‘सनातन शॉप’ या ‘अँड्रॉईड अ‍ॅप’चे सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते लोकार्पण

मुंबई – भारतभरात सनातन संस्थेचे ग्रंथ आणि इतर सात्त्विक उत्पादने घरपोच उपलब्ध करून देणार्‍या SanatanShop.com या संकेतस्थळाला लाभलेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता ‘सनातन शॉप’ हे ‘अँड्रॉईड अ‍ॅप’ वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. १८ सप्टेंबर २०२० या दिवशी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले.

१. सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, ‘आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना’, ‘धर्मशास्त्र’, ‘बालसंस्कार’, ‘हिंदु राष्ट्र’, ‘आयुर्वेद’, तसेच अन्य विषयांवरील विविध ग्रंथ या अ‍ॅपच्या माध्यमातून खरेदी करता येऊ शकतात.

२. ऑगस्ट २०२० पर्यंत १७ भाषांतील ३२५ ग्रंथांच्या ८० लाख १८ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. विविध विषयांवरील हे ग्रंथ अ‍ॅपवर हिंदी, मराठी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्ल्याळम्, ओडिया, तमिळ, तसेच तेलुगु या ९ भाषांत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ‘SanatanShop.com’  किंवा ‘सनातन शॉप’ या ‘अँड्रॉईड अ‍ॅप’वर ग्रंथ आणि उत्पादने सवलतींच्या दरात उपलब्ध आहे. ‘वाचकांनी या सवलतींचा अवश्य लाभ घ्यावा. याव्यतिरिक्त देवतांच्या सात्त्विक नामपट्ट्या, जपमाळ, देवतांचे लॉकेट्स, देवतांची सात्त्विक चित्रे आणि इतर सात्त्विक उत्पादनेही खरेदीसाठी उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप सर्वांनी डाऊनलोड करावे, तसेच याविषयी आप्तेष्ट आणि परिचित यांनाही सांगावे’, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

‘सनातन पंचांग २०२१’ ही घरपोच मिळणार

सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित होणारे ‘सनातन पंचांग २०२१’ लवकरच ‘सनातन शॉप’वर उपलब्ध होणार आहे.

‘सनातन शॉप’ ‘अँड्रॉइड अ‍ॅप’ डाऊनलोड करण्यासाठी लिंक http://sanatanshop.com/app

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment