दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाला उत्‍साही आणि भावपूर्ण वातावरणात प्रारंभ !

रामनाथी (फोंडा), १२ जून (वार्ता.) – ‘जयतु जयतु हिंदु राष्‍ट्रम्’, ‘हर हर महादेव’, अशा जयघोषात येथील श्री रामनाथ देवस्‍थान, फोंडा, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाला भावपूर्ण आणि उत्‍साही वातावरणात प्रारंभ झाला. हे अधिवेशन १८ जून पर्यंत चालणार असून विविध राज्‍यांतील ४५० प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्‍थित आहेत. अधिवेशनाचा प्रारंभ सनातन पुरोहित पाठशाळेतील श्री. अमर जोशी यांनी केलेल्‍या शंखनादाने झाला. यानंतर सनातन पुरोहित पाठशाळेचे सर्वश्री अमर जोशी आणि ईशान जोशी यांनी वेदमंत्रांचे पठण झाले. त्‍यानंतर हिंदु जनजागृती समितीचे मुंबईचे समन्‍वयक श्री. बळवंत पाठक यांनी श्री. अमर जोशी आणि श्री. ईशान जोशी यांचा सन्‍मान केला.

उपस्‍थित संत आणि मान्‍यवर यांचा सन्‍मान

या प्रसंगी व्‍यासपिठावर उपस्‍थित असलेले स्‍वामी संयुक्‍तानंद महाराज, निर्गुणानंद महाराज तथा सद़्‍गुरु श्री. नवनीतानंद (गुरुवर्य श्री. मोडक) महाराज, पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन आणि सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍या शुभहस्‍ते दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समिती पुरस्‍कृत ‘भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवरील नवे आक्रमण ‘हलाल जिहाद ?’ या मराठी आणि हिंदी भाषेतील ग्रंथाचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले. सोहळ्‍यात सनातनचे संत पू. प्रदीप घेमका यांनी स्‍वामी संयुक्‍तानंद महाराज यांचा सन्‍मान केला, तर निर्गुणानंद महाराज आणि सद़्‍गुरु श्री. नवनीतानंद (गुरुवर्य
श्री. मोडक) महाराज यांचा सन्‍मान हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी, तसेच पू. (अधिवक्‍ता) हरिशंकर जैन यांचा सन्‍मान सनातनचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आला. या प्रसंगी सनातन संस्‍थेचे संस्‍थापक परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी दिलेल्‍या संदेशाचे वाचन सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक संत सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांनी केले.

Leave a Comment