सनातनच्या आश्रमांमध्ये घडलेल्या आणि घडणार्‍या सूक्ष्मातील अद्वितीय चांगल्या घटना

बहुतेक सर्वच घटना (परात्पर गुरु) डॉ. आठवले रहात असलेल्या रामनाथी आश्रमातील आहेत, तर काही देवद आश्रमातील आहेत. देवद आश्रमातील घटनांत देवद आश्रमाचा उल्लेख केला आहे.

 

१. पंचमहाभूते

१ अ. पृथ्वीतत्त्व

१. आश्रमात ठिकठिकाणी विविध गंध येणे आणि काही वेळा गंध आल्यावर नाकात झिणझिण्या येणे

२. प.पू. डॉक्टरांनी भृगु महर्षींच्या आदेशावरून भृगुसंहितेचे प्रासादिक पान प्रतिदिन डोक्याला लावून त्याला नमस्कार केल्यावर ६ मासांनी (महिन्यांनी) त्या पानाला पुष्कळ सुगंध येण्यास आरंभ होणे. (१५.१०.२०१६)

१ आ. आपतत्त्व

१ आ १. तोंडाला गोड चव येणे

१ आ २. खिडक्यांच्या काचांवर तरंग दिसणे.

१३.५.२०१४ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील वातानुकूलन यंत्राच्या (ए.सी.च्या) बाजूला असलेल्या खिडक्यांच्या काचांवर पहिल्यांदाच उभे आणि आडवे तरंग (लाटा) दिसून त्या काचेतून पाण्यातील लाटांत दिसते, तसे पलीकडील दृश्य दिसणे अन् त्यानंतर आश्रमातील बर्‍याच काचांमध्ये अशा प्रकारे तरंग दिसू लागणे

१ आ ३. आश्रमातील विविध वस्तूंवर प्रतिबिंब दिसणे

अ. प.पू. डॉक्टर सेवा करतात, त्या ठिकाणी आगाशीतील गडद राखाडी रंगाच्या कोटा-लाद्या आणि सर्वसामान्य रंगाच्या कोटा-लाद्या यांवर पडलेल्या सूर्याच्या प्रतिबिंबांमध्ये फरक दिसून न येणे

आ. आश्रमातील खिडक्या आणि दारे यांच्या काचांमध्ये काचेसमोरील दृश्याचे प्रतिबिंब स्पष्ट पडल्याचे दिसणे आणि ते पाहून आपण जणूकाही आरशात प्रतिबिंब पहात आहोत, असे वाटणे, तसेच लाकडी आणि लोखंडी कपाट यांसारख्या इतर वस्तूंमध्येही प्रतिबिंब दिसण्यास आरंभ होणे

इ. प.पू. डॉक्टर सेवा करतात, त्या ठिकाणी, तसेच प.पू. डॉक्टरांच्या खोलीची खिडकी किंवा दार याच्या काचेतून ज्या बाजूने प्रकाश येतो, त्या बाजूने पाहिल्यास अतिशय स्पष्ट प्रतिबिंब दिसते आणि जणू आरशातच प्रतिबिंब पहात आहोत, असे वाटणे

१ इ. तेजतत्त्व

१ इ १. रंगात पालट होणे

अ. प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील पालट

१. खोलीतील पांढर्‍या भिंतींमध्ये हिरवट, पिवळ्या किंवा गुलाबी अशा छटा दिसणे आणि त्या रंगांमध्ये पालटही होणे

२. प्रकाश अल्प झाल्यावर सर्वच भिंती हिरवट दिसणे; मात्र छत नेहमी पांढरे दिसणे

३. पश्‍चिमेकडील भिंतीवर सकाळी सूर्याचा प्रकाश पडतो, त्या ठिकाणी एखादी वस्तू धरल्यास, त्या वस्तूच्या भिंतीवर पडणार्‍या सावलीमध्ये सप्तरंग दिसणे

४. दंडदिपाभोवती (ट्यूबलाईटभोवती) उत्साहवर्धक हिरवट प्रकाश दिसणे आणि त्यामुळे जवळची पिवळी छटा असलेली भिंत हिरवट दिसणे

५. खोलीतील स्नानगृहाबाहेर स्नानगृहाला लागून असलेल्या कोपर्‍यातील चार लाद्यांचा रंग पिवळसर होणे आणि तो मधे मधे गुलाबी होऊन नंतर पूर्ववत पिवळसर होत असणे

६. देवघरात असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रातील त्यांच्या तोंडवळ्याला हिरवट छटा येणे, तसेच तोंडवळ्याभोवतीची प्रभावळ फिकट गुलाबी होणे

आ. ३१ डिसेंबर २००९ आणि २ नोव्हेंबर २०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या वापरातील पांढर्‍या रंगाच्या २ बंड्यांना हाताच्या बाह्या, छाती आणि पोट या ठिकाणी गुलाबी रंगाची छटा आल्याचे लक्षात येणे

इ. प.पू. डॉक्टर प्रतिदिन पठण करत असलेल्या मंत्रपठणाचे कागद, सेवा करत असलेल्या संगणकाचा पडदा, त्यांच्या खोलीतील घड्याळाचा आतील पांढरा भाग, लिखाणाचे कागद यांचे रंग पालटून त्यांना गुलाबी, पिवळी किंवा हिरवट छटा येणे

ई. खोली क्र. ३१६, १०९ आणि आश्रमातील अन्य खोल्या यांच्या भिंतींना गुलाबी छटा येणे

१ इ २. आरशात प्रतिबिंब पहातांना दृश्य पुष्कळ जवळून पहात असल्याचे किंवा त्या दृश्याचा आकार वाढल्याचे जाणवणे

१ इ ३. खोल्यांतील तापमान वाढणे किंवा अल्प होणे

अ. प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील तापमान अन्य खोल्यांच्या तापमानांच्या तुलनेत अल्प असणे आणि खोलीमध्ये थंडावा जाणवणे

आ. प.पू. डॉक्टर सेवा करतात, त्या ठिकाणची भूमी उष्ण होऊन पायांना चटके बसणे, तेथे काही सेकंदही पाय ठेवणे कठीण होणे अन् पायांमध्ये स्लिपर आणि मोजे असले, तरी पायांना तेथील उष्णता जाणवणे

इ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या देवद आश्रमातील खोलीतील भूमी उष्ण वाटणे आणि ते त्यांच्या खोलीत साधकांच्या चुकांविषयी सांगतांना तेथील भूमीची उष्णता आणखी वाढणे

१ इ ४. खोल्यांतील प्रकाशामध्ये वाढ होणे, तसेच देवतांच्या चित्रांतील प्रकाश वाढणे

अ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी प.पू. डॉक्टरांना दिलेल्या शिवाच्या त्रिमितीय (ऑटोस्टिरीओग्राम) चित्रामध्ये प्रकाश निर्माण होणे आणि कालांतराने त्यात वाढ होत असल्याचे जाणवणे

आ. प.पू. डॉक्टरांच्या रहात्या खोलीत दिवा लावल्यावर खोलीतील प्रकाशामध्ये आधीच्या तुलनेत आणि अन्य खोल्यांच्याही तुलनेत आता (वर्ष २०१६ मध्ये) वाढ झालेली असणेे

१ इ ५. आश्रमाजवळच्या रस्त्यावरील विजेचा दिवा, सूर्य आणि चंद्र यांच्यातून किरण अन् प्रकाशाची वर्तुळे प्रक्षेपित होत असल्याचे दिसणे आणि त्यांमध्ये सप्तरंग दिसणे

१ इ ६. छायाचित्रांत लिंगदेह (ऑर्ब) दिसणे : प.पू. डॉक्टर आणि सनातन संस्था यांवर येणार्‍या संकटांच्या निवारणार्थ केलेल्या दशप्रणवी गायत्री हवनाच्या वेळी छायाचित्रांत मोठ्या संख्येने चांगले अन् त्रासदायक लिंगदेह (ऑर्ब) दिसणे

१ ई. वायूतत्त्व

१ ई १. लादी गुळगुळीत होणे

अ. वर्ष २०१० मध्ये प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील लादी गुळगुळीत झाल्याचे लक्षात येणे

आ. वर्ष २०१२ मध्ये रामनाथी आश्रमातील बर्‍याच ठिकाणची लादी गुळगुळीत झाल्याचे आढळणे

इ. प.पू. डॉक्टर सेवा करतात, त्या ठिकाणची, तसेच आश्रमांतील संतांच्या खोलीतील लादीही गुळगुळीत होणे

१ ई २. प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील, तसेच स्नानगृहातील भिंतींना स्पर्श केल्यावर हाताला कंपने जाणवून मन आनंदी किंवा निर्विचार बनणे

अ. काही साधकांना भिंतीच्या आत जात आहोत, असे वाटणे

आ. काही साधकांना भिंतीकडून चैतन्य मिळत आहे, असे वाटणे

१ ई ३. छायाचित्रे जिवंत झाल्याप्रमाणे जाणवणे आणि त्यांचे डोळे अन् इतर अवयव हलतांना दिसणे

अ. सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या चित्रातील त्याचे डोळे आणि अन्य अवयव यांमध्ये हालचाल झालेली जाणवणे. त्याचप्रमाणे शिव आणि अन्य देवता यांच्या चित्रांमध्येही हालचाल जाणवणे अन् देवता प्रत्यक्ष आपल्यासमोर उभ्या आहेत, असे वाटणे

आ. प.पू. डॉक्टरांच्या खोलीत असलेल्या देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे कोणत्याही दिशेने पाहिले असता पुढील सूत्रे जाणवतात.

१. प.पू. भक्तराज महाराज बुब्बुळे, तोंडावळा आणि खांदे फिरवून आपल्याकडे पहात आहेत, असे जाणवते.

२. काही सेकंदांनी छायाचित्रातील त्यांची काठी मागेपुढे होतांना जाणवते.

३. ते श्‍वास घेत असल्याचे जाणवते.

४. त्यांचा डावा हात छायाचित्राच्या चौकटीच्या (फ्रेमच्या) बाहेर असल्याचे जाणवते.

इ. संत आणि साधक यांच्या छायाचित्रांंत जिवंतपणा जाणवणे

१ ई ४. प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील वस्तू, भिंतींवरील आकृत्या आणि भिंती, तसेच संपूर्ण आश्रमही हलतांना जाणवणे

अ. १८.८.२०१२ पासून शौचालयातील खिडकीच्या कट्ट्यावर ठेवलेली प्लास्टिकची बाटली थरथरत खाली पडणे

आ. हस्तप्रक्षालनपात्रावर (बेसीनवर) टांगलेला २ किलो वजनाचा आरसा आपोआप हलणे

इ. खिडकीवर अडकवलेल्या योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या रुद्राक्षाच्या माळेकडे पाहिल्यावर ती हलतांना दिसणे

ई. लोखंडी कपाटाच्या वर ठेवलेल्या अ‍ॅक्रिलिकच्या खोक्याची वरची बाजू खाली-वर होतांना दिसणे

उ. प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील आणि आश्रमातील अन्य ठिकाणी असलेल्या भिंती अन् भूमी यांवर उमटलेल्या एखाद्या बिंदूकडे एकाग्रतेने पाहिले असता तो वेगाने इकडे तिकडे, कधी घड्याळाच्या दिशेने, तर कधी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतांना दिसणे आणि त्याची हालचाल काही वेळा वेगवान, तर काही वेळा मंद गतीने होणे

उ १. एखादा बिंदू समोरून भिंतीवर असल्याचे दिसले, तरी बाजूने पाहिल्यास तो भिंतीपासून थोडा दूर असल्याचे दिसणे

ऊ. खोलीतील भिंतीकडे १ मिनिट एकटक पाहिल्यावर भिंत श्‍वास घेत असल्याप्रमाणे जाणवणे

ए. प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील शौचालयातील भिंतीच्या एखाद्या लादीच्या कडेच्या थोड्या भागाकडेे पाहिल्यास ती कड तरंगांप्रमाणे हलतांना दिसणे, तर त्या कडेच्या मोठ्या भागाकडे पाहिल्यास तो भाग वर-खाली होतांना दिसणे

ऐ. काठी किंवा भिंतीची कड यावरून वरून खाली आणि खालून वर अशी दृष्टी फिरवत राहिल्यास ती कड नागमोडी हलतांना दिसणे

ओ. प.पू. डॉक्टरांच्या रहात्या खोलीत हस्तप्रक्षालनपात्रावरील (बेसिनवरील) दिव्याकडे पाठ करून डोळे बंद करून उभे राहिले, तरीही पाठीमागून ढकलल्यासारखे वाटणे

औ. प.पू. डॉक्टरांच्या रहात्या खोलीतील चारही बाजूंच्या भूमीकडे पाहिले असता भूमी मागे-पुढे आणि वर-खाली हलतांना जाणवणे

अं. प.पू. डॉक्टरांच्या खोलीचे दार बंद असतांनाही दाराची कड उघडल्याप्रमाणे हलत असल्याचे जाणवणे आणि कोणीतरी दार उघडून आत येत आहे, असे वाटणे

क. प.पू. डॉक्टरांच्या खोलीमध्ये उभे राहिल्यावर आपण पडू, असे जाणवणे

१ उ. आकाशतत्त्व

१ उ १. सूक्ष्म-नाद ऐकू येणे

अ. प.पू. डॉक्टरांच्या खोलीत आणि आश्रमात अन्यत्र सनई, मृदुंग इत्यादींचे सूक्ष्म-नाद ऐकू येणे

आ. वर्ष २०१४ मध्ये एक दिवस प.पू. डॉक्टरांच्या किंवा त्यांच्या बाजूच्या खोलीमध्ये असतांना कानांपासून ४ – ५ सें.मी. अंतरावर दोन्ही हातांचे तळवे धरले असता एक वेगळ्या प्रकारचा सलग सूक्ष्म-नाद ऐकू येणे अन् काही दिवसांनी हा नाद ऐकतांना कानांना दडे बसण्यास आरंभ होणे

इ. कोणीतरी हाक मारत आहे, असे वाटणे; परंतु वळून पाहिले असता कोणीही नसणे

ई. प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील शौचालयातील नळाला पाणी सोडले असता, त्यातून येणारा नाद कोणीतरी तमिळ भाषेमध्ये मंत्रपठण केल्याप्रमाणे जाणवणे

१ उ २. प.पू. डॉक्टरांच्या खोलीचे आकारमान वाढून खोली भव्य वाटणे

अ. प.पू. डॉक्टरांच्या खोलीत कडेला उभे राहून संपूर्ण खोलीकडे काही सेकंद पाहिल्यास खोली पुष्कळ मोठी वाटणे, तर काही जणांना खोलीच्या भिंती न दिसता सर्वत्र आकाशच असल्याप्रमाणे दिसणे

आ. काही साधकांना खोलीत उभे राहिल्यावर आपण हवेत तरंगत आहोत, असे वाटणे

 

२. झाडे

झाडांची फळे आणि फुले आश्रमाच्या दिशेने अधिक प्रमाणात येणे

२ अ. आश्रमाच्या परिसराबाहेर रस्त्यालगत असलेल्या आंब्याच्या झाडाला गेल्या ३ – ४ वर्षांपासून आश्रमाच्या बाजूला पुष्कळ आंबे लागत असणे

२ आ. वर्ष २०१४ मध्ये आश्रमाच्या परिसरात असलेल्या पारिजातकाच्या झाडाची वाढ आश्रमाच्या दिशेने प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या बाजूला अधिक झाल्याचे लक्षात येणे, तसेच त्या भागावर वर्षभर फुलेही अधिक प्रमाणात येणे (सर्वसाधारणपणे पारिजातकाच्या झाडाला ऑगस्ट ते जानेवारी या महिन्यांत फुले येतात.); मात्र २९.७.२०१६ या दिवसापासून प.पू. डॉक्टरांची प्रकृती ठीक नसतांना त्या पारिजातकाच्या झाडाची हिरवीगार पाने पुष्कळ प्रमाणात गळू लागणे आणि २ मासांच्या (महिन्यांच्या) कालावधीमध्ये त्याची सर्वच पाने गळून जाऊन तो सुकणे; पण महर्षींच्या कृपाशीर्वादाने आणि त्यांनी सांगितलेल्या उपायांमुळे १५.१०.२०१६ या दिवशी त्याला पुन्हा पालवी फुटणे आणि १२.११.२०१६ या दिवशी त्याच्या खोडावर दैवी कण दिसणे

 

३. आश्रम परिसरात शुभसंकेतदर्शक प्राणी आणि पक्षी दिसणे

३ अ. आश्रमाच्या परिसरामध्ये गाय, वानर, मुंगूस, घोरपड, भारद्वाज, गरूड यांसारखे जीव वावरतांना साधकांना दिसणे

३ आ. फुलपाखरे : आश्रमात फुलपाखरे येण्याचे आणि ती साधकांच्या अंगावर बसण्याचे प्रमाण वाढणे

 

४. नवनिर्मिती

४ अ. प.पू. डॉक्टर, संत आणि साधक यांच्या देहावर, तसेच
आश्रमातील लाद्यांवर अन् अन्य ठिकाणी आपोआप ॐ उमटणे

१. आश्रमातील लाद्यांवर ॐ उमटणे

२. खाद्यपदार्थांवर ॐ उमटणे, उदा. पोळी, वांग्याचे काप इत्यादी

४ आ. पूर्वी प.पू. डॉक्टरांसाठी वापरलेला अन्नपदार्थ ठेवण्याचा डबा वर्ष २००९ ते वर्ष २०१३ या कालावधीत संग्रही ठेवला असता त्यात रव्यासारखे दिसणारे चमचाभर पांढरे कण आपोआप निर्माण झालेले दिसणे आणि त्या कणांमध्ये थोडे चंदेरी दैवी कणही असणे

४ इ. दैवी कण मिळणे

१. प.पू. डॉक्टरांच्या हातावर आणि साधकांच्या देहावर दैवी कण दिसणे

२. साधकांच्या वापरातील विविध वस्तूंवर दैवी कण दिसणे

३. प.पू. डॉक्टरांच्या खोलीमध्ये आणि आश्रमात इतर ठिकाणी सूक्ष्मातून दैवी कणांचा वर्षाव होत असल्याचे दिसणे

४. प.पू. डॉक्टरांच्या खोलीत आणि बाहेरील वातावरणात पांढर्‍या रंगाचे असंख्य संख्येने सूक्ष्मकण दिसणे

 

५. सात्त्विक बालके

साधकांच्या पोटी सात्त्विक बालके जन्माला येणे आणि जन्मतःच त्या बालकांचा आध्यात्मिक स्तर उच्च, म्हणजे ५० टक्के किंवा त्याहून अधिक असणे (सध्या कलियुगात साधना न करणार्‍या सर्वसामान्य व्यक्तीचा आध्यात्मिक स्तर केवळ २० टक्केच असतो आणि ईश्‍वरप्राप्ती झालेल्या, म्हणजे मोक्ष मिळालेल्या व्यक्तीचा आध्यात्मिक स्तर १०० टक्के असतो.)

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२४.११.२०१६)

 

वैज्ञानिकांना साहाय्यासाठी विनंती !

सनातनच्या आश्रमांमध्ये वरीलप्रमाणे अनेक बुद्धीअगम्य घटना घडत असतात. या घटनांमागील वैज्ञानिक कारण काय आणि यासंदर्भात अधिक संशोधन करण्यासाठी कोणत्या उपकरणांचा वापर करावा ?, हे समजण्यासाठी वैज्ञानिकांनी साहाय्य करावे, ही विनंती !

संपर्क : श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर

इ-मेल : [email protected]