आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी आपण शोधलेल्या स्थानावर मुद्रा करून न्यास करणे जमत नसल्यास मानस न्यास आणि मुद्रा करा !

आध्यात्मिक स्तरावरील उपायांसंदर्भात साधकांना सूचना !

सद्गुरु राजेंद्र शिंदे

‘सनातनचे संत, ६० टक्क्यांहून अधिक पातळीचे साधक आणि अन्य साधक त्यांना होणार्‍या शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक त्रासांसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणून प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप शोधतात. या पद्धतीनुसार कुंडलिनी शक्तीच्या प्रवाहातील अडथळे शोधून प्रत्यक्ष उपाय करतांना शोधलेल्या स्थानांवर मुद्रा करून न्यास करावा लागतो. त्या वेळी काही घंटे उपाय करायचे असल्यास हात दुखायला लागतात. आजारी, वयस्कर किंवा शारीरिक त्रास असणार्‍या साधकांना अशा प्रकारे शोधलेल्या स्थानावर मुद्रा करून न्यास करणे जमत नाही. अशा वेळी स्थुलातून अशा कृती न करता आपण शोधलेल्या स्थानावर मानस न्यास आणि मुद्रा करावा.’– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment