देहली येथे ज्योतिष समाधानपिठाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेकडून ग्रंथप्रदर्शन

ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतांना ज्योतिषी आणि मान्यवर

नवी देहली – येथील महाराजा अग्रसेन भवन, विकासपुरीमध्ये २४ एप्रिल २०१६ या दिवशी ज्योतिष समाधानपिठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आलेले प्रसिद्ध ज्योतिषी आणि अन्य मान्यवर यांनी या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली.

१. वैदिक ज्ञान आणि ज्योतिष विद्या यांविषयी समाजात जागृती व्हावी, ज्योतिष विद्येचा लाभ करून घेऊन जीवनात येणार्‍या समस्या सुटाव्यात, विविध रोग निवारण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा वापर कसा करावा, नक्षत्र, ग्रह यांचा मनुष्यजीवनावर कसा परिणाम होतो, त्याविषयी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, आदींविषयी या कार्यक्रमामध्ये प्रबोधन करण्यात आले.

२. काही ज्योतिष संस्थानी उपस्थित लोकांना विनामूल्य कुंडली बनवून दिल्या. या कार्यक्रमात आचार्य ए.के. डब्ल्यू. कश्यप (संस्थापक आणि अध्यक्ष ज्योतिष समाधान पीठ), पं. अजय भांबी (ज्योतिर्विद), पं. जयप्रकाश शर्मा (लाल धागेवाले), श्रीमती रीना भाटिया (हस्तरेखा तज्ञ – आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त) पं. अक्षयकुमार शर्मा (आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त ज्योतिषतज्ञ), आदी अनेक प्रसिद्ध ज्योतिषी, वास्तूतज्ञ, हस्तविज्ञान आणि कुंडली यांद्वारे भविष्य वर्तवणारे ज्योतिषी उपस्थित होते. कार्यक्रमात सनातन संस्थेने प्रदर्शन लावून सहभाग घेतल्याविषयी पिठाकडून सनातनचे साधक श्री. सुदर्शन गुप्ता यांचा प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

क्षणचित्र

एका ज्योतिषाचार्यांनी सनातनचे स्वभावदोष आणि अहं निर्मूलन विषयक ग्रंथ स्वत:हून खरेदी केले आणि म्हणाले, जीवनातील समस्या दूर करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन अत्यंत आवश्यक आहे.