सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी

रामनाथी (गोवा) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा महासंकल्प केला आहे. त्यानुसार लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. यासाठी आपण सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करायला हवेत. या कार्याला दैवी अधिष्ठान लाभून त्यासाठी सर्वांना बळ मिळो, असे आशीर्वचनपर मार्गदर्शन श्री कोंडेवूर मठ, उप्पळा, कासारगोड, केरळम् येथील मठाधीश्वर श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी यांनी साधकांना केले. स्वामीजींनी १३ जून या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी स्वामीजींचे भक्त आणि म्हापसा येथील उद्योजक श्री. परेश रायकर अन् श्री. श्यामराव रायकर हे उपस्थित होते. ‘सनातन प्रभात’चे उपसंपादक श्री. उमेश नाईक यांनी श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी यांचा पुष्पहार घालून आणि शाल अन् श्रीफळ देऊन सन्मान केला. स्वामीजींना सनातनचे ग्रंथ भेट देण्यात आले. साधक श्री. योगेश गंद्रे यांनी आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची त्यांना ओळख करून दिली.
अभिप्राय व्यक्त करतांना स्वामीजी म्हणाले, ‘‘आश्रमात दैवी, चैतन्यदायी अनुभूती आली. आश्रमात सर्वत्र सकारात्मक स्पंदने जाणवली. आश्रमातील वातावरण शांत आणि स्वच्छ आहे.’’
सनातन आश्रमात मी अद्भुत अनुभूती घेतली ! – श्री भगवत शरण महंत राधाकृष्ण स्वामी
भारतीय संत महापरिषदेच्या संत समन्वयक स्वामिनी उन्मेष भारती यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
वृंदावनचे परम गोभक्त संत गोपेश कृष्णदास महाराज यांची गोव्यातील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
पतंजलि योगपिठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
‘अंतरयोग फाऊंडेशन’चे संस्थापक आध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी यांची गोवा येथील सनातन आश्रमाला भेट !
त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील आनंद आखाड्याचे स्वामी शिवज्ञानानंद सरस्वती महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला...