मुंबई – भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २८ नोव्हेंबर या दिवशी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने हे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे. या वेळी भाजपचे आमदार श्री. मिहीर कोटेचा, महोत्सवाचे मुख्य आयोजक आणि माजी नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे हेही उपस्थित होते. सनातनच्या साधिका सौ. आशा गंगाधरे यांनी श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्ष २०२३ चे ‘सनातन पंचांग’ भेट दिले.
सौ. आशा गंगाधरे यांनी श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने दिली. कोकण विकास आघाडीचे मुंबईचे अध्यक्ष श्री. सुहास आडीवरेकर यांनीही महोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी सनातन ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन सात्त्विक उत्पादने खरेदी केली. मुलुंड सेवा संघ, महिला बचत गट आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !