उज्जैन येथील ‘शैव महोत्सवा’त लावण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट !

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि रा.स्व. संघाचे सहकार्यवाह श्री. भय्याजी जोशी यांची भेट

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनात ग्रंथ पहातांना श्री. अमित शहा. त्यांच्यासमोर सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

उज्जैन – उज्जैन येथील ‘शैव महोत्सवा’त लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अमित शहा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री श्री. शिवराज सिंह चौहान, तसेच रा.स्व. संघाचे सहकार्यवाह श्री. भय्याजी जोशी यांनी ५ जानेवारीला भेट दिली. सनातनचे संत, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी अमित शहा यांना सनातन संस्था प्रकाशित अन् हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘हिन्दू राष्ट्र क्यों आवश्यक ?’ हा ग्रंथ भेट दिला.

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट देतांना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान

याशिवाय मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना ‘गंगा नदी की रक्षा करें !’ हा ग्रंथ, तर भय्याजी जोशी यांना ‘हिन्दू राष्ट्र स्थापना की दिशा’, हा ग्रंथ भेट दिला. येथे ५ जानेवारीपासून चालू झालेला ‘शैव महोत्सव २०१८’च्या निमित्ताने सनातनच्या वतीने विविध विषयांवरील अनमोल ग्रंथसंपदेचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. हा महोत्सव ७ जानेवारीला समाप्त होणार आहे.

 

Leave a Comment