नखे कोणत्या वारी कापावीत, यामागील ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोन

Article also available in :

सौ. प्राजक्ता जोशी

‘इंग्रजीत एक सुविचार आहे, ‘When nails grow long, we cut nails, not fingers. Similarly, when misunderstandings grow up, cut your ego & not your relations.’ येथे नखांना अहंकाराची उपमा दिली आहे. अहंकार वाढला की, सद्सद्विवेकबुद्धीचा लोप होतो. सध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात सात्त्विकता टिकवण्यासाठी लहानात लहान कृती शास्त्रानुसार केल्यास निश्‍चितच लाभ होतो.

आयुर्वेदानुसार हाता-पायांची नखे नियमित कापल्याने पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते. नखांच्या रंगानुसार विविध आजार ओळखता येतात. सध्याच्या धावपळीच्या काळात नखे कापायला एखाद्या ठराविक दिवशी वेळ मिळतोच, असे नाही. बर्‍याच जणांना रविवारी सुटी असल्याने बहुतेक जण रविवारीच नखे कापतात. काही जणांना ‘नखे कोणत्या वारी कापल्यास योग्य ?’, अशी जिज्ञासा असते.

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सूर्योदयाच्या वेळी ज्या ग्रहाचा होरा असतो, (होरा म्हणजे १ घंट्याचा कालावधी.) त्या ग्रहाचे नाव त्या वाराला दिलेले आहे, उदा. रविवारी सूर्योदयाच्या वेळी रवि ग्रहाचा होरा असल्याने त्याला ‘रविवार’ असे नाव आहे. नखे वाढवल्याने देहात तमोेगुण वाढतो. वार हे होर्‍यानुसार ठरत असल्याने होर्‍यानुसार करावयाची कृत्ये पाहिल्यास लक्षात येते की, व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी नखे कापण्यासाठी शनिवार आणि रविवार सोडून इतर सर्व वार योग्य आहेत. ‘कोणत्या दिवशी नखे कापल्यास नक्की काय लाभ होतो ?’, याचा अंदाज येथे मांडला आहे.

 

वारांनुसार नखे कापल्याने होणारी फलप्राप्ती

 

वार होऱ्यानुसार करायची कृत्ये नखे कापल्याने होणारी संभाव्य फलप्राप्ती नखे कापण्याचे विश्लेषण
१. सोमवार सर्व कार्य आरोग्यप्राप्ती सोम म्हणजे चंद्र. चंद्र हा मनाचा कारक आहे. मनाच्या स्थितीवरच आपले आरोग्य अवलंबून असते. या दिवशी नखे कापल्याने मनावरील तमोगुणाचे आवरण दूर होण्यास साहाय्य होऊ शकते.
२. मंगळवार युद्ध आणि वादविवाद कर्जमुक्त होण्यास साहाय्य होणे कर्ज फेडल्यास होणारे संभाव्य वादविवाद टळण्यासाठी मंगळवारी नखे कापू शकतो.
३. बुधवार ज्ञानार्जन सन्मार्गानि धनप्राप्ती होणे बुध हा वैश्य वर्णाचा बौद्धिक ग्रह आहे. या दिवशी नखे कापल्याने
बौद्धिक यशामुळे नोकरी / व्यवसायात धनप्राप्ती होऊ शकते.
४. गुरुवार मंगल कार्य घरात घडणान्या अशुभ गोष्टींना आळा बसणे आणि चित्त गुरुउपासनेकडे वळणे गुरु हा आध्यात्मिक ग्रह असून उपासनेचा कारक आहे. या दिवशी नखे कापल्याने सत्त्वगुण वाढण्यास साहाय्य होऊ शकते.
५. शुक्रवार प्रयाण प्रिय व्यक्तीची गाठभेट होणे शुक्र हा कलेचा आणि प्रीतीचा कारक आहे. या दिवशी नखे
कापल्याने प्रिय व्यक्तीच्या भेटीसाठी प्रयाण होऊ शकते.
६. शनिवार द्रव्यसंचय आसक्ती वाढणे आणि मानसिक
स्थैर्य न्यून होणे
साधनेत त्याग महत्त्वाचा आहे. द्रव्यसंचयामुळे ध्येयापासून लक्ष
विचलित होऊ शकते. यासाठी शनिवारी नखे कापू नयेत.
७. रविवार राजसेवा रजोगुण वाढणे आणि कामामध्ये
अडथळे येणे
राजसेवा करण्यातील वेळ न्यून होऊ नये, यासाठी रविवारी नखे
कापू नयेत. साधकांसाठी राजसेवा, म्हणजेच समष्टी सेवा.

 

कापलेली नखे घरात पडू नयेत, याची काळजी अवश्य घ्यावी. नखे एका कागदात गुंडाळून काळजीपूर्वक कुणाच्याही हातात पडणार नाहीत, अशा प्रकारे टाकून द्यावीत.’

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

2 thoughts on “नखे कोणत्या वारी कापावीत, यामागील ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोन”

  1. खुप खुप धन्यवाद, मला सुद्धा अध्यात्म या विषयामध्ये खूप गोडी आहे पण रोजच्या संसारचक्रातून बाहेर पडता येत नाहीये .योगा योगे तुमची ही लिंक समोर आली ,खूप छान वाटले.

    Reply
    • नमस्कार श्री. राहुल बरगेजी,

      तुम्हाला आध्यात्मात रूची आहे, हे ऐकून आनंद झाला. कृपया पुढील लिंकवरील लेख वाचू शकता : https://www.sanatan.org/mr/spiritual-journey या लिंकवर, नियमित कामे करतांना आपण साधना कशी करू शकतो, या विषयी माहिती दिली आहे.

      Reply

Leave a Comment