रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

१. रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता

रामायण श्रीमद्भगवद्गीता
१. निर्मितीचे युग त्रेतायुग द्वापरयुग
२. ग्रंथाचे रचनाकार महर्षि वाल्मीकि महर्षि व्यास
३. ग्रंथाचा विषय श्रीरामाच्या जीवनचरित्राचे वर्णन विविध योगमार्गांतील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे
४. ग्रंथ कळण्याची सुलभता सोपा कठीण
५. ग्रंथातील ज्ञान कोणत्या साधकासाठी उपयुक्त आहे ?
५ अ. साधकाचा योगमार्ग प्रामुख्याने भक्तीयोग प्रामुख्याने ज्ञानयोग
५ आ. साधकाची आध्यात्मिक पातळी
(टक्के)
५५ ते ७५ ६० ते ९०
६. ग्रंथाचे भावपूर्ण वाचन केल्यामुळे होणारा परिणाम मनातील मायेचा ओढा न्यून होऊन
भक्तीचा उदय होणे
अज्ञानाचे आवरण नष्ट होऊन व्यक्ती धर्माचरण आणि साधना करण्यास कृतीशील होणे
७. ग्रंथामध्ये कार्यरत असणारी शक्ती इच्छा + ज्ञान (टीप १) ज्ञान + क्रिया (टीप २)
८. ग्रंथातील चैतन्य कोणत्या पाताळातील वाईट शक्तींशी सूक्ष्म युद्ध करते ? ५ व्या आणि ६ व्या ७ व्या
९. ग्रंथाचा सूक्ष्म रंग निळसर (टीप ३) पिवळसर (टीप ४)

टीप १ : ग्रंथ वाचणार्‍याच्या मनात प्रभु श्रीरामाचे जीवनचरित्र जाणून घेण्याची जिज्ञासा, म्हणजे सात्त्विक इच्छा जागृत झालेली असते. त्यामुळे या ग्रंथातून इच्छा आणि ज्ञान यांच्याशी संबंधित शक्ती कार्यरत आहे.

टीप २ : या ग्रंथाचे वाचन केल्यावर व्यक्तीच्या मनातील शंकांचे निरसन होऊन तिला दैनंदिन जीवन ‘कसे जगायला हवे ?’ याचे उत्तम मार्गदर्शन मिळते. या ग्रंथातून प्रक्षेपित होणार्‍या ज्ञान आणि क्रिया या स्तरांवरील शक्तीमुळे व्यक्तीने ग्रंथवाचन केल्यावर तिला झालेल्या ज्ञानप्राप्तीमुळे ती कृतीच्या स्तरावर सक्रीय होते.

टीप ३ : रामायण हा ग्रंथ भक्तीमय असल्यामुळे तो सूक्ष्मातून निळसर दिसतो.

टीप ४ : श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ ज्ञानमय असल्यामुळे तो सूक्ष्मातून पिवळसर दिसतो.

 

२. विविध प्रकारच्या लिखाणांची तुलना

धर्मविरोधांनी केलेले लिखाण भावनिक स्तरावरील
लिखाण (ललित वाङ्मय)
श्रीमद्भगवद्गीतेसारखा
श्रेष्ठतम ग्रंथ किंवा त्याचे भाष्य
१. ग्रंथ / पुस्तक यांतून प्रक्षेपित होणारी शक्ती
अ. चांगली शक्ती (टक्के) ० ते ५ ५० ते ९०
आ. त्रासदायक शक्ती
(टक्के)
३० ते ९० १ ते २०
२. लिखाण करण्याची प्रेरणा
कोणामुळे मिळते ?
पाताळ आणि नरक येथील
मोठ्या वाईट शक्तींमुळे
भुवलोकातील भुते, अतृप्त लिंगदेह आणि कनिष्ठ स्वर्गलोकातील यक्ष, किन्नर अन् गंधर्व यांमुळे (टीप १) ईश्‍वरी कृपेमुळे
३. लेखक
३ अ. आध्यात्मिक पातळी (टक्के) २० किंवा त्याहून अल्प २५ ते ४५ ७० हून अधिक
३ आ. प्रकार धर्मविरोधी लेखक लेखक किंवा कवि थोर संत किंवा ऋषिमुनी
४. लिखाणाचा परिणाम
४ अ. लेखकावर होणारा
परिणाम
अहं वाढून तो वाईट
शक्तींच्या कह्यात जाऊ
शकणे
मानसिक किंवा बौद्धिक स्तरावर विचार केल्यामुळे आध्यात्मिक स्तरापर्यंत पोचू न शकणे लेखक उच्चतम आध्यात्मिक अवस्था अनुभवून ईश्‍वराच्या जवळ जाणे
४ आ. वाचकांवर होणारा परिणाम वाचकांच्या मनातील
धर्मावरील श्रद्धा न्यून होऊन
धर्मविरोधी विचार वाढून ते
अधर्माचरणी होणे
वाचकांच्या मनातील भावना जागृत होऊन ते मानसिक स्तरावरील विचारांत किंवा काल्पनिक विश्‍वात
अडकण्याचा धोका असणे
वाचकांना आध्यात्मिक ज्ञान मिळून सत्याचे शाब्दिक दर्शन घडणे आणि त्यांच्या मनात
धर्माचरण अन् साधना करण्याचा विचार वाढल्याने त्यांची ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने
वाटचाल चालू होणे.
४ इ. वास्तुवर वास्तूमध्ये त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण होऊन वास्तू दूषित होणे आणि वास्तूमध्ये त्रासदायक शक्तीचे स्थान निर्माण होणे वास्तूमध्ये भावनात्मक स्पंदने
पसरल्याने वास्तू भावनिक विचारांचे केंद्र बनणे
वास्तूमध्ये चैतन्य पसरल्यामुळे वास्तू चैतन्यदायी होणे आणि तेथे चैतन्याचे स्थान निर्माण होणे.
५. लेखकाला लिखाण
केल्यामुळे मिळणारे फळ
धर्मविरोधी कृती केल्यामुळे तीव्र पाप लागून त्याला मृत्यू नंतर नरकात जावे लागणे लेखक सतत मानसिक किंवा
बौद्धिक स्तरावर राहिल्यामुळे त्याची आध्यात्मिक उन्नती खुंटते. मृत्यूनंतर तो गंधर्वलोक, पितृलोक किंवा भुवलोक येथे जातो आणि प्रारब्धानुसार
पृथ्वीवर जन्म घेऊन जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत कायमचा अडकतो.
सकाम लिखाण करणार्‍या लेखकाला पुण्य मिळते आणि देवतांच्या लोकात स्थान प्राप्त होते. निष्काम लिखाण
करणार्‍यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांना मुक्ती किंवा मोक्ष मिळतो.
६. ग्रंथ / पुस्तक यांचा प्रभाव
किती काळ टिकतो ?
काही वर्षे (टीप २) काही मास चिरंतन

टीप १ : भुवलोकातील भुते आणि अतृप्त लिंगदेह यांनी सुचवलेले विचार त्रासदायक असल्यामुळे या ललित वाङ्मयातून त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण होते. यक्ष, गंधर्व किंवा किन्नर यांनी सुचवलेले विचार अल्प प्रमाणात सकारात्मक असल्यामुळे या ललित वाङ्मयातून अल्प प्रमाणात चांगली शक्ती प्रक्षेपित होते.

टीप २ : धर्मविरोधी लिखाणाचा प्रभाव अनेक वर्षे टिकून रहात असल्यामुळे अनेक पिढ्यांची धार्मिक आणि आध्यात्मिक हानी होऊ शकते. त्यामुळे धर्मविरोधी लिखाणाचे वैचारिक स्तरावर वेळोवेळी खंडण करणे आवश्यक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment