(म्हणे) ‘अग्निहोत्र अवैज्ञानिक आहे !’

अंनिस आणि मराठी विज्ञान परिषद यांचा दावा

हिंदूंच्या प्रथा-परंपरांविषयी अंनिसची कोल्हेकुई !

जळगाव – १५ मार्च या ‘जागतिक अग्निहोत्रदिना’निमित्त जळगाव शहरात सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे अग्निहोत्र अवैज्ञानिक असून ‘याद्वारे आजार बरा होतो’, हा दावा नागरिकांची दिशाभूल करणारा आहे, असे मत अंनिसच्या जळगाव शाखा आणि मराठी विज्ञान परिषद यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

परिपत्रकात पुढे म्हटले आहे की, अग्निहोत्र प्रक्रियेत गायीचे शेण, तूप आणि चिमूटभर तांदूळ वापरतात. हे सर्व पदार्थ जैविक आणि सेंद्रिय आहेत. त्यात कार्बनी संयुगे असतात. अग्निहोत्रात या पदार्थांचे ज्वलन होते. ज्वलनासाठी ऑक्सिजनचा वापर होऊन कार्बन डाय ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यांसह अन्य प्राणघातक वायू बाहेर टाकले जातात. यातून वायूप्रदूषण होते. (केवळ हिंदु धर्मियांच्या प्रथा-परंपरांतूनच प्रदूषण होत असल्याचा कांगावा करणार्‍या अंनिसला अन्य धर्मियांच्या सणांतून होणारे ध्वनी आणि जल प्रदूषण का दिसत नाही ? मशिदींवरील भोंग्यांच्या माध्यमातून होणार्‍या प्रदूषणाविषयी अंनिस का बोलत नाही ? – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment