परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आजरा (जिल्हा कोल्हापूर) येथील ह.भ.प. तुळशीराम महाराज पोखरकर यांनी दिलेला संदेश !

‘यश, श्री, औदार्य, भक्ती, ज्ञान आणि ऐश्विर्य ।
हे सहाही गुणवर्य वसती जेथे तया नाम भगवंतू ।’

असे सर्वगुणसंपन्न असलेले परमपूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले) कृष्णरूपात सर्व कार्य पूर्ण करत आहेत. धृतराष्ट्र, दुर्योधन, शिशुपाल, जरासंध यांना जसा श्रीकृष्ण कळला नाही, तसे आता सुद्धा समाजात धृतराष्ट्र, दुर्योधन आहेत, त्यांना कृष्ण कसा कळेल ? श्रीकृष्ण न कळल्यामुळे नको त्या वल्गना करून आणि श्रीकृष्णाला अर्वाच्य शिव्या देऊन आपले १०० अपराध पूर्ण करणारे शिशुपाल आजही आहेत. धर्मरक्षण, धर्मउत्थान आणि समाजप्रबोधन यांचे कार्य कसे चालले आहे, सामान्यजनाचा उद्धार कसा होत आहे, हे गांधारीला तिच्या डोळ्यांवरील पट्टीमुळे आणि पुत्रमोहामुळे कळले नाही, तसेच आता स्वार्थाने अंध झालेल्या जिवांनी भ्रष्टाचाराची पट्टी बांधल्यामुळे त्यांना प.पू. डॉ. आठवले कृष्ण अंशरूपाने आहेत, हे कसे कळणार ?

माझा स्वतःचा अनुभव सांगतो की, आमच्या आश्रमावर अनेकवेळा अडचणी आल्या असता परमपूज्यांच्या कृपेमुळे सर्व अडचणी दूर झाल्या. जसे क्रोंच पक्षी २०० किलोमीटरवरून नुसत्या आठवणीने पोट भरतो, कासव स्वतःच्या दृष्टीने आपल्या पिलांचे पोट भरते, तसे कृष्णरूप प.पू. डॉक्टर हे सहस्रो किलोमीटरवर असणारे साधक आणि सात्त्विक भक्त यांचे सहज उत्थान करतात आणि धर्मरक्ष णाचे कार्य करतात. त्यांच्याविषयी काय आणि किती लिहावे ? शब्दही अपुरे पडतात. कृष्ण, प.पू. डॉक्टर आणि त्यांचे अवतार कार्य यांना कोटी कोटी प्रणाम !’

आपला सेवक, संतचरणरज, कृष्णचरणरज
रामायणाचार्य ह.भ.प. तुळशीराम महाराज पोखरकर
श्री संत ज्ञानेश्वरर माऊली गुरुकुल प्रा. आश्रम, एरंडोळ, आजरा, जिल्हा कोल्हापूर.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात