परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विविध क्षेत्रांतील संशोधनकार्य

विश्‍वकल्याणार्थ सनातन हिंदु धर्मातील वैज्ञानिकता सिद्ध करणारी परात्पर गुरूंची अमूल्य देणगी !

अखिल मानवजातीला ‘आनंदप्राप्ती’ हे मूलभूत ध्येय साध्य करता यावे, यासाठी अध्यात्म आणि हिंदु धर्म यांची महती आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत सांगण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक संशोधनकार्य आरंभले ! अध्यात्म हे अनुभूतीचे शास्त्र असूनही आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या साहाय्याने अध्यात्मातील ‘का’ आणि ‘कसे’ यांची शास्त्रशुद्ध कारणमीमांसा सांगणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकमेवाद्वितीय संत आहेत !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून मिळत असलेल्या उत्तरांच्या माध्यमातून त्यांच्या संशोधनकार्याचा प्रारंभ झाला. आता विविध वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्यानेही संशोधन चालू आहे. या परिपूर्ण आध्यात्मिक संशोधनाचे निष्कर्ष विविध माध्यमांतून आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत सर्वांना विनामूल्य उपलब्ध करून दिल्याने आज जगभरातील सहस्रो व्यक्ती साधना अंगीकारून त्याचा लाभ अनुभवत आहेत. या अद्भुत कार्याचा धावता मागोवा…

वाईट शक्तींच्या संदर्भात न भूतो न भविष्यती
असे संशोधन करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

स्वतःचा देह, तसेच वापरातील वस्तू यांच्या दैवी पालटांविषयी संशोधनकार्य

ppdr_om_nail_700
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नखांवर उमटलेले ॐ चे शुभचिन्ह

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःचा देह, त्वचा, केस, नखे आणि वस्तू यांमध्ये होत असलेल्या दैवी पालटांविषयी वेळोवेळी छायाचित्रे काढून आणि लिखाण करून त्या पालटांचा शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोनांतून अभ्यास केला. या संशोधनाद्वारे त्यांनी आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांच्या संदर्भात होणार्‍या दैवी पालटांचे शास्त्र उलगडले.

 

स्वतःच्या महामृत्यूयोगाचा संशोधनात्मक अभ्यास

ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष १९९८ पासून आजपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जीवनात अनेक महामृत्यूयोग आले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांचे देहधारी अस्तित्व आवश्यक असल्याने त्यांचा महामृत्यूयोग टाळण्यासाठी स्वतःहून विविध संत आणि महर्षि आध्यात्मिक साहाय्य करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या महामृत्यूयोगाच्या काळातील स्वतःच्या प्रकृतीचे आधुनिक वैद्यकशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांच्या दृष्टीतून तुलनात्मक अध्ययन करून अध्यात्मशास्त्राचे श्रेष्ठत्व दाखवून दिले. (या विषयावरील ग्रंथमालिका लवकरच प्रकाशित होणार आहे.)

 

स्वतः रहात असलेल्या वास्तूमध्ये आपोआप होणार्‍या पालटांविषयी संशोधन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निवासस्थान असलेली वास्तू, म्हणजे रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेचा आश्रम ! या आश्रमात होणारे दैवी पालट (उदा. लाद्यांवर ॐ उमटणे), तसेच वाईट शक्तींचे तोंडवळे उमटणे यांचे वैज्ञानिक पद्धतीने संशोधन केले जात आहे. संतांच्या वास्तूमध्ये होणार्‍या पालटांमागील शास्त्र समाजाला कळावे, हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हे संशोधन करण्यामागील उद्देश आहे.

ppdr_research_3_300
सनातनच्या आश्रमात निर्माण झालेले अत्तर

ppdr_research_om_300
सनातन आश्रमातील लादीवर उमटलेला ॐ

 

पंचमहाभूतांमुळे घडणार्‍या बुद्धीअगम्य घटनांचा अभ्यास,
तसेच वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांमुळे घडणार्‍या बुद्धीअगम्य घटना, उदा. साधकांच्या वस्तूंना दैवी सुगंध येणे, काशाच्या वाटीत आपोआप अत्तर निर्माण होणे, दैवी कण दिसणे, देवतांच्या आणि इतर चित्रांचा रंग पालटणे, वैशिष्ट्यपूर्ण नाद ऐकू येणे, वास्तूतील लाद्या पारदर्शक होणे आदींविषयी वैज्ञानिक पद्धतींद्वारे संशोधन व्हावे, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले प्रयत्नशील आहेत.

 

अ. वैज्ञानिक उपकरणांद्वारे चालू असलेले संशोधनकार्य

ppdr_research_1_700
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुंडलिनीचक्रांच्या स्पंदनांचा अभ्यास लेकर एंटिनाद्वारे करतांना श्री. मयांक बडजात्या (१३.६.२०१३)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु आचार, आहार, वेशभूषा, केशभूषा, धार्मिक कृती, यज्ञ, नामजप, मुद्रा, न्यास, श्रीयत्रं आदींचा व्यक्ती, वस्तू, वास्तू आणि वातावरण यांच्यावर होणार्‍या परिणामांविषयी विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन चालू आहे. यात इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग, रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग, इलेक्ट्रो-मॅग्नेटिक फिल्ड, लेकर अँटिना, किर्लीयन फोटोग्राफी, युनिव्हर्सल थर्मल स्कॅनर, थर्मल इमेजिंग, पिप इत्यादी वैज्ञानिक उपकरणांचा समावेश आहे.

लोलकाच्या संदर्भातील संशोधन

परात्पर गुरु डॉक्टरांनी लाकूड, विविध धातू, दगड, स्फटीक, रुद्राक्ष आदी विविध घटकांपासून बनवलेले लोलक आणि लोलकाचा दोर म्हणून विविध धातूंच्या साखळ्या, रेशीम, लोकर, सूत अन् केळीच्या झाडाचे सोप यांचा वापर करून अनेक योग केले. त्यांतून केळीच्या झाडाच्या सोपाच्या धाग्याला रुद्राक्ष बांधून बनवलेला लोलक सर्वाधिक सात्त्विक असतो, हे त्यांनी शोधून काढले. अशा सात्त्विक लोलकाद्वारे परीक्षण केल्यास आणि लोलक-परीक्षण करणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास नसलेली अन् ६० टक्के आध्यात्मिक पातळीची असल्यास सर्वाधिक अचूक उत्तरे मिळतात, हेसुद्धा परात्पर गुरु डॉक्टरांनी शोधून काढले.

 

आध्यात्मिक संग्रहालयासाठी आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे जतनकार्य

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक संग्रहालयाची निर्मिती केली जात आहे. या संग्रहालयासाठी भारतातील तीर्थक्षेत्रे, देवळे, संतांचे मठ, संतांची समाधीस्थाने, ऐतिहासिक स्थळे इत्यादी ठिकाणच्या अध्यात्मशास्त्रदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, माती, पाणी आदी, तसेच पंचमहाभूतांचा परिणाम दर्शवणार्‍या सहस्रावधी वस्तू, छायाचित्रे आणि १६ सहस्रांहून अधिक ध्वनीचित्रफिती यांचे आजपर्यंत जतन करण्यात आले आहे. अशा अनेकविध आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे जतन करून परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मविश्‍वाच्या इतिहासात एक नवा अध्यायच लिहीत आहेत.

 

प्राणी आणि वनस्पती यांचा सात्त्विकतेच्या दृष्टीने अभ्यास

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली फुलपाखरे, कोंबडा, पोपट, गाय, घोडा आदींच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करण्यात आले आहे. तसेच तुळस, कुरुक्षेत्रातील अक्षयवट, शुकताल येथील वटवृक्ष, भालकातीर्थ येथील पिंपळ, देहू येथील नांदुरकी आदी वृक्षांचा सात्त्विकतेच्या दृष्टीने अभ्यास करण्यात आला आहे.

 

दैवी (सात्त्विक) बालके ओळखणे आणि तत्संबंधी संशोधन

सात्त्विक कृती, साधना, देवता आदी आध्यात्मिक आवडी असलेल्या बालकांचे दैवी गुण पाहून ती स्वर्ग, महर्, जनादी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आली असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्वप्रथम सांगितले. त्यांनी अशा बालकांचे त्या वयातील आध्यात्मिक स्तराचे असामान्य विचार अन् आचरण सर्वांना कळावे, यासाठी त्यांच्याविषयीच्या ध्वनीचित्र-चकत्या (डीव्हीडी) प्रकाशित केल्या आहेत. सध्या बालकांच्या गुणवैशिष्ट्यांवरून ते कुठल्या उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आले आहेत, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते कितव्या वर्षी संत होऊ शकतात ? आदींसंबंधीचे संशोधन चालू आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले अशा बालसाधकांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र चालवणारी भावी पिढी सिद्ध करत आहेत.

 

ज्योतिषशास्त्र आणि नाडीज्योतिष यांच्याद्वारे संशोधनकार्य

अ. ज्योतिषशास्त्राद्वारे संशोधन

दैवी बालके, सनातनचे संत, आध्यात्मिक त्रास असणारे आदींच्या जन्मपत्रिकांचा अभ्यास करून त्यांच्या जीवनातील विशेष योग अभ्यासणे, देशभर घडणार्‍या विविध आध्यात्मिक घटनांची ज्योतिषशास्त्रीय कारणमीमांसा करणे आदी प्रकारचे संशोधनकार्य परात्पर गुरु
डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

आ. हस्तसामुद्रिक आणि पादसामुद्रिक शास्त्रांद्वारे संशोधन

मनुष्याच्या शरिरावरील भिन्न लक्षणे पाहून त्याचा स्वभाव, गुणदोष, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांविषयी निदान करण्याची सामुद्रिक विद्या प्राचीन काळापासून भारतात प्रचलित आहे. हस्तसामुद्रिक शास्त्रात हाताच्या, तर पादसामुद्रिक शास्त्रात पायाच्या तळपायावरील रेषा, उंचवटे आणि अन्य चिन्हे यांचा अभ्यास करतात. या शास्त्रांद्वारे आध्यात्मिक संशोधन करण्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास चालू आहे.

इ. नाडीज्योतिषशास्त्राद्वारे संशोधन

प्राचीन काळी विविध ऋषिमुनींनी नाडीपट्ट्यांमध्ये लिहून ठेवलेल्या भविष्यानुसार मानवी जीवनात घडणार्‍या घटनांचा अभ्यास, दोन निराळ्या नाडीपट्ट्यांमध्ये महर्षींनी एकाच व्यक्तीविषयी लिहिलेल्या भविष्याचा तुलनात्मक अभ्यास, जीवनातील संभाव्य अप्रिय घटना टाळता याव्यात, यासाठी नाडीभविष्यात सांगितलेल्या उपायांमुळे होणारे लाभ आदींविषयी संशोधन करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ४ – ५ साधकांचे एक पथक भारतभर भ्रमण करत आहे.

फलज्योतिषशास्त्र

यात उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले जीव, सनातनचे संत, आध्यात्मिक त्रास असणार्‍या व्यक्ती आदींच्या जन्मपत्रिकांचा अभ्यास करून त्यांच्या जीवनातील विशेष योग अभ्यासणे, देशभर घडणार्‍या विविध आध्यात्मिक घटनांची ज्योतिषशास्त्रीय कारणमीमांसा करणे आदी संशोधनकार्य चालू आहे.

सूक्ष्मज्ञानाच्या संदर्भातील कार्य

ppdr_research_2_700
कु. प्रियांका लोटलीकर यांनी काढलेले सूक्ष्मातील वैशिष्ट्ये दर्शवणारे चित्र पडताळतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (२००७)

परात्पर गुरु डॉ. आठवले वर्ष १९८२ पासून सूक्ष्मज्ञानाच्या (टीप) संदर्भात अध्ययन करत आहेत. वर्ष १९८२ पासून, म्हणजे साधनेत येण्याच्या आधीपासूनच त्यांना सूक्ष्मातून कळू लागले. आरंभीच्या काळात एखादा प्रसंग किंवा प्रक्रिया याविषयी हो किंवा नाही, असे उत्तर सूक्ष्मातून कळायचे. साधनेत आल्यानंतर त्यांना या उत्तरांचा कार्यकारणभाव कळू लागला. त्यांनी अध्यात्मातील विविध विषयांच्या संदर्भात पृथ्वीवर उपलब्ध नसलेले नाविन्यपूर्ण ज्ञान ध्यानातून (सूक्ष्मातून) मिळवले आहे आणि हे ज्ञान सनातनच्या ग्रंथांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी स्वतः सूक्ष्मज्ञानेंद्रिये कार्यरत असलेल्या साधकांना सूक्ष्मातील ज्ञान ग्रहण करणे, सूक्ष्म-परीक्षण करणे, सूक्ष्म-चित्रे रेखाटणे इत्यादी कृती शिकवल्या. त्यामुळे आज सनातनच्या अनेक साधकांना सूक्ष्मातील कळते.

(टीप – सूक्ष्मज्ञान : पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांचा वापर न करता मिळालेले ज्ञान.)

 

वाईट शक्तींच्या त्रासांवर उपाय करण्याच्या उपायपद्धतींविषयी संशोधन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओढ पहिल्यापासून ‘साध्या’कडे (end result कडे) नाही, तर त्या साध्यामागील कारणे जाणण्याकडे (wanting to know the basic laws) अधिक आहे. हे सूत्र आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. वर्ष २००० पासून सनातनच्या साधकांना सूक्ष्मातील वाईट शक्तींमुळे त्रास होऊ लागला. त्यावर आरंभी अशा प्रकारच्या त्रासांवर आध्यात्मिक उपाय करणार्‍या अनेक संतांनी सनातनच्या साधकांवर उपाय केले. त्या उपायांना काही प्रमाणात यशही आले; परंतु हे उपाय चालू असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे लक्ष केवळ ‘साधकांचे त्रास कमी होत आहेत ना ?’ यावर मर्यादित न रहाता, ‘ते संत नेमके काय करत आहेत’, ‘संतांच्या कृतीमुळे सूक्ष्म स्तरावर कोणती प्रक्रिया घडते’, ‘साधकांच्या त्रासात घट नेमकी कशामुळे होते’, याकडे असायचे. वर्ष २००० ते वर्ष २००३-२००४ पर्यंत अनेक संतांनी केलेल्या उपायांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बारकाईने अभ्यास केला.

‘वाईट शक्तींचा त्रास असणार्‍यांवर नामजपादी उपाय कसे करावे’, हे शिकण्यासाठी एका संतांकडे ते सतत ३ मास प्रतिदिन जात राहिले. त्यानंतर त्यातून शिकायला मिळालेल्या मूलभूत सूत्रांवर आधारित त्यांनी ‘वाईट शक्तींचे त्रास म्हणजे नेमके काय’, ‘त्याचे प्रकार काय असतात’, ‘त्यावर उपाय कसे करायचे’, ‘संतांनी प्रत्यक्ष केलेल्या नामजपादी उपायांना साधक वैयक्तिक स्तरावर करावयाच्या कोणत्या उपायांची जोड देऊ शकतात’ आदी सूत्रांचा बारकाईने अभ्यास केला. या अभ्यासातून सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या विश्‍वाविषयीच्या ज्ञानाचे एक मोठे दालन त्यांनी जगासाठी खुले केले. वाईट शक्तींविषयीची, तसेच त्यांचा त्रास कसा ओळखायचा, त्यांच्या त्रासावरील पीडित व्यक्तीने स्वतः करावयाच्या विविध उपायांची माहिती सनातनची नियतकालिके, ग्रंथ, ध्वनीचित्रफिती आणि संकेतस्थळे यांच्या माध्यमातून सर्व जगाला विनामूल्य उपलब्ध करून दिली. आज ही माहिती जगभरातील सर्वांना घरबसल्या उपलब्ध झाली आहे. अशा रितीने या अत्यंत क्लिष्ट अशा सूक्ष्मातील समस्या, तसेच त्यावरील उपाय यांविषयीही त्यांनी प्रत्येक स्तरावर मूलभूत शास्त्र शोधून काढल्याने या समस्येने पीडित असलेल्या जगभरातील व्यक्तींना उपायांच्या संदर्भात स्वयंपूर्ण केले.

(आध्यात्मिक उपायांविषयीची सविस्तर माहिती सनातनच्या आध्यात्मिक त्रासनिवारणासाठी उपाय या ग्रंथमालिकेत दिली आहे.)

वाईट शक्तींच्या संदर्भातील संशोधन

वाईट शक्तींचे प्रकार, त्यांचे कार्य, मानवी जीवन आणि वातावरण यांवर होणारे त्यांचे परिणाम, त्यांनी मानवाला त्रास देण्यामागील कारणे अन् त्या त्रासांची लक्षणे आदी विषयांवर परात्पर गुरु डॉक्टर वर्ष २००० पासून संशोधन करत आहेत. यासंदर्भात सहस्रो ध्वनी-चित्रफिती आणि शेकडो ग्रंथ सिद्ध होतील इतकी माहिती त्यांनी संग्रहित केली आहे. या संशोधनाद्वारे त्यांनी वाईट शक्तींच्या त्रासांवर उपाय करण्याच्या अनेक पद्धती शोधून काढल्या आणि साधकांनाही त्या शिकवल्या. या पद्धतींविषयीची माहिती नियतकालिक सनातन भातमधून, तसेच ssrf.org या संकेतस्थळावरही देण्यात येते.

आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचा शोध

१. देवतांच्या सात्त्विक नामजप-पट्ट्यांचे उपाय

देवतेच्या सात्त्विक नामजप-पट्टीमधून त्या देवतेची शक्ती प्रक्षेपित होत असते. या शक्तीमुळे आध्यात्मिक उपाय होतात. परात्पर गुरु डॉक्टरांनी नामजप-पट्ट्यांच्या उपयोगाच्या संदर्भात वेगवेगळे प्रयोग केले आणि नामजप-पट्ट्यांच्या साहाय्याने आध्यात्मिक त्रास दूर करण्याच्या पुढील पद्धती शोधून काढल्या.

अ. वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी व्यक्तीने रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या चारही बाजूंना नामजप-पट्ट्यांचे मंडल घालणे (अधिक विवेचनासाठी वाचा : ग्रंथ शांत निद्रेसाठी काय करावे ?)

आ. वास्तूशुद्धीसाठी वास्तूमध्ये नामजप-पट्ट्यांचे छत सिद्ध करणे

इ. वाहनशुद्धीसाठी दुचाकी वाहनास पुढे आणि मागे नामजप-पट्ट्या लावणे, तर चारचाकी वाहनात नामजप-पट्ट्या चारही बाजूंना आणि छताला लावून कवच सिद्ध करणे (सनातनच्या स्थानिक वितरकांकडे वास्तूशुद्धी आणि वाहनशुद्धी यांसाठी आवश्यक असणारा नामजप-पट्ट्यांचा संच आणि त्या पट्ट्या लावण्याच्या पद्धतीसंबंधीचे पत्रक उपलब्ध असते.)

२. कुंडलिनीचक्रांच्या स्थानी देवतांची सात्त्विक चित्रे किंवा नामजप-पट्ट्या लावणे

ब्रह्मांडातील प्राणशक्ती मनुष्याच्या देहात कुंडलिनीचक्रांच्या माध्यमातून प्रक्षेपित होत असते. विशिष्ट कुंडलिनीचक्रांचा व्यक्तीला होणार्‍या विशिष्ट त्रासांशी संबंध असतो; म्हणून कुंडलिनीचक्रांच्या स्थानी उपाय केल्यास व्यक्तीचा त्रास लवकर घटण्यास साहाय्य होते. कुंडलिनीचक्रांच्या स्थानी देवतांची सात्त्विक चित्रे किंवा नामजप-पट्ट्या लावण्याने उपाय होतात, याचा शोध परात्पर गुरु डॉक्टरांनी लावला.

३. सनातन-निर्मित सात्त्विक गणेशमूर्तीला दक्षिणा घालणे

४. संतांनी बराच काळ निवास केलेल्या वास्तूत किंवा खोलीत बसून नामजपादी उपाय करणे

५. संतांनी बराच काळ वापरलेल्या वस्तूंचा आध्यात्मिक उपायांसाठी वापर करणे

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डोळ्यांची छायाचित्रे आणि त्यांच्या खोलीतील कपाटाचे छायाचित्र यांचा उपायांसाठी वापर करणे

७. पंचतत्त्वांनुसार उपाय

मानवी शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांपासून (महाभूतांपासून) बनलेले आहे. त्या त्या तत्त्वाच्या (महाभूताच्या) स्तरावर उपाय केल्यास त्या त्या तत्त्वाशी संबंधित त्रास दूर होण्यास साहाय्य होते. पंचतत्त्वांच्या स्तरावर उपाय करण्याविषयीचे विविध योग परात्पर गुरु डॉक्टरांनी पुढीलमाणे केले.

अ. पृथ्वीतत्त्वाचे उपाय

कपाळाला सात्त्विक कुंकू लावणे, सात्त्विक अत्तराचा सुगंध घेणे इत्यादी

आ. आपतत्त्वाचे उपाय

तीर्थ प्राशन करणे, खडे-मिठाच्या पाण्यात १५ मिनिटे दोन्ही पाय बुडवून ठेवणे इत्यादी

इ. तेजतत्त्वाचे उपाय

विभूती लावणे, तुपाच्या दिव्याच्या ज्योतीकडे काही वेळ एकटक पहाणे इत्यादी

ई. वायुतत्त्वाचे उपाय

सात्त्विक वस्तूने (उदा. मोरपिसाने) व्यक्तीवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे इत्यादी

उ. आकाशतत्त्वाचे उपाय

उ १. निरभ्र आकाशाकडे पहाणे, निरभ्र आकाशाखाली नामजपादी उपाय करणे

उ २. प.पू. भक्तराज महाराज किंवा अन्य संत यांच्या आवाजातील भजने ऐकणे

उ ३. रिकाम्या खोक्यांचे उपाय करणे : सूत्र  उ २ पहा.

विकार-निर्मूलनासाठी उपयुक्त असलेल्या उपायपद्धतींचा शोध

१. स्पर्शविरहित बिंदूदाबन (अ‍ॅक्युप्रेशर)

शारीरिक आणि मानसिक विकार दूर करण्यासाठी शरिरावर दाब देऊन बिंदूदाबन करण्याची पद्धत प्रचलित आहे. वर्ष २००७ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त ठरणारी स्पर्शविरहित बिंदूदाबन (अ‍ॅक्युप्रेशर) ही पद्धत शोधून काढली. (याविषयीचे विवेचन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी बिंदूदाबन या ग्रंथात केले आहे.)

२. रिकाम्या खोक्यांचे उपाय

रिकाम्या खोक्यात पोकळी असते अन् पोकळीत आकाशतत्त्व असते. परात्पर गुरु डॉक्टरांनी खोक्यातील आकाशतत्त्वामुळे होणार्‍या आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात स्वतः प्रयोग केले आणि साधकांकडूनही योग करवून घेतले. या संशोधनाच्या आधारे त्यांनी रिकाम्या खोक्यांचे उपाय ही उपायपद्धत शोधली. (याविषयी सविस्तर विवेचन ग्रंथ विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय (२ भाग) यात केले आहे. ही उपायपद्धत sanatan.org आणि ssrf.org या संकेतस्थळांवरही ठेवली आहे.)

३. नामजप-उपाय

विविध कारचे नामजप केल्यामुळे विविध कारचे शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्यास साहाय्य होते, यासंदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक प्रयोग करून पुढील गोष्टींचा शोध लावला.

अ. नामजपाची प्रयोगपद्धत

उच्च देवतांच्या नामजपांचे प्रयोग करून त्यांतून स्वतःचे त्रास दूर होण्यासाठीचा आवश्यक तो नामजप शोधणे

आ. उपायांसाठी उपयुक्त ठरणारे नामजप : शून्य, महाशून्य, निर्गुण आणि ॐ या निर्गुणवाचक शब्दांचे जप; ० ते ९ या अंकांचे जप अन् पंचमहाभूतांचे जप (उदा. श्री वायुदेवताय नमः।)

इ. नामजपाची परिणामकारकता वाढवणार्‍या पद्धती : नामजपाच्या आरंभी आणि / किंवा शेवटी १ किंवा २ ॐ लावणे, एक-आड-एक नामजप करणे (आधी पहिल्या नामाचा, नंतर दुसर्‍या नामाचा, नंतर पुन्हा पहिल्या नामाचा, त्यानंतर पुन्हा दुसर्‍या नामाचा अशा पद्धतीने नामजप करणे) (याविषयी सविस्तर विवेचन विकार-निर्मूलनासाठी नामजप (३ भाग) या ग्रंथात केले आहे.)

४. प्राणशक्तीवहन उपाय

मानवाच्या स्थूलदेहात रक्ताभिसरण, श्‍वसन, पचन, मज्जा इत्यादी विविध संस्था कार्यरत असतात. त्यांना कार्य करण्यासाठी जी शक्ती लागते, ती प्राणशक्तीवहन संस्था पुरवते. तिच्यात एखाद्या ठिकाणी अडथळा आल्यास संबंधित शरीरसंस्थेची (किंवा इंद्रियाची) कार्यक्षमता अल्प होऊन विकार निर्माण होतात. प्राणशक्तीवहन संस्थेत निर्माण झालेला अडथळा कसा शोधावा, तो दूर करण्यासाठी कोणता नामजप, मुद्रा आणि न्यास करावा इत्यादींविषयी परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःवर विविध प्रयोग केले आणि उपायपद्धतीच्या परिणामांचा अनुभव घेतला. या संशोधनाचा परिपाक म्हणून प्राणशक्तीवहन उपाय ही पद्धत अस्तित्वात आली. (याविषयी सविस्तर विवेचन ‘ प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे निर्माण होणार्‍या विकारांवरील उपाय (२ भाग) ‘ या ग्रंथात केले आहे.)

 वाईट शक्तींमुळे झालेल्या त्रासदायक पालटांविषयी,
तसेच चांगल्या शक्तींमुळे झालेल्या दैवी पालटांविषयी संशोधन

सनातनच्या रामनाथी आश्रमाची वास्तू आणि आश्रमातील अनेक वस्तू यांत वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे त्रासदायक, तर चांगल्या शक्तींमुळे अनेक दैवी पालट झाले आहेत. हे पालट पंचमहाभूतांच्या स्तरांवरील आहेत. वस्तूंना दुर्गंध येणे, त्यांचे रंग नकोसे वाटणे, त्यांचा स्पर्श नकोसा वाटणे, त्रासदायक नाद ऐकू येणे ही त्रासदायक पालटांची काही उदाहरणे आहेत. वस्तूंना सुगंध येणे, त्यांच्या रंगांत सुखद पालट होणे, त्यांचा स्पर्श सुखद वाटणे, भौतिक कारणाविना दैवी नाद ऐकू येणे, दैवी कण दिसणे, वास्तूतील लाद्या पारदर्शक होणे ही दैवी पालटांची काही उदाहरणे आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सांगण्यानुसार पालट झालेल्या अशा असंख्य वस्तू किंवा त्यांची छायाचित्रे संग्रही ठेवली आहेत. आध्यात्मिक संशोधनाद्वारे असे पालट घडण्यामागील कार्यकारणभाव शोधण्यात येत आहे.

 हिंदु धर्मातील आचार, धार्मिक
कृती आदींची उपयुक्तता सिद्ध करणारे संशोधन

धोतर-अंगरखा (सदरा) किंवा साडी परिधान करणे यासारखे हिंदु धर्मातील आचार, दोन्ही हात जोडून नमस्कार करणे यासारख्या धार्मिक कृती आदींमुळे व्यक्तीवर आध्यात्मिक स्तरावर कोणते चांगले परिणाम होतात; यज्ञयाग आदींतून चैतन्याची प्राप्ती कशी होते इत्यादींविषयी परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक संशोधन करण्यात आले आहे.

 प्रार्थना, नामजप, विविध
योगमार्ग आदींमुळे होणार्‍या लाभांविषयी संशोधन

प्रार्थना, नामजप, मंत्रजप, प्राणायाम, आसने, बंध, मुद्रा, न्यास, आध्यात्मिक यंत्रे (उदा. श्रीयंत्र), कुंडलिनीचक्रे, तसेच विविध योगमार्ग यांचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास अन् आध्यात्मिक गती यांच्या संदर्भात कोणता लाभ होतो, याचेही परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो व्यक्तींवर संशोधन करण्यात येत आहे.

विविध कलांचे सात्त्विक सादरीकरण होण्यासंदर्भात संशोधन

परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सनातनचे साधक-कलाकार आपापल्या कलेचे सात्त्विक सादरीकरण होण्याच्या संदर्भात सूक्ष्म-स्तरावरील अभ्यास आणि संशोधन करत आहेत. या संशोधनानुसार चित्रकला, मूर्तीकला आदी कलाक्षेत्रांतील साधक-कलाकार सात्त्विक कलाकृतीही बनवत आहेत.

१. चित्रकला आणि मूर्तीकला

परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेल्या देवतांच्या चित्रांत २७ ते २९.२ टक्के, तर श्री गणेशमूर्तीत २८.३ टक्के इतके त्या त्या देवतेचे तत्त्व आले आहे. (कलियुगात देवतेच्या चित्रात किंवा मूर्तीत अधिकाधिक ३० टक्के एवढेच त्या त्या देवतेचे तत्त्व येऊ शकते.) सध्या (मार्च २०१७) परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली श्री दुर्गादेवीचे मारक तत्त्व असलेली मूर्ती बनवण्यात येत आहे.

(श्री गणेशमूर्तीविषयीचे सविस्तर विवेचन श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार असावी ! या लघुग्रंथात केले आहे.)

२. अक्षरे आणि अंक यांचे लेखन

परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिलेली देवनागरी अक्षरे आणि अंक यांत ३१ टक्के सात्त्विकता आली आहे. (कलियुगात अक्षरे किंवा अंक यांच्यात जास्तीतजास्त ३० टक्केच सात्त्विकता येऊ शकते.) मुलांना अक्षरे आणि अंक योग्य कारे लिहिता यावेत, यासाठी सनातनने सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत हा ग्रंथ काशित केला आहे.

३. सात्त्विक रांगोळ्या

परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या साधिकांनी विविध देवतांची तत्त्वे आणि आनंद, शांती आदी स्पंदने आकृष्ट अन् क्षेपित करणार्‍या रांगोळ्यांच्या अनेक कलाकृती बनवल्या आहेत. या कलाकृती सात्त्विक रांगोळ्या (२ भाग) या ग्रंथात सिद्ध करण्यात आल्या आहेत. या रांगोळ्यांत सरासरी ३ ते ४ टक्के देवतेचे तत्त्व आणि स्पंदने आली आहेत, तसेच श्री गणेशाच्या एका रांगोळीत १० टक्के गणेशतत्त्व आले आहे. रांगोळ्यांत जास्तीतजास्त १० टक्के देवतातत्त्व आणि स्पंदने आणता येऊ शकतात. रांगोळ्या सिद्ध करणार्‍या साधकाचा भाव आणि आध्यात्मिक पातळी वाढत गेली की, हे माण वाढत जाते.

४. सात्त्विक मेंदी

परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या साधिकांनी विविध देवतांचे न्यूनतम २ टक्के तत्त्व असलेल्या मेंदीच्या कलाकृती निर्मिल्या आहेत. (कलियुगात मेंदीच्या कलाकृतीमध्ये जास्तीतजास्त ५ टक्के एवढे देवतातत्त्व येऊ शकते.) याविषयीचे अधिक विवेचन मेंदीच्या सात्त्विक कलाकृतींचे कार आणि सात्त्विक मेंदी या ग्रंथांत केले आहे.

५. संगीत आणि नृत्यकला

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध देवतांच्या नामजपांना त्या त्या देवतेचे तत्त्व आणि भाव जागृत करणार्‍या चाली दिल्या, तसेच क्षात्रगितांना क्षात्रवृत्ती जागृत करणार्‍या चाली दिल्या. [याविषयीचे सविस्तर विवेचन देवतांचा नामजप आणि उपासनाशास्त्र (३ भाग) आणि क्षात्रगीते या ध्वनी-चकत्यांमध्ये (ऑडिओ सीडीमध्ये) केले आहे.]

सध्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांमुळे होणार्‍या विकारांवर संगिताद्वारे उपचार करण्याविषयी, तसेच अक्षरांच्या योग्य उच्चारांसंदर्भात त्यांचे संशोधन चालू आहे. नृत्यातील विविध शारीरिक स्थिती आणि मुद्रा यांविषयीही आध्यात्मिक संशोधन चालू आहे.

तज्ञ, अभ्यासू आणि शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना,
तसेच वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निवासस्थान असलेली वास्तू, म्हणजे रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात होणारे दैवी पालट (उदा. लाद्यांवर ॐ उमटणे), तसेच वाईट शक्तींचे तोंडवळे उमटणे यांचे वैज्ञानिक पद्धतीने संशोधन केले जात आहे. संतांच्या वास्तूमध्ये होणार्‍या पालटांमागील कोणती वैज्ञानिक प्रक्रिया घडते ? या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू. – व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (संपर्क : श्री. रूपेश रेडकर, ई-मेल : [email protected])