
इंदूर – येथील ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’च्या वतीने १२ आणि १३ मार्च या दिवशी प.पू. रामानंद महाराज यांची पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. १३ मार्च या दिवशी ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक पारमार्थिक सेवा ट्रस्टद्वारे ‘श्री अनंतानंद साईश यांचे शिष्योत्तम प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज’ या सनातनच्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त श्री. अशोक भांड हे या ग्रंथाचे लेखक आहेत. या वेळी डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले, श्री. शरद रामकृष्ण बापट, लेखक आणि भक्त श्री. अशोक काशिनाथ भांड, श्री. राजेंद्र चंद्रकांत भवरासकर आणि अन्य भक्त उपस्थित होते.
प.पू. रामानंद महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने १२ मार्च या दिवशी सकाळी ९.३० ते १०.३० वाजेपर्यंत ‘श्री स्तवन मंजिरी आणि रामानंद बावनी पाठ’, सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत येथील चैतन्य भजनी मंडळाच्या वतीने पंडित राजेश दुबे यांनी आयोजित केलेले ‘श्री सुंदरकाण्ड पाठ’आदी कार्यक्रम झाले.
१३ मार्च या दिवशी सकाळी ९ ते १० या वेळेत ‘श्री स्तवन मंजिरी आणि रामानंद बावनी पाठ’, सकाळी १० ते ११.३० या वेळेत श्री. शरद बापट प्रस्तुत ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ हा चिंतनाचा कार्यक्रम झाला. सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत ‘श्रीं’च्या पादुकांवर रुद्राभिषेक झाला. रात्री ९.३० वाजता पारंपरिक भजनाचा कार्यक्रम झाला.

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !