‘सनातन शॉप’च्या माध्यमातून सनातन संस्थेचे ग्रंथ वितरण पूर्ववत् चालू !

भारतात ‘कोरोना’च्या प्रादुर्भावानंतर लागू केलेल्या दळणवळण बंदीमुळे ‘सनातन चैतन्य भांडारा’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ पद्धतीने होणारे वितरण काही काळापुरते थांबवण्यात आले होते. यापुढे ‘कोरोना’च्या संदर्भात शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून ग्राहकांसाठी वितरण पूर्ववत् चालू करत आहोत. ‘आमचे सर्व ग्राहक कोरोनाच्या आजारापासून सुरक्षित राहू देत’, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना आहे.

 

‘सनातन शॉप’च्या माध्यमातून पाठवल्या जाणार्‍या
पार्सल संदर्भात काही पालट केले असून ते पुढीलप्रमाणे आहेत.

अ .‘सनातन शॉप’ या संकेतस्थळावर केल्या जाणार्‍या मागण्यांमध्ये ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ ही सुविधा काही काळासाठी बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी ‘ऑनलाईन पेमेंट ’(Online Payment) किंवा ‘बँक ट्रान्स्फर पेमेंट’ (Bank Transfer Payment) ही सुविधा उपलब्ध आहे.

आ. सर्व ग्राहकांच्या माहितीसाठी : ‘कोरोनाच्या साथीमुळे पार्सल ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी न्यूनतम ३ ते ४ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो किंवा एखादा विभाग ‘कंटेन्मेन्ट झोन’ (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित झालेला असल्यास त्या ठिकाणी पार्सल पोचवता येणार नाही’, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment