भोसरी (जिल्हा पुणे) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन

‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन

प्रवचनाला उपस्थित जिज्ञासू

पुणे – इंद्रायणीनगर भागातील वैष्णवी मंदिराच्या प्रांगणात ९ फेब्रुवारी या दिवशी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन आयोजित केले होते. सनातन संस्थेच्या सौ. स्मिता बोरकर यांनी साधनेचे महत्त्व, नामजप कोणता आणि कसा करायचा, षड्रिपूंचे निर्मूलन कसे करायचे यांविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. विलास मडीगेरी यांचे विशेष सहकार्य लाभले. अर्धांगवायूचा त्रास असूनही एक वाचक जिज्ञासू कार्यक्रमाला पूर्णवेळ उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment