परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा निर्धार केला असल्याने ते होईलच ! – पू. स्वामी सर्वानंद सरस्वती

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. चारुदत्त पिंगळे
यांनी घेतली देहलीच्या वसंतकुंज येथील पू. स्वामी सर्वानंद सरस्वती यांची भेट !

Pu_pingale_kaka
पू. चारुदत्त पिंगळे (डावीकडे) आणि पू. स्वामी सर्वानंद सरस्वती

देहली : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. चारुदत्त पिंगळे यांनी येथील वसंतकुंजमध्ये रहाणारे पू. स्वामी सर्वानंद सरस्वती यांची भेट घेतली आणि समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. या वेळी पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी स्वामीजींना सनातनच्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येण्याचे निमंत्रण दिले. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात स्वामीजी म्हणाले, त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा निर्धार केला असल्याने ते होईलच.

या वेळी स्वामीजी पुढे म्हणाले, मनुष्यामध्ये नकारात्मकता आहे, ती न्यून होण्यासाठी मनुष्याने सत्त्वगुण वाढवणे आवश्यक आहे. ज्यांच्या मनात शंका असतात त्यांना कधी यश प्राप्त होत नाही. समाजातील साधूंपैकी अनेक जण साधूचा वेश परिधान करून हिंदु धर्माला हानी पोहचवणारे आहेत. साधूंनी साध्या वेशात राहिले पाहिजे, कोणतेही अवडंबर नसावे.

या वेळी स्वामीजींना सप्तर्षि जीवनाडीवाचन आणि सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात झालेल्या उच्छिष्ट गणपती यज्ञ यांची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. ते पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला आणि म्हणाले, मला या ध्वनीचित्रफीती द्या. मी विदेशात गेल्यावर तिकडे सर्वांना दाखवीन. सर्वांना आपल्या धर्माची महानता लक्षात येईल. शेवटी स्वामीजी म्हणाले, आपल्या कार्यात सर्वतोपरी साहाय्य करीन. मी आपल्या कार्यात पूर्ण समर्पित आहे. माझ्या या सभागृहात तुम्ही केव्हाही कार्यक्रम घेऊ शकता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात