एकटेपणा आणि तणाव दूर करण्यासाठी युरोपमध्ये ‘गो उपचार’चा अवलंब !

युरोपमध्ये हायब्रीड गायी आहेत. जर त्यांच्या सहवासात इतके चांगले वाटत असेल, तर देशी गायींच्या सान्निध्यात किती चांगले वाटत असेल, याचा विचार आपण करू शकतो !

गायींची ही उपयुक्तता लक्षात घेऊन केंद्र सरकारने पूर्ण देशभर गोहत्याबंदी लागू करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

नवी देहली – हॉलंडमध्ये गायीची गळाभेट घेण्याचा एक प्रकार मोठ्या प्रमाणात चालू झाल्यावर त्याचा प्रसार युरोपमधील आणखी काही देशांमध्ये होत आहे. यातून जीवनामध्ये शांतता अनुभवता येत असल्याने त्याला प्रतिसाद मिळू लागला आहे. तज्ञ याला ‘गो उपचार’ (cow therapy) असे म्हणू लागले आहेत. आता लोक एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन ते कुठल्याही गायीची गळा भेट घेतात किंवा काही घंटे गायीला चिटकून बसतात. लोकांचे म्हणणे आहे की, यामुळे त्यांना मानसिक शांतता लाभते.

भाग्यनगर येथील यशोदा रुग्णालयाच्या कन्सल्टंट मानसोपचारतज्ञ डॉ. प्रज्ञा रश्मी यांनी म्हटले की,

१. पाळीव प्राण्यांमध्ये भावना असतात. जेव्हा मनुष्य त्यांच्याशी जवळीकता निर्माण करतो, तेव्हा त्यांच्यात संवेदना निर्माण होतात आणि त्यामुळे मनुष्याला चांगले वाटते. यासाठी लोकांनी अधिकाधिक पशू आणि पक्षी यांच्या सहवासात राहिले पाहिजे. यामुळे तणाव न्यून हातो. जेव्हा तुम्ही तलाव किंवा नदी यांच्या किनारी बसता तेव्हा सकारात्मकता  निर्माण होते.

२. प्राण्यांसमवेत राहिल्याने एकटेपणाचा अनुभव होत नाही. तुम्ही मुलांमध्ये दायित्वाचे जाणीव निर्माण करण्यासाठी घरामध्ये गाय, बकरी, कुत्रा किंवा अन्य एखादा प्राणी अथवा पक्षी ठेवला पाहिजे. त्यांचे दायित्व मुलांना देऊ शकतो. ते जेव्हा प्राण्यांना हाताळतात तेव्हा त्यांच्यातील भीती दूर होते आणि त्यांच्यात विनम्रता निर्माण होते. भारतात अनेक युगांपासून ही परंपरा चालू आहे. पूर्वी प्रत्येक घरामध्ये गाय पाळली जात होती.

काऊ थेरेपी काय आहे ?

गायीची पाठ थोपटणे, तिला चिटकून बसणे, गळा भेट घेणे, चुंबन घेणे आदी ‘काऊ थेरेपी’चा भाग आहे. जर गाय तुम्हाला चाटत असेल, तर ती दाखवते की, तुमच्याप्रती तिला विश्‍वास आहे. गायीच्या शरिराचे उष्ण तापमान, हळूवार होणारे हृदयाचे ठोके आदींमुळे तिला चिकटून बसणार्‍यांना मनःशांती मिळते आणि आनंद मिळतो. गायीच्या बाजूला बसल्याने व्यक्तीमध्ये ‘ऑक्सीटोसिन हार्मोन’ निघतात आणि त्यामुळे चांगले वाटते. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या सुखद संपर्कात येतात, तेव्हा हे हार्मोन निघतात. यामुळे मन संतुष्ट होते. त्यातूनच तणाव न्यून होतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment