ईश्वराचे समष्टी कार्य दर्शवणारी चित्रे (भाग २)

३. द्रौपदीच्या स्थितीमध्ये असलेल्या हिंदू महिलांचे रक्षण केवळ भगवान श्रीकृष्णच करू शकणे

balak_bhav_2_C8_c

‘मी उद्या सकाळी भारतात येण्यासाठी निघत आहे. मी अमेरिकेत असतांना प.पू. डॉक्टरांनी बालकभावाची चित्रे काढण्यासाठी मला प्रेरणा देऊन माझा भाव जागृत केला, माझ्याकडून चित्रे काढून घेतली आणि मला आनंदात ठेवले, तसेच मला सातत्याने सत्संग आणि सत्सेवेमध्ये ठेवले यासाठी मी त्यांच्या चरणकमलांप्रती कृतज्ञ आहे. त्यांनी एका प्रेमळ आईप्रमाणे माझी काळजी घेतली. त्यांनी मला येथे ‘मी रामनाथी आश्रमातच आहे’, अशा भावस्थितीत ठेवले. वास्तविक रामनाथी आश्रमातून दिसतो, तसाच हिरवागार पर्वत मला माझ्या खिडकीतूनही दिसत होता.

३ अ. चित्र काढण्यामागील पार्श्वभूमी

‘पाकिस्तानमध्ये ‘एकतर इस्लाम धर्म स्वीकारा अन्यथा तुमच्या मुलीवर बलात्कार करण्यात येईल’, अशा प्रकारच्या धमक्या देऊन हिंदु कुटुंबियांना घाबरवण्यात येत होते,’ हे वृत्त वाचून मला पुष्कळ काळजी वाटली आणि ‘लवकरात लवकर ‘हिंदू राष्ट्रा’ची स्थापना करा’, या प.पू. डॉक्टरांच्या वाक्याची मला आठवण झाली. ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना केवळ भगवान श्रीकृष्णच करू शकतो. भावनेच्या स्तरावर केवळ शोक करत (रडत) बसण्यापेक्षा आपण भगवान श्रीकृष्णाचे भक्त होण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. भगवंताचे आपल्या भक्ताला वचन आहे, ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ म्हणजे ‘माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही.’ ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना झाली की, हिंदु महिलांना हात लावण्याचे धाडस कोणीही करणार नाही. तसे केल्यास त्यांना सर्वसत्ताधारी अशा ‘हिंदू राष्ट्रा’च्या क्रोधाला सामोरे जावे लागेल.

३ आ. चित्राचा भावार्थ

बालकभावाच्या या चित्रात द्रौपदीप्रमाणे संपूर्ण शरणागतभावाच्या स्थितीत असलेल्या हिंदू महिलांच्या रक्षणासाठी, त्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण येत आहे, असे दाखवले आहे. निरनिराळ्या रंगसंगती असलेल्या सात्त्विक साड्यांचा न संपणारा प्रवाह भगवान श्रीकृष्ण पुरवत आहे. ‘आध्यात्मिकदृष्ट्या कपडे कसे असावेत ?’ या ग्रंथामधून हे चित्र रंगवण्याची प्रेरणा मिळाली.’

– सौ. उमा रविचंद्रन्, चैन्नई (४.१२.२०१२)

३ इ. चित्राचे वैशिष्ट्य

‘कृष्णाविण नाही दुजा आधार, सारे जग निराधार ।

तोचि एक स्त्रीधनाचा असे तारणहार ।। १ ।।
चंचू टोचूनी चिमणीला घायाळ करी क्रूर घार ।
रक्षण्या धावूनी आला विष्णु गरुडावर होऊनी सवार ।। २ ।।’

‘शरणागत जो माझा भक्त त्याचा योगक्षेम मी वहातो’, या भगवंताच्या वचनाची प्रचीती द्रौपदीच्या वस्त्रहरणप्रसंगी श्रीकृष्णाने केलेल्या चमत्कारातून मिळते.’ – (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १८.७.२०१३, रात्री १०.५०)

‘युगांचा क्रम हा ‘सत्ययुग ते कलियुग’ असा आहे, म्हणजेच सत्ययुग ते त्रेतायुग, त्रेतायुग ते द्वापरयुग आणि द्वापरयुग ते कलियुग अशी युगांची अधोगती होत जाते. सध्याच्या संक्रमणाच्या कालावधीत (संधी-काळात) ‘कलियुग ते कलियुगांतर्गत सत्य-युग’, अशी एकदम झेप घेतली जाणार आहे. २०१२ आणि २०१३ या वर्षांच्या ‘सनातन पंचांगा’च्या मुखचित्रावरही ‘कलियुग ते कलियुगांतर्गत सत्ययुग’ असे होणारे संक्रमण दर्शवले आहे.

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग २) (धर्मसंदेश देणारी श्रीकृष्णाची चित्रे अनुभूतींसह)’

Leave a Comment