‘हनुमान चालिसा’चे पठण करतांना आलेली अनुभूती

‘हनुमान चालिसा’चे पठण करतांना भावजागृतीसाठी प्रयत्न केल्यावर
थकवा जाऊन उत्साह वाढणे आणि पठणातून ‘आनंद कसा अनुभवायचा ?’, हे शिकायला मिळणे

हनुमान चालिसा म्हणण्यासाठी एक छोटी पुस्तिका आहे. तिच्यामध्ये हनुमान चालिसातील प्रत्येक श्‍लोकासमवेत त्याला अनुरूप असे चित्र दिले आहे. एक दिवस पठण करतांना देवाने सुचवले, ‘हनुमान चालिसा म्हणतांना ज्याप्रमाणे पुस्तकात चित्रे आहेत, तसे दृश्यस्वरूप डोळे बंद करून अनुभवून पहा.’ त्यानुसार मी जसे श्‍लोकांतील बोल आहेत, तसे दृश्यस्वरूप डोळ्यांपुढे आणून हनुमान चालिसा म्हटली. तेव्हा ‘ती कधी संपली’, हे मला कळलेच नाही. ती म्हणतांना ‘मी कुठल्यातरी निराळ्या विश्‍वात आहे’, असे मला जाणवत होते, तसेच पठणाला येतांना मला थोडा थकवा जाणवत होता; पण हनुमान चालिसा म्हणून झाल्यावर एकदम उत्साह निर्माण झाला. यावरून ‘एखाद्या देवतेची स्तुती असणारे श्‍लोक, आरती इत्यादी म्हणायचे असेल, तेव्हा ते नुसतेच न म्हणता, त्यांतील बोल लक्षात घेऊन आणि तसे दृश्यस्वरूप डोळ्यांसमोर आणून म्हटल्यास भाव जागृत होण्यास साहाय्य होते अन् अधिक आनंद अनुभवता येतोे’, हे मला शिकायला मिळाले.’

– श्री. निखील पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०१९)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment