सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘धर्मरक्षण’ आणि ‘साधकांना घडवणे’ या अलौकिक कार्याचे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी केलेले कौतुक !

Article also available in :

योगतज्ञ दादाजी वैशंपायन

 

१. दैनिक ‘सनातन प्रभात’चे धर्मरक्षणाचे अतुलनीय कार्य !

१ अ. हिंदु धर्मावरील टीकेला सडेतोड उत्तर देणे

‘सनातन प्रभात’ हे एकमेव दैनिक आहे, ज्यातून हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर अनाठायी केल्या जाणार्‍या टीकेला आपण (डॉ. जयंत आठवले) आणि आपले सेवाभावी साधक निर्भीडपणे सडेतोड उत्तरे देतात.

१ आ. वेदांमधील एखाद्या वाक्याचा संदर्भ न पहाता त्याचा चुकीचा अर्थ काढून
वादग्रस्त विधाने करणार्‍यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मधून विचारपूर्वक खंडण केले जाणे

सध्या अनेक ठिकाणी ‘आपल्या ऋषिमुनींनी वेदांमधून जे ज्ञान दिले आहे, त्याचा योग्य अभ्यास न करता मधलेच एखाद-दुसरे वाक्य उचलून त्याविरुद्ध गदारोळ करणे’, ही एक पद्धतच झाली आहे. त्या वाक्यांच्या मागील-पुढील वाक्यांचा संदर्भ न घेता त्या वाक्याचा किंवा ऋचेचा वेडावाकडा अर्थ काढायचा आणि वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीचा झोत स्वतःकडे घ्यायचा, हेच एक काहींचे उद्दिष्ट झाले आहे; परंतु आपण विचारपूर्वक या सगळ्याचे दैनिक ‘सनातन प्रभात’मधून बहुअंशी खंडण करता, हे कौतुकास्पदच आहे !

 

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रूढी आणि परंपरा यांचे अंधानुकरण न करता
त्यातील वैज्ञानिक अन् सामाजिक दृष्टीकोनांवर भर देत असल्याने ते हितावह असणे

आपल्या सखोल वैद्यकीय ज्ञानामुळे आपण साधकांचे मानसशास्त्र जाणता ! साधकांचा भक्तीभाव आणि परमेश्‍वरावरील श्रद्धा यांमुळे मनःपूर्वक केलेली उपासना अन् साधनेतील सातत्यानंतर येणारे विविध अनुभव यांचा सुयोग्य अर्थ आपण श्रद्धावान साधकांना नीट समजावून सांगता आणि त्यांच्या पारमार्थिक मार्गावरील प्रगतीला साहाय्यकारी होता. रूढी आणि परंपरा यांचे अंधानुकरण न करता त्यातील वैज्ञानिक अन् सामाजिक दृष्टीकोनांवर आपण जो भर देता, तो हितावहच आहे.

 

३. सुयोग्य मार्गदर्शनाद्वारे साधकांची आध्यात्मिक प्रगती करून घेणारे
आणि त्यांना संतपदाच्या पायरीपर्यंत घेऊन जाणारे परात्पर गुरु डॉक्टर !

३ अ. आश्रमातील ज्येष्ठ साधकांनी नवोदित साधकांची अपत्याप्रमाणे काळजी घेणे आणि अहंकारासारख्या
शत्रूला नियंत्रणात ठेवण्यासाठी आश्रमात परात्पर गुरु डॉक्टरांनी घातलेला पायंडा अन्यत्र कुठेही पहायला न मिळणे

सनातनच्या आश्रमांतील ज्येष्ठ साधकांकडून नवोदित साधकांची काळजी अपत्याप्रमाणे घेतली जाते. हे दुर्मिळ चित्र आपल्याच आश्रमात दिसते. त्यामुळे नवोदित साधकांना सुयोग्य मार्गदर्शन मिळते आणि ज्येष्ठांना (जुन्या साधकांना) अहंकाराचा स्पर्श होत नाही, हे विशेष आहे, तसेच साधनेमध्ये संतुलन राखून साधक प्रगतीपथावर जातो. अहंकारासारखा शत्रू नाही. याला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याकडे जो पायंडा आपण पाडला आहे, तो इतरत्र कुठेही नाही. साधक ज्येष्ठ असो वा नवोदित, त्याच्या हातून चुका होतात आणि त्या फलकावर लिहिल्या जातात. त्यामुळे त्यांना सुधारण्यास वाव मिळतो आणि साधकांचा अहंकार दूर होतो. ‘आपण सर्वसाधारण साधक असल्यामुळे आपल्या हातून चुका होणार’, हे साहजिकच आहे; परंतु त्या मान्य करून त्यात सुधारणा करणे, हे विशेष अनुकरणीय आहे.

३ आ. साधकांना सतत नामस्मरणासह सेवा करण्याची सवय लावणे

साधकांच्या अंगी सेवाभाव रहावा, यासाठी त्यांना विविध प्रकारची सेवा द्यावी लागते. ही सेवा करत असतांनाच सतत नामजप करण्याची सवय त्यांच्या अंगी बाणवली जावी, असा त्यांचा प्रयत्न असतो. एकदा सततच्या नामस्मरणाची सवय लागली की, साधक सतत श्रीकृष्णाच्या अनुसंधानात रहातो आणि मग उद्दिष्टपूर्ती विशेष कठीण होत नाही.

३ इ. सेवेप्रती भाव निर्माण करणे

आपल्या पूर्वकर्मानुसार आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत, ‘ती परमेश्‍वराचीच सेवा आहे’, हा भाव साधकांनी सतत मनी बाळगावा आणि ‘सतत परमेश्‍वराच्या अनुसंधानात रहावे’, ही आपली शिकवण स्पृहणीयच आहे.

३ ई. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सुयोग्य मार्गदर्शनाने अनेक
साधकांची प्रगती होऊन ते संतपदापर्यंत पोचणे, हे कौतुकास्पद असणे

आपल्या सदोदित आणि सुयोग्य मार्गदर्शनानेच आपल्या काही श्रमजीवी साधकांची पातळी लक्षणीय टक्क्यांपर्यंत पोचली आहे, तर काही साधकांनी संतपदाची पायरी गाठली आहे. हे सर्व त्यांनी संसारिक कर्तव्ये करून केले आहे. काही साधकांनी विविध शारीरिक अडचणींना दाद न देता लक्षणीय प्रगती केली असल्याचे समजले. नावे लिहावयाची झाली, तर पुष्कळच लिहावी लागतील ! हे खरोखरंच कौतुकास्पद आहे.

‘आपल्या कार्याचा व्याप असाच वाढत राहो आणि या दर्शनी कार्याला सरकार दरबारीही अडथळा न येवो’, ही उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी मी श्रीकृष्ण अन् श्री गुरुदेव दत्त यांना प्रार्थना करतो.’

– योगतज्ञ दादाजी वैशंपायन (‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’, दिवाळी विशेषांक, वर्ष २०१३)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment