‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या अद्वितीय संशोधन कार्याची लेखमालिका

आजचे युग हे यंत्रयुग किंवा वैज्ञानिक युग आहे. प्रत्येक गोेष्ट वैज्ञानिक उपकरणाद्वारे सप्रमाण सिद्ध केली, तरच त्याची संपूर्ण जगात नोंद घेतली जाते. नवनवीन वैज्ञानिक शोधांचे स्वागत करणार्‍या भौतिक जगाकडून गुरूंच्या किंवा संतांच्या संदर्भात घडणार्‍या अध्यात्मशास्त्रीय निकषांचे मात्र हसे उडवले जाते, तसेच गुरुवचनांवर श्रद्धा ठेवणार्‍या व्यक्तींची टिंगलटवाळी केली जाते अथवा त्यांना अंधश्रद्धेच्या पारड्यात बसवून त्यांची निंदानालस्ती केली जाते. या सर्व प्रकारांमुळे अध्यात्मातील मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे असणार्‍या एका मोठ्या विश्‍वाच्या अभ्यासाला नास्तिकतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा संशोधकवृत्तीचे लोक मुकतात. असे होऊ नये; म्हणून ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने वैज्ञानिक उपकरणांद्वारे जेवढे संशोधन करता येईल, तेवढे करण्यावर अधिक भर दिला आहे; कारण ती काळाची आवश्यकता आहे. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे विश्‍वातील सकारात्मक आणि नकारात्मक अशा अतींद्रिय शक्तींचा वेध घेणे अथवा त्यांची प्रत्यक्षता अन् अप्रत्यक्षता पडताळणे आदी माध्यमांतून विज्ञान आणि अध्यात्म यांची सुरेख सांगड घालून जगाला अध्यात्म वैज्ञानिक भाषेत सांगण्याचे अमूल्य कार्य ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ करत आहे. या लेखमालिकेतून संशोधनकार्याच्या संदर्भातील काही वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहोत.’

१) गोमयापासून बनवलेली अशास्त्रीय गणेशमूर्ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक नसणे, तर धर्मशास्त्रानुसार बनवलेली सनातन-निर्मित शास्त्रीय गणेशमूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असणे

२) ‘गणेशोत्सवाच्या काळात वातावरणात निर्माण झालेले चैतन्य टिकून राहून समष्टीला त्याचा लाभ व्हावा’, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव आदर्शरीत्या साजरा करणे आवश्यक !

३) हरितालिका व्रत भावपूर्ण केल्याने पूजक आणि पुरोहित यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

४) सनातन-निर्मित श्री गणेशाच्या सात्त्विक चित्राचा सूक्ष्मातील प्रयोग

५) ‘ऋषिपूजना’चा पूजनातील घटकांवर झालेला सकारात्मक परिणाम

६) श्री गणेशचतुर्थीला केलेल्या ‘सिद्धिविनायक व्रताच्या’ पूजाविधीतून (श्री गणेशपूजनातून) पुष्कळ चैतन्य निर्माण होणे आणि त्यामुळे पूजकाला, तसेच पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

Leave a Comment