१. घरातील मूर्ती
१ अ. भग्न न झाल्यास
मूर्ती खाली पडली; पण भग्न झाली नाही, तर प्रायश्चित्त घ्यावे लागत नाही. केवळ त्या देवतेची क्षमा मागायची आणि तीलहोम, पंचामृत पूजा, दुग्धाभिषेक इत्यादी विधी अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींच्या सांगण्यानुसार करावेत.
१ आ. भग्न झाल्यास
मूर्ती पडून भग्न झाल्यास तो अपशकून समजण्यात येतो. देवतेचा मुकुट पडणे, हाही एक अपशकून असतो. आगामी संकटाची ती पूर्वसूचना असू शकते. अशा वेळी त्या मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.
२. देवळातील मूर्ती
मूर्तीचे स्थिर आणि चल असे दोन प्रकार आहेत.
२ अ. स्थिर मूर्ती
ही मूर्ती देवळात पक्की बसवलेली असल्यामुळे ती कधीच हलवता येत नाही. त्यामुळे ती पडण्याचा प्रश्नच येत नाही; मात्र जेव्हा ती पडते, तेव्हा ती भग्न झाल्यामुळे किंवा तिची झीज झाल्यामुळेच पडते. अशा वेळी त्या मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.
२ आ. चल मूर्ती
ही देवळातील उत्सवमूर्ती असल्याने ती इतरत्र हलवता येते. ती मूर्ती भग्न न होता केवळ पडली, तर वरील सूत्र १ अ. मध्ये सांगितल्याप्रमाणे विधी करावेत. त्यानंतर ती मूर्ती पूर्वीप्रमाणे पूजेत पुन्हा ठेवू शकतो; पण मूर्ती भग्न झाल्यास मात्र तिचे वहात्या पाण्यात विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.
३. घर आणि देऊळ येथील भग्न मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसंदर्भात सामायिक सूत्रे
मूर्ती भग्न होणे, हे आगामी संकटाचे सूचक असते. त्यामुळे घर आणि देऊळ यांतील भग्न मूर्तीचे विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी अघोर होम, तत्त्वोत्तारण विधी (भग्न मूर्तीतील देवतेचे तत्त्व काढून ते नवीन मूर्तीत प्रस्थापित करणे) इत्यादी विधी करण्यास शास्त्रात सांगितले आहे. या विधींमुळे अनिष्टाचे निवारण होऊन शांती मिळते. केवळ भेद एवढाच आहे की, घरी या विधींचे प्रमाण अल्प स्वरूपात असते आणि देवळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शास्त्रोक्त पद्धतीने हे विधी करावे लागतात.
– वेदमूर्ती श्री. केतन रविकांत शहाणे, अध्यापक, सनातन साधक पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्या काही शंका आणि त्यांची उत्तरे
भीम हा श्री वायुदेवाचा पुत्र असला, तरी त्याच्यामध्ये देवतांची गुणवैशिष्ट्ये नसल्यामुळे तो ‘देव’ नसणे
श्राद्ध संबंधित प्रश्न आणि त्यांची उत्तरे
परपंथीय व्यक्तीला हिंदु धर्मात प्रवेश मिळण्यासंबंधीचे अध्यात्मशास्त्र !
विवाहाविषयी शंकानिरसन
मृत्योत्तर विधीसंदर्भातील शंकानिरसन
पितृपक्षांमध्ये कालसर्प शांती करता येते का?
आणि कोणत्या मुहूर्तावर करावी?
नमस्कार
हो. तसे करू शकतो. आपल्या स्थानिक पुरोहितांना विचारून मुहूर्त ठरवावा.
आपली
सनातन संस्था