदाबन यांसह झोप न येणे, डोके दुखणे अशा वेगवेगळ्या त्रासांवर चेहर्यावरील बिंदूदाबन शिकवण्यात आले. वात प्रकृती असलेल्या एखाद्या रुग्णाला मर्दन (मालीश) करण्याचे काही प्रकार शिकवून त्याचा साधकांकडून सरावही घेण्यात आला.
‘वेगवेगळ्या आजारांवर आयुर्वेदाची औषधे किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने घ्यावीत ?’, याचे मार्गदर्शन डॉ. जोशी यांनी केले. या वेळी साधकांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन डॉ. दीपक जोशी यांनी केले. या शिबिराला सद़्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या प्रसंगी त्यांनी ‘बिंदूदाबन ही सेवा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर परिपूर्ण करून श्रीगुरूंची कृपा कशी संपादन करायची ?’, याविषयी मार्गदर्शन केले.
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !