सनातन संस्थेच्या साधकांनी घेतले शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे दर्शन !

हिंदु राष्ट्र निश्‍चितच येणार ! – शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे आशीर्वाद घेतांना साधक आणि कार्यकर्ते

उडुपी (कर्नाटक) – सध्या पुरी येथील पुर्वाम्नाय गोवर्धन पिठाधिश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी  निश्‍चलानंद सरस्वती दक्षिण भारताच्या दौर्‍यावर आहेत. उडुपी येथे ते आले असता सनातन संस्थचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी त्यांचे दर्शन घेतले. यात सनातनच्या सौ. शोभा, सौ. पवित्रा कुड्वा आणि समितीचे श्री. विजयकुमार यांनी शंकराचार्य यांचे आशीर्वाद घेतले. संस्थेच्या कार्याविषयी सांगताच ‘हिंदु राष्ट्र निश्‍चितच येणार आहे’, असे शंकराचार्य यांनी आश्‍वस्त केले. आशीर्वाद म्हणून त्यांनी श्रीफळ दिले. शंकराचार्याच्या दर्शनासाठी अनेक जण प्रतीक्षेत असतांना त्यांनी साधकांना प्रथम बोलावून त्यांना अधिक वेळ दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात