स्लोव्हेनिया येथील नागरिक ईगर प्रिस्टावेज वर्धा येथे आले असता सनातन संस्थेच्या कार्याने प्रभावित

डावीकडून आयुर्वेदाचार्य श्री. मिलींद सज्जनवार, सौ. मधुरा सज्जनवार, ग्रंथ न्याहाळतांना ईगर प्रिस्टावेज आणि सौ. विजया भोळे

वर्धा, २८ जानेवारी (वार्ता.) – हिंदु धर्माविषयी आस्था असलेले युरोपातील स्लोव्हेनिया येथील ईगर प्रिस्टावेज हे वर्धा येथे आले असता त्यांना सनातन संस्थेविषयी माहिती देण्यात आली. संस्थेची माहिती ऐकून ते प्रभावित झाले. या वेळी त्यांनी सनातननिर्मित इंग्रजी भाषेतील ग्रंथ आणि सर्व प्रकारची सात्त्विक उत्पादने खरेदी केली अन् संस्थेच्या कार्याविषयी आनंद व्यक्त केला.

ईगर प्रिस्टावेज ‘प्रिगो’ या जड वाहनाची निर्मिती करणार्‍या आस्थापनाचेे मालक आहेत. ते भारतीय पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीनुसार उपचार करण्यासाठी पत्नी अ‍ॅना आणि त्यांची ३ मुले यांच्यासमवेत वर्धा येथील आयुर्वेदाचार्य श्री. मिलींद सज्जनवार यांच्या रुग्णालयामध्ये आले होते. त्या वेळी श्री. सज्जनवार यांनी प्रिस्टावेज कुटुंबीय आणि सनातनच्या स्थानिक साधिका सौ. विजया भोळे यांची भेट घडवून आणली. या वेळी सौ. भोळे यांनी त्यांना सनातन संस्थेविषयी माहिती दिली. या प्रसंगी आयुर्वेदाचार्य श्री. मिलींद आणि सौ. मधुरा सज्जनवार उपस्थित होत्या.

विशेष

श्री. सज्जनवार यांनी प्रिस्टावेज कुटुंबियांचे शहरातील एका चर्चला भेट देण्याचे नियोजन केले होते; मात्र श्री. प्रिस्टावेज यांनी चर्चमध्ये न जाता मंदिराला भेट देण्याची इच्छा प्रदर्शित केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment