पत्रकार अभिप्राय

१. श्री. बी. आर्. हरन, ज्येष्ठ पत्रकार
आणि सल्लागार संपादक, ‘उदय इंडिया’, चेन्नई

आश्रमातील हे प्रदर्शन चांगली आणि वाईट शक्ती यांच्यातील भेद स्पष्ट करणारे आहे. हे विज्ञानाच्या पलीकडील विषयांची कारणमीमांसा सांगणारे आहे. तमिळ भाषेत ‘विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ आहे’, या आशयाची एक म्हण आहे. ते येथे निःसंशय सिद्ध होते. उत्तमरित्या सेवा करणार्‍या येथील सर्व साधकांना धन्यवाद !

 

२. संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार

श्री. पी. दैवमुथ्थू, संपादक, मासिक ‘हिंदू व्हॉईस’, मुंबई.

आज मला आश्रमदर्शनाची संधी मिळाली आणि माझ्यासाठी ती एक उत्कृष्ट अनुभूती होती. येथे बांधलेला ध्वनीचित्रीकरणकक्ष (स्टुडिओ) पाहून मला आश्चर्य वाटले. या आश्रमाचा उत्कर्ष व्हावा आणि हिंदू समाजासाठी तुम्ही करत असलेली सेवा शीघ्रगतीने व्हावी, यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

 

३. पंढरपूर येथील दैनिक ‘पंढरीसंचार’
चे संपादक आणि संचालक श्री. बाळासाहेब बडवे

पंढरपूर येथील दैनिक ‘पंढरी संचार’चे संपादक आणि संचालक श्री. बाळासाहेब बडवे यांनी पौष शुक्ल पक्ष ५, कलियुग वर्ष ५११४, दिनांक १६.१.२०१३ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी रामनाथी आश्रमातील स्वच्छता आणि स्वयंशिस्त यांमुळे ते भारावून गेले. त्यांना तेथे आत्मियता, भौतिकता अन् नैतिकता यांचा त्रिवेणी संगम पहायला मिळाला. रामनाथी आश्रमाविषयीची प्रतिक्रिया व्यक्त करतांना ते म्हणाले, ‘‘मी देशभरातील ३५० पेक्षा अधिक आश्रम पाहिले; पण रामनाथी आश्रम पाहून मी मंत्रमुग्ध झालो.’’

ते पुढे म्हणतात, ‘भौतिक जगात अनेक बाह्य आकर्षणांनी ऐहिक स्वार्थांधता उफाळून वर येत आहे. अशा या कालखंडात धर्मविचार, राष्ट्रविचार आणि आत्मकल्याण यांच्या श्रद्धेची ऊर्जा मिळून जीवन सार्थकी लावण्याची प्रक्रिया ज्या ज्या धर्मस्थानातून होत असते, त्या धर्मस्थानांत रामनाथी आश्रम आणि या संस्थेचे प्रेरणास्थान पूज्य डॉ. जयंत आठवले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. रामनाथी आश्रमातील भव्य वास्तुच्या विशालतेबरोबर तिथे मिळणारी ज्ञानाची विशालता आणि शुद्ध आचरणाची शिदोरी विलक्षण प्रचीती देणारी आहे.’

 

रामनाथी आश्रम हे विश्वाच्या कल्याणासाठी आणि
धर्मरक्षणासाठी प्रयत्नांच्या समिधा टाकण्यासाठीचे महाकायी यज्ञकुंड असणे

‘रामनाथी आश्रम हा भारतीय संस्कृतीच्या गुरुकुलपद्धतीच्या आश्रमाचा २१ व्या शतकात आदर्शवत असा ठेवा आहे. धर्मनिष्ठा म्हणून सेवा करतांना या आश्रमात नवनिर्मितीच्या अनेक संकल्पना साकारण्यात आल्या आहेत. रामनाथी आश्रम हे विश्वाच्या कल्याणासाठी आणि धर्मरक्षणाच्या प्रयत्नांच्या समिधा टाकण्यासाठीचे महाकायी यज्ञकुंड आहे. श्रध्देच्या, उपासनेच्या आणि निष्ठेच्या समिधा टाकून इथल्या यशातील या समिधांच्या ज्वाला गगनाशी भिडण्याची जणुकाही स्पर्धा करतात असे वाटते.’

जगातल्या कोणत्याही तीर्थक्षेत्रात
न घेतलेली आध्यात्मिक अनुभूती रामनाथी आश्रमात येणे

‘रामनाथी आश्रम पाहिल्यावर एखाद्या तीर्थक्षेत्रात यावी, तशी अनुभूती येते. तेथील स्वच्छता, स्वयंशिस्त आणि सर्वांनी घेतलेला समाज परिवर्तनाच्या संकल्पाचा ध्यास पाहिला. ‘प्रत्येक सणाला रामनाथी आश्रमाच्या द्वारापाशी बसून वंदन करून जीवनाचे सार्थक करून घ्यावे’, असे वाटते. मी साडेतीनशेच्या वर पाहिलेल्या आश्रमांत जे दिसले नाही, ते रामनाथी आश्रमात पहायला मिळाले. जगातल्या कोणत्याही तीर्थक्षेत्रापेक्षा रामनाथी आश्रमात घेतलेली आध्यात्मिक अनुभूती आजपर्यंत मला कुठेही सापडली नाही. ‘रामनाथी आश्रम हे २१ व्या शतकातले एकमेव तीर्थक्षेत्र असावे’, असे वाटते.

Leave a Comment