बालसाधिकेच्या श्रीकृष्णाबद्दलच्या उत्कट प्रेमभावाचे रेखाटलेले भावचित्र

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी
बालसाधिकेच्या श्रीकृष्णाबद्दलच्या उत्कट प्रेमभावाचे रेखाटलेले भावचित्र

krushna7

१. बालसाधिका श्रीकृष्णाच्या विचारांत दंग असतांना तिला श्रीकृष्णाला मिठी मारण्याची उत्कट इच्छा होते.

२. तिचे वागणे नम्र, भावपूर्ण, निरपेक्ष आणि श्रीकृष्णाच्या इच्छेनुसार आहे. तिने श्रीकृष्णाच्या चरणांना मिठी मारल्यावर तिच्या स्पर्शातून श्रीकृष्णाला तिचे प्रेम आणि तळमळ जाणवते.

३. त्याने तिला उचलून जवळ धरल्यावर तिला लाजल्यासारखे होते आणि तिच्यातील नम्रता अन् प्रगल्भता यांमुळे त्याच्या गालाला स्पर्श करण्याचा तिला संकोच वाटतो.

४. त्यानंतर श्रीकृष्णाच्या डोळ्यांतील प्रेमभाव समजून ती त्याच्या गालाला टेकून त्याला मिठी मारते. तिचा निरपेक्ष प्रेमभाव पाहून श्रीकृष्णाला आनंद होतो.

– (पू.) सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (१५.८.२०१३)

श्रीकृष्णासाठी हार बनवणार्‍या गोपींचे काढलेले भावचित्र

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी
श्रीकृष्णासाठी हार बनवणार्‍या गोपींचे काढलेले भावचित्र

krushna8

१. चित्र काढण्यामागील पार्श्‍वभूमी – आश्रमातील गोपींचे निरीक्षण केल्यावर त्या सतत श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असल्याचे लक्षात येणे आणि त्यांचे चित्र काढावेसे वाटणे

१५.८.२०१३ या दिवशी मी आश्रमातील गोपींचे (कु. तृप्ती गावडे, कु. दीपाली मतकर आणि कु. वृषाली कुंभार यांचे) निरीक्षण करत होते. श्रीकृष्ण सर्व विश्‍वव्यापी आहे, असा भाव असल्यामुळे त्यांच्या कृतीही भावपूर्ण होतात. त्या सतत श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असतात आणि त्याच्या नामाचे मंडल करून त्यात रहातात. त्यानंतर मला गोपींविषयी चित्र काढावेसे वाटले. तेव्हा मला भावविभोर झालेल्या छोट्या गोपी श्रीकृष्णासाठी हार बनवायला फुले शोधत असल्याचे दृश्य दिसले.

२. श्रीकृष्णासाठी हार बनवून तो भक्तीभावाने त्याच्या गळ्यात घालणार्‍या गोपी !

अ. त्या गोपी एवढ्या लहान होत्या की, त्यांना झाडाची फुले तोडायला आणि ती फुले हार बनवत बसलेल्या गोपींपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांना पुष्कळ प्रयत्न करावे लागत होते; मात्र त्या आनंदावस्थेत ही सेवा करत होत्या.

आ. ईश्‍वर परिपूर्ण असल्यामुळे त्याची सेवाही परिपूर्णच झाली पाहिजे, या भावामुळे हार बनवणार्‍या गोपी फुले आणणार्‍या गोपींकडे ताज्या फुलांची मागणी करत होत्या.

इ. त्यांच्या या भावपूर्ण कृतीमुळे तो हारही परिपूर्ण आणि टवटवीत वाटत होता.

ई. श्रीकृष्णासाठी हार बनवून तो त्याच्या गळ्यात घालणे, ही कृती भक्तीभावाचे प्रतीक आहे.

उ. हे चित्र काढतांना माझा भाव जागृत झाला आणि सूक्ष्मातून श्रीकृष्णाला हार अर्पण करतांना माझ्या अंतरात त्याच्याविषयीचा भक्तीभाव दाटून आला.

– (पू.) सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्. (२.२.२०१४)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment