- सलग १८ वर्षे पुणे येथील ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियान शतप्रतिशत यशस्वी !
- मानवी साखळी आणि प्रबोधन करून रोखले खडकवासला जलाशयाचे प्रदूषण

पुणे – धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून जलाशयात उतरणे हे धर्मशास्त्राविसंगत आहे. हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समिती अनेक वर्षे प्रबोधन करत आहे. याचाच एक भाग म्हणून हिंदु जनजागृती समिती; सनातन संस्था; कमिन्स इंडिया लिमिटेड, पुणे आणि समविचारी संघटना यांच्या वतीने ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवले जात आहे. यंदा अभियानाचे १८ वे वर्ष आहे. यामध्ये ‘रंग खेळून कोणी जलाशयात उतरू नये’ आणि ‘पिण्याचे पाणी पुरवणार्या या जलाशयाचे प्रदूषण होण्यापासून रक्षण व्हावे’ यासाठी जलाशयाभोवती मानवी साखळी करून प्रबोधनही करण्यात येते.
यशस्वी मोहीम !
यंदाही प्रबोधनात्मक फलक हातात धरून सकाळी ९ पासून सायंकाळी ७ पर्यंत जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करण्यात आली. रंगाने माखलेल्या युवक-युवतींचे प्रबोधन करून त्यांना धरणाच्या पाण्यात उतरण्यास प्रतिबंध करण्यात आला. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी हे अभियान १०० टक्के यशस्वी झाले. एकूण १५० हून अधिक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. सर्वांच्या सहकार्याने अभियानाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. अशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे १३ मार्चलाही हे अभियान राबवण्यात येणार आहे.
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !