सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमपरिसरात समाजकंटकांकडून मद्याच्या बाटल्या फेकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न !

सनातन संस्थेची फोंडा पोलिसांत तक्रार !

रामनाथी (गोवा) – शनिवार, ११ एप्रिलच्या रात्री १० वाजता येथील सनातन आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही समाजकंटकांनी मद्याच्या बाटल्या फेकल्या. त्या रात्री आश्रमासमोरील रस्त्यावरून ‘सुझुकी एक्सेस’ प्रमाणे दिसणार्‍या पांढर्‍या रंगाच्या दुचाकी वाहनावरून ३ समाजकंटक रामनाथी मंदिराच्या दिशेकडून आले आणि आश्रमपरिसरात बाटल्या फेकून ते श्री शांतादुर्गा मंदिराच्या दिशेने निघून गेले. ८.४.२०२० च्या रात्री १०.४५ च्या सुमारास काही समाजकंटकांनी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मद्याच्या बाटल्या फेकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही घटनांविषयी सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, दळणवळण बंदीच्या काळात मद्यविक्री बंद असतांनाही समाजकंटकांना मद्य कुठून उपलब्ध झाले ? त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या कशा आल्या ? दळणवळण बंदीमुळे अत्यावश्यक गोष्टी वगळता प्रत्येकाने घरातच रहाण्याचे आदेश असतांना कायद्याचे उल्लंघन करत रात्रीच्या वेळी हे युवक रस्त्यावर आले कसे ? यासंदर्भात समाजकंटकांची चौकशी करून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी.

गेल्या १० वर्षांपासून आश्रमावर बाटल्या फेकणे, आश्रमासमोरून ओरडत जाणे, आश्रमातील साधकांना जाता-येता अश्‍लील बोलणे, शिवीगाळ करणे असे प्रकार समाजकंटकांनी केले आहेत. १४.३.२०२० या दिवशी देखील काही समाजकंटकांनी होळीचे निमित्त साधून आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आश्रमाच्या चारचाकी वाहनांना जबरदस्तीने थांबवले आणि वाहनाची तोडफोड केली होती. या विषयीची तक्रारदेखील फोंडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती; मात्र अद्याप त्याविषयी काहीच चौकशी करण्यात आलेली नाही. या तक्रारीत काही संशयितांची नावेही दिली होती. त्याच संशयितांनी आकसापोटी पुन्हा आश्रमावर आक्रमण केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टींची नोंद घेऊन समाजकंटकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करावी.

 

नागेशी येथे साधक वास्तव्य करत असलेल्या सदनिकेवरही आक्रमण !

११ एप्रिलच्याच रात्री १०.२० वाजता नागेशी (बांदिवडे) येथे साधक वास्तव्य करत असलेल्या सदनिकेच्या सज्जातही अशाच प्रकारे मद्याच्या बाटल्या फेकून आक्रमण करण्यात आले. रस्त्यावरून एका दुचाकी वाहनावरून जाणार्‍या २ समाजकंटकांनी फेकलेल्या मद्याच्या बाटल्या सज्जात पडून फुटल्या. त्याविषयीही संबंधितांकडून फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, सर्वत्र दळणवळण बंदी असतांना या समाजकंटकांकडे मद्य कुठून उपलब्ध झाले ? आज त्यांनी मद्याच्या बाटल्या फेकल्या; मात्र उद्या हेच लोक ‘अ‍ॅसिड’सारखे ज्वालाग्राही पदार्थही फेकून मारतील. तरी या प्रकरणाचे लवकरात लवकर अन्वेषण करून दोषींना कायद्यानुसार शिक्षा करावी.

 

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा १० वर्षे ११४ वा दिवस !

 

११.०४.२०२०

आश्रमासमोरील रस्त्यावरून रात्री ८ वाजता २ जण दुचाकीवरून शिवीगाळ करत ओरडत गेले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment