हर्षल, नेपच्यून आणि प्लूटो हे इंग्रजी नावांचे ग्रह भारतीय ज्योतिषशास्त्रात कसे ?

हर्षल, नेपच्यून आणि प्लूटो हे ग्रह आधुनिक युगात जरी शोधले गेले असले, तरीही ते या पूर्वी अस्तित्वात असून त्यांचा उल्लेख आढळतो. महाभारतात त्यांचा उल्लेख अनुक्रमे प्रजापति, वरुण आणि इंद्र (कुबेर) असा आहे. त्यांची, विशेषतः  वरुणाची इतर ग्रहांबरोबर आजही पूजा होते.

 

१. हर्षल (प्रजापति)

या ग्रहाचा शोध हर्षल नावाच्या संगीततज्ञाने १३.३.१७८१ या दिवशी लावला. हा ग्रह सूर्यापासून १७८२ दशलक्ष मैल दूर असून त्याचा व्यास ३२००० मैल आहे. हा बहिर्गोल ग्रह डोळ्यांनी दिसत नाही. मोठ्या दुर्बिणीतून याचे दर्शन होते. हा ग्रह एका राशीत ७ वर्षे वास्तव्य करतो. याला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास ८४ वर्षे लागतात. हर्षल हा तमोगुणी ग्रह आहे. हा ग्रह इतर शुभ ग्रहांच्या योगात असल्यास शुभ फले देतो. बुध ग्रहापेक्षा याचे कार्य व्यापक असल्याने तो संशोधनात्मक बुद्धीचा कारक ग्रह आहे. हा ग्रह राक्षसगणी नक्षत्रात किंवा अशुभ ग्रहाने युक्त असल्यास आकस्मित अतिशय वाईट घटना घडतात. हर्षलचे स्वगृह कुंभ, उच्च स्थान वृश्‍चिक आणि नीच स्थान वृषभ आहे. बौद्धिक राशीत (३,७,११), चांगली फले, पृथ्वी राशीत (२,६,१०) हटवादी, अग्नि राशीत (१,५,९) अविचारी आणि उतावीळ अन् जलराशीत (४,८,१२) विषयासक्त आणि उथळ स्वभावाचा अशी सर्वसाधारणपणे फले आढळून येतात.

 

२. नेपच्यून (वरुण)

हा डोळ्यांनी न दिसणारा सूर्यमालेतील एक बहिर्गोल ग्रह आहे. हा ग्रह रविपासून सर्वांत दूरचा ग्रह असून तो जवळजवळ २ अब्ज, ७४ कोटी आठ लक्ष मैल दूर आहे. मोठ्या दुर्बिणीतून हा पहाता येतो. सूर्यापासून याचे अंतर २७७ कोटी ७५ लाख मैल आहे. सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास यास १४६ वर्षे ६ महिने लागतात. नेपच्यूनचा व्यास ३२९० मैल आहे. हा एका राशीत १२ वर्षे ३ महिने असतो. हा जलतत्त्वाचा ग्रह आहे. अभा प्रदक्षिणाकाळ ३६७५ दिवसांचा आहे. हा काळ अंदाजे आहे. (अभा म्हणजे एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करण्याचा काळ.) शनिसारखा हाही पापग्रह मानला गेला आहे. यास १  उपग्रह आहे. शास्त्रज्ञांना याचा शोध २३ सप्टेंबर १८४६ या दिवशी लागला. हा स्त्री-ग्रह असून भावनाशील आणि संवेदनक्षम आहे. या ग्रहाचा अंमल शरिरातील प्रत्येक अवयवाच्या क्रियेवर आहे, उदा. डोळ्यांतील (रेटीना) ज्ञानतंतू, शरिरातील ज्ञानतंतू, लस इत्यादी

 

३. प्लुटो (इंद्र किंवा कुबेर)

प्लुटो या ग्रहाचा शोध वर्ष १८५७ मध्ये लागला. तो एका राशीत सुमारे २५ ते ३३ वर्षे असतो. याचा भ्रमणमार्ग आणि भ्रमणपद्धती चमत्कारिक आहे; कारण तो एका बाजूस जास्त कलतो. भ्रमणातील अर्धा काळ फार लहान, तर दुसरा अर्धा काळ फार मोठा असतो. प्लुटो हा तमोगुणी ग्रह आहे.’

– सौ. प्राजक्ता जोशी, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, ज्योतिष फलित विशारद (१४.११.२०१८)