‘अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझर’(रोगाणुरोधक) च्या तुलनेत ‘आयुर्वेदीय सॅनिटायझर’ वापरणे आरोग्याच्या दृष्टीने, तसेच आध्यात्मिकदृष्ट्याही लाभदायी असणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल
ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘डिसेंबर २०१९ पासून ‘कोरोना’ विषाणूंमुळे पसरणार्‍या साथीच्या रोगाने जगभर थैमान घातले असून आतापर्यंत (१७.७.२०२० पर्यंत) जगभरातील अनुमाने ४ लक्ष ३९ सहस्र ७६० लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. या साथीच्या रोगापासून रक्षण होण्यासाठी सर्वांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. या आजाराचा संसर्ग प्रामुख्याने हाताने डोळे, नाक यांना स्पर्श करण्याच्या माध्यमातून होतो. त्यामुळे हात वारंवार पाण्याने स्वच्छ धुणे आवश्यक असते. हात स्वच्छ करण्यासाठी ‘सॅनिटायझर’चा (रोगाणुरोधकाचा) सर्रास उपयोग केला जातो. पेठेत (बाजारात) विविध आस्थापनांचे ‘अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझर’ आणि ‘आयुर्वेदीय सॅनिटायझर’ उपलब्ध आहेत. ‘अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझर’ आणि ‘आयुर्वेदीय सॅनिटायझर’ यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी २५.४.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझर (Sodium Hydrochloride) आणि आयुर्वेदीय सॅनिटायझर (तुळस, कडूलिंब, कोरफड, तुरटी, भीमसेनी कापूर आणि गोमूत्र इत्यादी नैसर्गिक अन् औषधी घटकांपासून निर्मित) यांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ (‘यू.टी.एस्.’) उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. चाचणीतील अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझर आणि आयुर्वेदीय सॅनिटायझर यांमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

२ आ १. अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझरच्या तुलनेत आयुर्वेदीय सॅनिटायझरमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असणे

अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझरमध्ये अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती; पण तिची प्रभावळ मोजता येईल इतपत नव्हती. (अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझरच्या संदर्भात ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजांनी ९० अंशाचा कोन केला. ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजांनी १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.) आयुर्वेदीय सॅनिटायझरमध्ये सकारात्मक ऊर्जा होती आणि तिची प्रभावळ २.४० मीटर होती.

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

२ इ १. अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझरच्या तुलनेत आयुर्वेदीय सॅनिटायझरची एकूण प्रभावळ अधिक असणे

अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझर आणि आयुर्वेदीय सॅनिटायझर यांची एकूण प्रभावळ अनुक्रमे १.९१ मीटर अन् ५.३५ मीटर होती; म्हणजे अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझरपेक्षा आयुर्वेदीय सॅनिटायझरची एकूण प्रभावळ ३.४४ मीटरने अधिक होती.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

 

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझरमध्ये रासायनिक घटकांचा उपयोग
केलेला असल्याने त्याचा वापर करणे आरोग्यासाठी फारसे लाभदायी नसणे

अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझर बनवण्यासाठी रासायनिक जंतूनाशकाचा उपयोग केला जातो. यामुळे त्वचेला हानी पोचण्याचा संभव असतो. अधिक काळ याचा वापर करणे आरोग्यासाठी हानीकारक ठरते. अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझरमध्ये अत्यल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असल्याचे चाचणीतून दिसून आले.

३ आ. आयुर्वेदीय सॅनिटायझरमध्ये औषधी गुणधर्म असलेल्या नैसर्गिक घटकांचा उपयोग
केलेला असल्याने त्याचा वापर करणे आरोग्याच्या दृष्टीने, तसेच आध्यात्मिकदृष्ट्याही लाभदायी असणे

आयुर्वेदीय सॅनिटायझर बनवण्यासाठी तुळस, कडूलिंब, कोरफड, तुरटी, भीमसेनी कापूर, गोमूत्र इत्यादी नैसर्गिक घटकांचा उपयोग केला जातो. या घटकांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. तुळशीतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक स्पंदनांमुळे वातावरणातील नकारात्मक स्पंदने नष्ट होऊन वातावरणाची शुद्धी होते. गोमूत्रामध्ये देवतांचे तत्त्व आकृष्ट होते. गोमूत्राच्या सेवनाने शरिरातील नकारात्मक स्पंदने नष्ट होतात. अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझरच्या तुलनेत आयुर्वेदीय सॅनिटायझरमध्ये अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असल्याचे चाचणीतून दिसून आले.

३ इ. आयुर्वेदीय सॅनिटायझर बनवण्यासाठी उपयोगात आणलेल्या आयुर्वेदीय औषधी घटकांचे महत्त्व आणि लाभ

१. तुळस

‘तुळस वातावरणामध्ये २४ घंटे प्राणवायू सोडते. तुळशीमध्ये औषधी गुणधर्म असून तिचे आध्यात्मिक महत्त्व सर्वमान्य आहे. तुळस विषमज्वर, सर्दी, खोकला, दमा इत्यादींवर उपयोगी आहे.

२. कडूलिंब

कडूलिंबाला आयुर्वेदामध्ये अत्यंत गुणकारी समजले जाते. कडूलिंबाच्या पानांचा रस जखम धुण्यासाठी आणि त्वचेला कंड किंवा आग होत असल्यास त्वचेवर लावतात. कडूलिंब नैसर्गिक जंतूनाशक आहे.

३. कोरफड

कोरफड बहुगुणी, बहुपयोगी औषधी वनस्पती असून त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

४. तुरटी

गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो. तुरटी जंतूनाशक आहे. तुरटीमुळे जंतूसंसर्ग टाळता येतो.

५. भीमसेनी कापूर

भीमसेनी कापराच्या सुगंधाने जिवाणू, विषाणू, सूक्ष्म कीटक इत्यादी नष्ट होतात. तसेच वातावरण शुद्ध होते आणि आजार दूर रहातात.

६. गोमूत्र

गोमूत्राच्या सेवनाने अनेक आजार बरे होतात, तसेच शरिराची शुद्धी होते.’

(संदर्भ : संकेतस्थळ)
यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

थोडक्यात, ‘अ‍ॅलोपॅथिक सॅनिटायझरपेक्षा आयुर्वेदीय सॅनिटायझर वापरणे आरोग्याच्या दृष्टीने, तसेच आध्यात्मिकदृष्ट्याही लाभदायी आहे,’ हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’

– सौ. स्वाती वसंत सणस, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१७.६.२०२०)

ई-मेल : [email protected]

 

आयुर्वेदाचे महत्त्व जाणा !

‘आपले शरीर आणि मन आरोग्यसंपन्न ठेवणे, हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. यासाठी आयुर्वेद हे प्राचीन काळापासून उपयोगात आणलेले परिणामकारक माध्यम आहे. ‘आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे. रोगांपासून मुक्त होण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी ज्या ज्या द्रव्यांचा उपयोग होतो, ती ती सर्व द्रव्ये आयुर्वेदीय औषधांमध्ये अंतर्भूत आहेत. आयुर्वेदाने गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट चवींच्या अन्नाचा अन् द्रव्यांचा दोष, धातू आणि मळ यांवर कसा परिणाम होतो, याचे चांगले वर्णन केले आहे. ‘जगात एकही द्रव्य असे नाही की, ज्याचा औषध म्हणून उपयोग करता येणार नाही’, असे आयुर्वेदाने म्हटले आहे.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदीय औषधी’)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment