दैवी वृक्षांची लागवड करा !

अनेक त्रासांच्या मागे आध्यात्मिक कारणे असतात. त्रासांवर उपाय म्हणून सप्तदेवतांपैकी योग्य देवतेच्या नामाचा जप केला जातो. सध्या त्रासांचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे साधकांना नामजप करणे कठीण जात आहे. समाजातील व्यक्तींनी नामजप केलेला नसल्याने त्यांना नामजप करणे अशक्य असते. असे असतांना देवतेचे तत्त्व मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आवश्यक त्या वृक्षाकडून विविध प्रकारे देवतेचे तत्त्व मिळावे, उदा. वृक्षाची पाने खाणे; त्याची पाने, साल किंवा खोड यांचे वाटण करून ते खाणे किंवा त्याचा लेप लावणे; वृक्षाची साल जाळून त्याची विभूती वापरणे इत्यादी. लेप करण्याने दैवीतत्त्वाला आपतत्त्व प्रवाही बनवते. जाळल्याने सालावर अग्नीचा संस्कार होतो.

१. सप्तदेवतांशी संबंधित दैवी वनस्पती

देवता

वनस्पती

१. श्रीराम तुळस
२. श्रीकृष्ण तुळस
३. मारुति रुई
४. शिव बेल
५. देवी मोगरा, जाई, जुई, चाफा
६. श्री गणपति दुर्वा आणि जास्वंदी
७. दत्त औदुंबर

२. पंचतत्त्वावर आधारित वनस्पतींचा वापर

तत्त्व

वापरण्याची पद्धत

१. पृथ्वी वास (गंध) घेणे
२. आप उगाळून, वाटण करून घेणे
३. आप आणि तेज काढा
४. तेज वनस्पतीची विभूती
५. वायू वनस्पतीची धुरी
६. आकाश पाच दैवी वृक्षांच्या फांद्या एकत्र होऊन झालेली पोकळी. हिला पंचवटी म्हणतात.

३. हे लक्षात घ्या !

अ. आपल्या पूर्वपुण्याईने आपण भारतात रहातो. विदेशातील साधकांना शक्य नसले, तरी आपल्याला दैवी वृक्षांची लागवड करणे सहज शक्य आहे.

आ. पुढे येणार्‍या आपत्कालात आपल्याला औषधे मिळणे अशक्य होईल. तेव्हा आपल्याला या दैवी वृक्षांचाच आधार असेल.

इ. दैवी वनस्पतींना ‘झाडपाला’ म्हणून हिणवणार्‍यांना पुढे दैवी वनस्पतींनाच शरण जावे लागेल.

ई. एखाद्या देवतेची आपण उपासना करतो, त्या भावाने दैवी वृक्षांची उपासना, म्हणजे जोपासना करा. तुमच्यातील भावाने वृक्षांतील दैवीतत्त्वाचे प्रमाण वाढायला साहाय्य होईल.

उ. वृक्ष वाढायला वेळ लागतो, हेही लक्षात घेऊन साधकांनी आताच शक्यतो जास्त प्रमाणात लागवड करावी, म्हणजे आपण नगरांतील आणि ज्यांच्याकडे लागवडीसाठी जागा नाही, अशा साधकांना साहाय्य करू शकू.

डॉ. आठवले (ऑक्टोबर २००६)

येणार्‍या आपत्काळाच्या दृष्टीने आयुर्वेदीय वनौषधींची लागवड करा !

भीषण आपत्काळात वैद्यकीय औषधे मिळणार नाहीत; परंतु ईश्वरी कृपेमुळे काही झाडांचा आपण औषध म्हणून उपयोग करू शकतो. साधकांनी अशा औषधी वनस्पती घराजवळ आताच लावून ठेवाव्यात, म्हणजे पुढील काळात त्यांचा उपयोग होईल. पुढे काही वनस्पतींची मराठी नावे दिली आहेत. त्या परिचयाच्या आहेत; परंतु ओळखता येत नसल्यास स्थानिक जाणकाराला विचारून घ्यावे. स्थानांनुसार नावांमध्ये भेद असू शकतो. त्यासाठी संस्कृत नावेही दिली आहेत. या वनस्पतींव्यतिरिक्त इतर वनस्पती ठाऊक असल्यास त्याही लावू शकतो. कृषी विद्यापीठ, वनखाते किंवा आयुर्वेदाविषयी कार्य करणार्‍या स्थानिक संस्था यांच्या वतीने वनस्पतींचे विनामूल्य वाटपही केले जाते. त्याचाही लाभ घेऊ शकतो.

टीप : या औषधींविषयी अधिक माहिती, तसेच त्यांचे गुणधर्म आणि उपयोग सनातन निर्मित आयुर्वेदीय औषधी या ग्रंथात दिले आहेत.

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०१४)

 

Leave a Comment