प्रयोग : छायाचित्र क्र. १ आणि २ या छायाचित्रांकडे २ मिनिटे पाहून काय वाटते ? ते अनुभवा !

प्रयोग : छायाचित्र क्र. १ आणि २ या छायाचित्रांकडे २ मिनिटे पाहून काय वाटते ? ते अनुभवा अन् नंतर उत्तर वाचा.

devi_vastransahit
छायाचित्र क्र. १ : वस्त्र नेसवलेल्या देवीचे छायाचित्र
छायाचित्र क्र. २ वस्त्र न नेसवलेल्या देवीचे छायाचित्र
छायाचित्र क्र. २ वस्त्र न नेसवलेल्या देवीचे छायाचित्र

 

देवतांच्या मूर्तीला वस्त्र न नेसवणे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक योग्य आणि लाभदायी असणे

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात. ऋषिमुनी आणि संत यांना देवतांचा जसा साक्षात्कार झाला, तशी त्यांनी देवतांची वर्णने शास्त्रांत केली आहेत. स्वयंभू मूर्ती, संतांनी स्थापन केलेली मूर्ती आणि शास्त्रानुसार बनवलेली मूर्ती यांमध्ये देवतेचे तत्त्व आकृष्ट अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असते. अशा सात्त्विक मूर्ती पहातांना ती पहाणार्‍याचा अन् भाविकाचा भाव जागृत होतो. मूर्ती सात्त्विक, म्हणजे धर्मशास्त्रानुसार असेल, तर त्या देवतेच्या तत्त्वाचा, मूर्तीतील देवपणाचा लाभ समष्टीला (समाजाला) होतो. तिच्या अस्तित्वाने सार्‍या वायूमंडलाची शुद्धी होते.

विविध तीर्थक्षेत्रांत असणार्‍या मूर्ती या अधिकांश स्वयंभू आणि संतांनी स्थापन केलेल्या असतात. अशा मूर्तींवर अधिक काळापासून षोडशोपचार पूजन झाल्याने त्यांमध्ये देवतातत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट झालेले असते. त्यामुळे पूजकाला आणि भाविकाला देवतेकडे पाहिल्यावर चैतन्याचा अन् सात्त्विकतेचा लाभ होण्याचे प्रमाण अत्याधिक असते.

या ठिकाणी दिलेल्या देवीच्या साडी नेसवलेल्या छायाचित्रापेक्षा तिच्या मूळ रूपाकडे पाहिल्यावर अधिक चांगले वाटते; कारण मूळ रूपामध्ये देवीचे जे असुराला मारलेले रूप आहे, त्याकडे पाहून भाविकामध्ये मारक तत्त्व जागृत होते. मूर्तीला वस्त्र नेसवल्यावर तिच्याकडे पाहिले असता मूर्तीचे मूळ रूप झाकले जाऊन मूर्तीचा केवळ अंशात्मक भागच आपल्याला दिसतो; म्हणून छायाचित्र क्र. १ च्या तुलनेत छायाचित्र क्र. २ कडे पाहून, म्हणजेच वस्त्र न नेसवलेल्या मूर्तीकडे पाहून अधिक चैतन्य जाणवते आणि भाव जागृत होतो.

अनेक जाणकारांच्या मते देवतांच्या मूर्तींना वस्त्र नेसवणे, ही एक प्रथा आहे. या प्रथेला अध्यात्मशास्त्रीय आधार नाही; परंतु एखाद्या संतांनी किंवा उन्नतांनी देवतेच्या मूर्तीला वस्त्र नेसवण्यास सांगितले असल्यास त्यामागे त्यांचा संकल्प असल्याने त्याचा भाविकांना लाभ होऊ शकतो. तसे नसल्यास स्वतःच्या मनाने तशी प्रथा पाडू नये.
– कु. प्रियांका विजय लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (११.९.२०१६)

 

छायाचित्राच्या प्रयोगाचे उत्तर

वर दिलेली दोन्ही छायाचित्रे रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवलेल्या देवीच्या मूर्तीची असून छायाचित्र क्र. १ च्या तुलनेत छायाचित्र क्र. २ कडे पाहिल्यावर पाहून चैतन्य जाणवते आणि भाव जागृत होतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात