सनातनचा आश्रम अनुशासन असलेला आहे ! – सनातनचे हितचिंतक श्री. जैबसिंग धांंडा यांचा अभिप्राय

ग्रंथप्रदर्शन पहातांना श्री. जैबसिंग धांडा

पनवेल – सनातनचा आश्रम अनुशासन असलेला आहे. साधक इतरांना दूषणे न देता स्वतःहून स्वतःच्या चुका शोधतात. स्वतःमधील कमतरता इतरांना सांगतात आणि त्या दूर करण्याचा चांगला प्रयत्न करतात, असा अभिप्राय सनातनचे हितचिंतक आणि रोटरी क्लब अंबरनाथचे सचिव श्री. जैबसिंग धांंडा यांनी दिला. १५ ऑक्टोबरला त्यांनी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली.

सनातनचा आश्रम पाहून झाल्यावर श्री. धांंडा म्हणाले, हा हिंदु संस्कृतीचे संवर्धन करण्याचा चांगला प्रयत्न आहे. सर्वांनी यासाठी योगदान द्यायला हवे.

सध्या बांधकाम व्यावसायिक असलेले श्री. धांंडा हे लष्करातून निवृत्त झालेले हवालदार आहेत. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे ते भक्त आहेत. दैनिक सनातन प्रभातचे १२ वर्षांपासून वाचक असून ते दैनिकासाठी नियमित विज्ञापनेही देतात. सनातन पंचांग, तसेच दैनिक प्रायोजित करून ते नेहमी राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होतात. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी सांगितलेली साधना करतात. त्यांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण अनुभूतीही आल्या आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment