अधिवक्त्यांच्या प्रतिक्रिया

१. सनातन संस्थेचे कार्य सूर्य आणि चंद्र यांसारखे !
– अधिवक्ता अतुल वर्मा, समाजवादी पक्ष, विदिशा, मध्यप्रदेश.

सनातन आश्रम, सनातन संस्था आणि ‘सनातन प्रभात’ हे हिंदु धर्म अन् हिंदू यांच्यासाठी संपूर्ण विश्वात सूर्य आणि चंद्र यांसारखे आहेत. सूर्याचे किरण अंधःकाराला संपवून प्रकाश देते आणि चंद्र शीतलता देतो. अगदी तशाच प्रकारे आश्रमात आल्यावर, तसेच संस्थेशी जोडले गेल्यावर मनुष्याच्या अंधःकारमय जीवनात प्रकाश येऊन त्याच्या हृदयात चंद्राप्रमाणे शीतलता अन् शांती निर्माण होते.

मी ‘ख्रिस्ताब्द २०१३ चे १०० सनातन पंचांग’ घेऊन हिंदूंमध्ये ती वितरित करीन आणि सनातन-निर्मित ग्रंथांच्या माध्यमातूनही प्रसार करीन.’

 

२. आश्रम पाहून ‘आता केवळ धर्मासाठीच जगायचे !’
हा संकल्प दृढ झाला ! – अधिवक्त्या (सौ.) अपर्णा रामतीर्थकर, सोलापूर, महाराष्ट्र.

अधिवक्त्या<br /> (सौ.) अपर्णा रामतीर्थकर
अधिवक्त्या
(सौ.) अपर्णा रामतीर्थकर

‘आश्रमात धर्मासाठी एवढे तरुण साधक-साधिका वेळ देत असलेले आणि एवढे श्रम करतांना पाहिले अन् ‘जगात वाईट गोष्टींपेक्षाही चांगल्या गोष्टी अधिक आहेत’, याविषयी माझी निश्चिती झाली. सर्व साधकांनी अत्यंत कौशल्याने चालवलेले विभागही मी पाहिले. त्यांच्यामध्ये मला सेवेविषयी तळमळ आणि प्रामाणिकपणा जाणवला. आज माझ्या मनातील संकल्प पुन्हा दृढ झाला, ‘आता केवळ धर्मासाठीच जगायचे !’

 

३. संपूर्ण विश्व जागतिकीकरणाच्या मागे धावत असतांना
सनातनचा आश्रम वैश्विक स्तरावर दिव्य संस्कृती स्थापन करण्याच्या कार्याला
गती देत आहे ! – श्री. रेनोजॉय बिस्वास, शासकीय अधिवक्ता, उच्च न्यायालय, कोलकाता.

‘२१ व्या शतकातील हे जग भांडवलशाही आणि जागतिकीकरण यांच्यामागे वेगाने धावत आहे. ही धाव मानवी मूल्यांच्या नेमकी विरुद्ध आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण मानवजातीच्या उत्कर्षासाठी हा आश्रम आध्यात्मिक शक्ती निर्माण करत आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आश्रमातील साधकांच्या साधनेमुळे अलौकिक शक्ती निर्माण होऊन आपले जीवन दिव्यत्वामध्ये रूपांतरित होण्यास पात्र बनते. संपूर्ण विश्वातील वाईट शक्ती आश्रमामध्ये सतत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असतात; परंतु शेवटी साधक त्यांचे भोग आणि ही परिस्थिती यांवर नियंत्रण मिळवतील अन् ईश्वरी राज्य येईल !

शंकराचार्य आणि गौतम बुद्ध यांच्यानंतर या भूमीवर जन्म घेणारे प.पू. डॉक्टर आठवलेजी ही एक महनीय विभूती आहे. ‘हा आश्रम जागतिक स्तरावर दिव्य संस्कृती स्थापन करण्याच्या कार्याला गती देण्याचे कार्य अविरतपणे करत आहे’, असे मला वाटते. यामागचे रहस्य दुसरे तिसरे काही नसून, हा आश्रम म्हणजे वैश्विक ऊर्जेचा स्रोत आहे.’

 

४. अधिवक्ता मिलिंद नारायण जाडकर, महाराष्ट्र राज्य
प्रशिक्षण प्रमुख, भटक्या विमुक्त आघाडी, भाजप, रत्नागिरी

मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा नियमित वाचक आहे. ‘सनातन प्रभात’मुळे माझ्या कार्यालयात नेहमी सकारात्मक ऊर्जा रहाते. ‘सनातन प्रभात’च्या वाचनामुळे माझ्यातील सात्त्विकता वाढू लागली आहे.

सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिली असता येथील भावपूर्ण वातावरणाने मी भारावून गेलो. हा आश्रम ‘विजिगीषू हिंदू राष्ट्राच्या निर्मितीचे महत्त्वाचे केंद्र बनेल’, असा विश्वास वाटतो. आश्रमातील सर्व व्यवस्था शिस्तबद्ध वाटल्या. साधक वेतन न घेता सेवाभावी वृत्तीने करत असलेली सेवा पाहून ‘त्यातून आपण आदर्श घ्यावा’, असे वाटले.

सनातन संस्था काळाच्या अनुरूप आवश्यक संघटन करणारी संस्था आहे. हिंदू राष्ट्र आणि सनातन संस्था यांचे भवितव्य उज्ज्वल आहे.

 

५. अधिवक्ता देवदास राजाराम शिंदे, ‘हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान’, पुणे

अधिवक्ता<br /> देवदास राजाराम शिंदे
अधिवक्ता
देवदास राजाराम शिंदे

मी पूर्ण आश्रम बघितला. मला आश्रम पुष्कळ आवडला. हा उपक्रम कौतुकास्पद आहे. जर आश्रमाला अधिक देणगी मिळाली, तर भविष्यात होणारी हिंदू धर्माची प्रगती पूर्ण विश्वाला आश्चर्यचकित करील.

आश्रमात जे कार्य केले जात आहे आणि त्यातही विशेषकरून धर्मासाठी जे कार्य केले जाते, त्यासाठी मी आणि माझा पूर्ण परिवार, भावी पिढ्या सनातनच्या सदैव ऋणी रहातील. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज नसते, तर सर्वांची सुन्नत झाली असती (सर्व मुसलमान झाले असते), त्याप्रमाणेच आपल्याकडूनही ईश्वराने कार्य करवून घेवो, ही ईश्वराप्रती प्रार्थना. ईश्वर तुम्हाला शक्ती देवो.

 

६. अधिवक्ता श्री. ऋषभ प्रकाश गादिया, अहमदनगर

आश्रम अतिशय सुंदर असून येथील सेवक फारच विनम्र आहेत. येथील वातावरण चैतन्यपूर्ण आहे आणि साधकांकडून होणारी सेवा फारच उत्कृष्ट आहे.

Leave a Comment