परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडवणारी ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उमा रविचंद्रन यांनी रेखाटलेली भावचित्रे

umakka
सौ. उमा रविचंद्रन्

चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडते. त्यांनी त्या चित्रांचे विवरणही केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.

चतुर्भुज विष्णूने गर्भवास पत्करणे

चतुर्भुज श्री महाविष्णूने सौ. नलिनीदेवी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मातोश्री) यांच्या गर्भात तिसर्‍या मासात (महिन्यात) दिव्य ज्योतीच्या रूपात प्रवेश केला आणि श्री जयंत अवताराने त्याच्या दैवी कृपेला आरंभ केला. – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२४.४.२०१६)

१. श्री जयंत यांचा जन्म

‘६.५.१९४२ या दिवशी श्री जयंत यांचा जन्म झाला. सर्व देवता, ऋषि आणि त्रिमूर्ती त्यांना आशीर्वाद देत आहेत, किंबहुना ते या दैवी बालकाचे आशीर्वाद घेण्यासाठी जमलेे आहेत. भूदेवीला मुक्त करण्यासाठी ते अवतरले असल्याने ती आनंदी झाली आहे. या दैवी बालकाच्या स्मितहास्याने वातावरणात आनंद आणि चैतन्य यांची उधळण होत आहेे, तसेच साधू, संत अन् देवता यांचे हृदय पूर्ण धन्यतेने भरून गेले आहे. त्याच्या नाजूक पावलांच्या प्रत्येक लाथेने कानठळ्या बसवणार्‍या गडगडाटाचा आवाज वातावरणातील सूक्ष्म वाईट शक्तींच्या कानावर पडताच त्यांचा अंत जवळ आल्याची पूर्वसूचना मिळाल्याने ते भीतीने थरथरत आहेत.

२. सर्वार्थाने अलौकिक असलेला श्रीजयंत !

शालेय अभ्यास, लोकांशी संवाद साधणे, कुटुंब, मित्र, ग्रंथांचे लिखाण, अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या संपूर्ण आयुष्यभरात ते सर्वत: अलौकिक ठरले आहेत. ते जातील तिथे त्यांचा नायक म्हणून सहज स्वीकार होत असे. (या चित्रात छोट्या श्रीजयंताला केवळ स्वाभाविक नायक म्हणून न दर्शवता तो ब्रह्मांडनायक म्हणून दाखवण्यात आला आहे. नेत्याचे अनुयायी असतात, तर देवाचे भक्त असतात. लोहचुंबकाकडे खेचले जाणार्‍या लोखंडाप्रमाणे देवाकडे भक्त आकर्षिले जातात.

ध्वनी-चित्रीकरण सेवेचा प्रारंभ

श्री. दिनेश शिंदे यांच्यासमवेत बसून चित्रीकरण करतांना ध्वनी-चित्रीकरण सेवेचे बीज रोवले गेले. इतिहासात पहिल्यांदाच सर्व दैवी कृपा छायाचित्रकात (कॅमेर्‍यामध्ये) साठवून त्याचे संकलन येणार्‍या पिढ्यांसाठी निष्ठेने करण्यात आले. (पुष्कळ दूरदृष्टीने रोवलेल्या या बिजाचे रूपांतर आता महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा अविभाज्य अंग असलेल्या एका परिपूर्ण ध्वनी-चित्रीकरण कक्षात झाले आहे. येणार्‍या काळात या सेवेतून मिळालेल्या मार्गदर्शनाने अनेक साधकांचे रूपांतर संतांमध्ये होणार आहे.)

– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२४.४.२०१६)

वर्ष १९८७ मध्ये प.पू. बाबांची (प.पू. भक्तराज महाराज यांची) झालेली भेट

‘संत भक्तराज महाराज गुरु आणि देव यांची भजने म्हणत असत. अशाच एका सत्संगामध्ये श्री जयंत होते आणि सर्वज्ञ गुरूंनी भक्तांच्या गर्दीतून त्यांची स्वखुशीने निवड केली. (आदर्श गुरु शिष्य. शिवरायांवर गुरु आणि ईश्वर यांची कृपा होती. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या बळावर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तेेच कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले आज करत आहेत. हे अवतारी कार्य असल्याने त्याची व्यापकता अधिक आहे.)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात