वास्तू ज्या भावनेने बांधली असेल, तिच्यात ती भावना निर्माण होते !

Article also available in :

१. ‘श्रीमंत लोक आपल्या श्रीमंतीच्या गर्वाने टोलेजंग घर बांधतात. ते बाहेरून झगमगाट अन् प्रदर्शनीय वाटावे, असे असते. त्यामुळे बाहेरून जाणार्‍या पादचाऱ्यांना मात्र त्यांच्या ऐकिवात असलेल्या वृत्तीमुळे त्याचे वैषम्य वाटते. काहींना त्यांचा हेवा वाटतो. वास्तूसुद्धा ज्या भावनेने बांधली असेल, तिच्यात ती भावना असते आणि ती बाहेर तशी प्रगट होते.

२. देवळाचेही तसेच आहे. आयकर वाचावा, मुलगा व्हावा आणि इतर वासनापूर्ती यांसाठी बांधलेल्या देवळात, ती भावना असल्यामुळे तेथे गेल्यावर आनंद मिळत नाही.

३. बनारस विद्यापिठाजवळ संगमरवरी दगडाचे टोलेजंग शिवमंदिर बांधलेले आहे. त्या ठिकाणी वास्तू प्रदर्शनीय आहे. त्यातील देवाकडे मात्र कोणाचे लक्ष जात नाही आणि तेथे त्या प्रमाणात भक्तीभावाने पूजाही होत नाही. ती केवळ प्रेक्षणीय वास्तू आहे. तीच हेमाडपंथी देवळे, चारीधाम असलेली देवळे सहस्रो वर्षांपासून कार्यरत आहेत आणि लोकांना तेथे गेल्यावर आनंद मिळतो.’

प.पू. पांडे महाराज (दिशाचक्र, पृष्ठ क्र. ९९-१००)
संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment