श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मोहिमेसाठी जाणार्‍या धारकर्‍यांना सनातन संस्थेकडून शुभेच्छा !

मोहिमेसाठी रवाना होणार्यात वाहनाची पूजा करतांना सौ. संपदा पाटणकर, तसेच अन्य

सांगली – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्री भीमाशंकर ते श्री शिवनेरी (मार्गे श्री वरसुबाई) अशी होत आहे. या मोहिमेसाठी सांगलीतून धारकरी २८ जानेवारीला रवाना झाले. रवाना होणार्‍या धारकर्‍यांना सनातन संस्थेकडून शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी धारकरी ज्या वाहनातून जाणार, त्या वाहनास हार अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात आले. या प्रसंगी सनातन संस्थेच्या साधिका सौ. संपदा पाटणकर, सौ. शोभा गवळी, श्री. महेश गवळी, सामाजिक कार्यकर्ते श्री. शीतल सदलगे, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. राजू पुजारी, श्री. अनिल तानवडे, तसेच अन्य उपस्थित होते.

भुयेवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. गौतमेश तोरस्कर आणि श्री. अनिकेत कदम यांनी मोहिमेसाठी जाणार्‍या धारकर्‍यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment