आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार्‍या मानसिक समस्यांवरील काही उपाययोजना

Article also available in :

पूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्तींच्या वेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. अशा प्रसंगी सर्वत्र विध्वंस होणे, आगी लागणेे, गल्लोगल्ली मृतदेह पडलेले असणे यांसारख्या घटना घडतात. अशा घटना पाहून वा ऐकून अनेकांना मन अस्थिर होणे, मनावर ताण येणे, काळजी वाटणे, भीती वाटणे, परिस्थिती स्वीकारता न येणे इत्यादी त्रास होतात. बर्‍याच जणांना नातेवाइकांतही भावनिकदृष्ट्या अडकायला होते. असे झाल्यास मानसोपचारतज्ञाचे साहाय्य घ्यावे. याचसमवेत अशा प्रकारचे त्रास होऊ नयेत, म्हणजेच मनाचे संतुलन ढळू न देता प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी करायच्या उपाययोजना पुढे सांगितल्या आहेत.

कुठल्याही प्रकारच्या आपत्काळाच्या वेळी घ्यायच्या स्वयंसूचना

अ. जेव्हा ‘येणार्‍या आपत्काळाची सिद्धता म्हणून साठवलेले धान्य आणि औषधे हे आपत्काळ संपण्याआधीच संपेल’, या विचाराने मला चिंता वाटत असेल, तेव्हा ‘जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात देवाने आतापर्यंत मला आवश्यक ते सर्व पुरवले आहे’, याची मला जाणीव होईल आणि मी निश्‍चिंत होऊन साधनेवर लक्ष केंद्रित करीन.

आ. जेव्हा ‘येणार्‍या आपत्काळाची सिद्धता म्हणून साठवलेले धान्य आणि औषधे हे आपत्काळ संपण्याआधीच संपेल’, या विचाराने मला चिंता वाटत असेल, तेव्हा ‘ज्येष्ठ साधकांच्या मार्गदर्शनानुसार मी आवश्यक त्या वस्तूंचा पुरेसा साठा केला आहे’, याची मला जाणीव होईल आणि मी श्रद्धेने इतर सकारात्मक प्रयत्न करीन / श्रद्धेने साधनेचे प्रयत्न करीन.

आणीबाणीच्या प्रसंगाला सामोरे जाण्यास मनाची
सिद्धता करण्यासाठी तो प्रसंग घडण्यापूर्वी घ्यायची स्वयंसूचना

प्रसंग

‘आपत्काळात मला पुरेसे अन्न-पाणी मिळेल ना ?’ याची काळजी वाटणे

अ. जेव्हा ‘तिसर्‍या जागतिक महायुद्धाच्या काळात माझ्याकडे आवश्यक अन्नधान्य आणि पाणी असेल का ?’, या विचाराने मला चिंता वाटेल, तेव्हा ‘आतापर्यंत देवानेच मला आवश्यक ते अन्नधान्य आणि पाणी पुरवले आहे अन् यापुढेही तो ते पुरवणार आहे’, याची मला जाणीव होईल अन् मी साधनेवर लक्ष केंद्रित करीन.

आ. जेव्हा ‘येणार्‍या आपत्काळाची सिद्धता म्हणून साठवलेले धान्य आणि औषधे हे आपत्काळ संपण्याआधीच संपेल’, या विचाराने मला चिंता वाटत असेल, तेव्हा ‘मी ज्येष्ठ साधकांच्या मार्गदर्शनानुसार स्थुलातून आवश्यक ते नियोजन करत आहे’, याची मला जाणीव होईल; मात्र यापेक्षाही मी करत असलेली साधना आणि देवाची कृपा यांच्यामुळेच माझे रक्षण होणार आहे अन् हे ‘मी करत असलेल्या शारीरिक आणि मानसिक सिद्धतेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे’, हे मी लक्षात घेईन. त्यामुळे मी निश्‍चिंत होऊन आवश्यक ते प्रयत्न करीन आणि बाकीचे सर्व देवावर सोडीन.

इ. जेव्हा ‘तिसर्‍या जागतिक महायुद्धाच्या काळात माझ्याकडे आवश्यक अन्न आणि पाणी असेल का ?’, या विचाराने मला चिंता वाटेल, तेव्हा ‘अखिल ब्रह्मांडातील पंचमहाभूतांवर देवाचे नियंत्रण आहे आणि देव साधकांच्या साहाय्याला सदैव धावून येतो’, याची मला जाणीव होईल अन् मी शांतपणे साधनेवर लक्ष केंद्रित करीन.

प्रसंग

‘आपत्काळात मला गंभीर आजार तर होणार नाही ना ?’, याची काळजी वाटणे.

स्वयंसूचना

ज्या वेळी ‘आपत्काळात गंभीर आजार तर होणार नाही ना ?’, याची मला काळजी वाटत असेल, त्या वेळी ‘देव काहीही करू शकत असल्यामुळे तो तिसर्‍या महायुद्धाच्या काळातही गंभीर आजार होण्यापासून माझे रक्षण करेल’, याची मला जाणीव होईल आणि मी शांतपणे साधना करीन, औषधांचा साठा करीन आणि देवावर श्रद्धा ठेवीन.

प्रसंग

‘आपत्काळात माझे घर कोसळणार तर नाही ना ?’, याची काळजी वाटणे.

आणीबाणीच्या वेळी पुढील स्वयंसूचना देता येतील !

स्वयंसूचना

ज्या वेळी ‘आपत्काळात माझे घर कोसळणार तर नाही ना ?’, याची काळजी वाटत असेल, त्या वेळी ‘आयुष्यभर देवाने माझ्या निवार्‍याची काळजी घेतली आहे. त्यामुळे युद्धाच्या काळातही ‘मला सुरक्षित ठिकाण मिळेल’, अशी काळजी तो निश्‍चितपणे घेणार आहे’, याची मला जाणीव होईल. त्यामुळे मी माझे लक्ष साधनेवर केंद्रित करीन आणि शांत राहीन.

स्वयंसूचना

ज्या वेळी ‘आपत्काळात माझे घर कोसळणार तर नाही ना ?’, याची काळजी वाटत असेल, त्या वेळी ‘शेजारी आणि साधक यांनी आणीबाणीच्या वेळी मला साहाय्य केले आहे’, याची मला जाणीव होईल. त्यामुळे मी माझे लक्ष साधनेवर केंद्रित करीन आणि शांत राहीन.

प्रसंग

अतीवृष्टीमुळे शहरात सर्वत्र पाणी-पाणी झाले आहे.

स्वयंसूचना

ज्या वेळी शहरातील पूरस्थिती पाहून ‘आता आपले आणि घराचे काय होईल ?’, असे काळजीचे विचार माझ्या मनात येतील, त्या वेळी ‘घरातील साहित्य पाण्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, तसेच कुटुंबियांना साहाय्य करणे आणि आधार देणे’, हे वर्तमानकाळातील माझे कर्तव्य / साधना आहे’, याची मला जाणीव होईल अन् मी कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी वेळोेवेळी शिकायला मिळालेल्या सूत्रांचा अवलंब करून नामजप करत योग्य ती कृती करीन.

भीती वाटत असल्यास पुढील प्रकारे प्रसंगाचा
सराव करणे आवश्यक ! (‘अ ३’ स्वयंसूचना पद्धत)

ज्या प्रसंगाची भीती वाटते, त्या प्रसंगाला सामोरे जाण्यापूर्वी ‘अ ३’ या स्वयंसूचना पद्धतीनुसार प्रसंगाचा सराव करावा. या स्वयंसूचनेचे उदाहरण खाली दिले आहे.

प्रसंग १

‘बर्‍याच शहरांत पूरग्रस्त स्थिती आहे’, याविषयीची वृत्ते मी दूरचित्रवाणी संचावर पाहिली. त्यानंतर ‘आमच्या घराजवळही नदी आहे, तर त्या नदीलाही पूर येईल. पूर आल्यास आम्हाला सुरक्षित ठिकाणी जायला सांगतील. इतरत्र स्थलांतरित होणे मला जमेल का ?’, या विचाराने भीती वाटली.

१. आमच्या घराजवळ असलेल्या नदीला पूर आल्याने नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी आम्हाला दुसरीकडे स्थलांतरित होण्यास सांगितले आहे.

२. ‘या स्थितीतून मला सुखरूप बाहेर काढ’, अशी मी देवाला आर्त प्रार्थना करत आहे.

३. मी आवश्यक तेवढे साहित्य घेऊन कुटुंबियांसह घरातून बाहेर पडत आहे.

४. ‘आपत्कालीन परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे ?’, याचे ज्ञान असलेले काही सहकारी माझ्यासह आहेत. त्यांच्या साहाय्याने आणी मार्गदर्शनाने मी उपाययोजना करत आहे. मी मनातल्या मनात प्रार्थना आणि नामजप करत आहे.

५. ज्या वेळी मला काही समस्या उद्भवत आहेत, त्या वेळी सहकार्‍यांचे साहाय्य लाभून देवाची कृपा अनुभवता येत आहे. त्यामुळे मन आश्‍वस्त होऊन माझी देवावरील श्रद्धा वाढत आहे.

६. भगवंताच्या कृपेमुळे मी सुरक्षित ठिकाणी व्यवस्थित पोचत आहे.

७. देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करून मी सर्व साहित्य व्यवस्थित लावत आहे.

प्रसंग २

मोठा पूर आल्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय घरात अडकलो आहोत / अतीवृष्टीमुळे शहरात सर्वत्र पाणी-पाणी झाले आहे.

पुढील स्वयंसूचना देता येतील !

स्वयंसूचना १

ज्या वेळी मी आणि माझे कुटुंबीय पूर आल्यामुळे घरातून बाहेर जाऊ शकत नसू, त्या वेळी ‘देव आमची काळजी घेणारच आहे’, याची मला जाणीव होईल आणि मी लक्षपूर्वक नामजप अन् साधनेचे अन्य प्रयत्न करीन.

स्वयंसूचना २

ज्या वेळी शहरातील पूरस्थिती पाहून ‘आता आपले आणि घराचे काय होईल ?’, असे काळजीचे विचार माझ्या मनात येतील, त्या वेळी ‘मी वर्तमानकाळात राहिल्यास या समस्येला तोंड देऊ शकणार आहे. ही माझी साधना आहे. भगवंतालाही तेच आवडणार आहे’, याची मला जाणीव होईल अन् मी नामजप करत योग्य ती कृती करीन.

‘आपत्काळात गंभीर आजार तर होणार नाही ना ? खायला-प्यायला मिळेल का ? घर कोसळणार तर नाही ना ?’ इत्यादींची काळजी वाटत असल्यास ती दूर होण्यासाठी स्वयंसूचना द्यावी !

प्रसंग १

मी रहात असलेल्या गावामध्ये भूकंप झाला आहे.

स्वयंसूचना

१. ज्या वेळी मी ‘ज्वालामुखीचा उद्रेक / भूकंप होत आहे’, असे ऐकीन, त्या वेळी ‘मला स्थिर रहाता यावे’, यासाठी मी देवाला प्रार्थना करीन. मी शांतपणे आवश्यक ते सर्व साहित्य गोळा करून / घेऊन माझ्या कुटुंबियांच्या समवेत नामजप करत सुरक्षित ठिकाणी जाईन.

२. ज्या वेळी मी ‘ज्वालामुखीचा उद्रेक / भूकंप होत आहे’, असे ऐकीन, त्या वेळी ‘जीवनात असे प्रसंग येणे’, हा प्रारब्धाचा भाग आहे’, असा विचार करून ‘स्थिर राहून या प्रसंगाला सामारे जाता यावे’, यासाठी मी देवाला प्रार्थना करीन.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment