श्रीकृष्णभक्तीचा व्यष्टी साधनेतील टप्पा गाठल्यानंतर समष्टी भाव, तळमळ आदी गुणांमुळे समष्टी सेवेचे दायित्व सहजतेने पेलणार्‍या गोपीभावातील साधिका !

dipali_matkar_sept2014_col
कु. दीपाली मतकर

गोपींसारखी भक्ती करणे सातत्याने जमणे, हा साधनेतील शेवटचा टप्पा नसून तो व्यष्टी साधनेतील एक टप्पा गाठल्याप्रमाणे आहे. सध्याच्या काळात व्यष्टी साधनेला ३० टक्के, तर समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व आहे. त्यामुळे ‘धर्मप्रसार करणे, समाजाला धर्मशिक्षण देऊन धर्मपालन करायला सांगणे, त्याचप्रमाणे त्यांना साधना सांगून साधनेकडे वळवणे’ इत्यादी समष्टी साधना करणे आवश्यक आहे.

trupti_gavade
कु. तृप्ती गावडे

सनातन संस्थेतील गोपीभाव असणार्‍या साधिकाही आता समष्टी साधना करू लागल्या आहेत. वयाने लहान असलेल्या, विशेष शिक्षण झालेले नसतांना आणि समष्टीचा काहीच अनुभव नसतांनाही श्रीकृष्णकृपेने त्यांना ही साधना चांगल्या रितीने जमू लागली आहे. अशा गोपीभावातील आणखीही काही साधिका धर्मकार्यासाठी सिद्ध होत आहेत.

(साधकांनो, आपणही आपल्यात गोपीभाव वाढवून राष्ट्र-धर्म कार्यासाठी सिद्ध होऊया !)