सनातन संस्थेचे कार्य मला मनापासून आवडते – अलका कुबल, अभिनेत्री

अभिनेत्री अलका कुबल यांची सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला सदिच्छा भेट

अलका कुबल यांना ग्रंथ भेट देतांना सचिन आहेर

लासलगाव : गणेश जयंतीनिमित्त चांदवड शहरातील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिरात लावलेल्या सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनाला मराठी चित्रपट अभिनेत्री अलका कुबल यांनी सदिच्छा भेट दिली. ‘सनातनचे कार्य चांगले असून त्यांचे विचार मला पटतात. या कार्याची आज खरोखर आवश्यकता आहे. मला तुमचे कार्य मनापासून आवडते’, असे त्यांनी सांगितले. त्या तेथे चित्रीकरणासाठी आल्या होत्या. या वेळी त्यांनी संस्थेचे कार्य आणि साहित्याचे महत्त्व समजून घेतले. त्यांना सनातनचा ‘धर्मशिक्षण फलक’ हा ग्रंथ, नामपट्टी आणि दैनिक सनातन प्रभात सनातनचे साधक श्री. सचिन आहेर यांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment