स्नानानंतर करावयाच्या कृती आणि स्नानासंदर्भात निषिद्ध गोष्टी

प्रस्तूत लेखात आपण स्नानानंतर काय करावे, स्नानास निषिद्ध गोष्टी कोणत्या, ‘सन बाथ’ अपायकारक का; स्नान कोणी करू नये, तर खरे स्नान कोणते यांसारखी स्नानासंदर्भातील इतर सर्वसाधारण माहिती जाणून घेऊया.

स्नानानंतर करावयाच्या कृती

१. स्नानानंतर स्वतःभोवती मंडल घालावे.

१ अ. स्वतःभोवती मंडल घातल्यामुळे स्नानाने पार पाडलेल्या देहाच्या शुद्धीकरणप्रक्रियेत वाईट शक्तींचा हस्तक्षेप होणे टाळले जाणे

शास्त्र – ‘नामजप करत मिठाच्या पाण्याने स्नान केल्यानंतर पाण्याच्या साहाय्याने तेच तीर्थ समजून स्वतःभोवती पाण्याची धार गोलाकार फिरवून तीनदा मंडल घालावे. यामुळे स्नानाने पार पाडलेल्या देहाच्या शुद्धीकरणप्रक्रियेत वाईट शक्तींचा हस्तक्षेप होणे टाळले जाते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

२. कृतज्ञता व्यक्त करणे

स्नान झाल्यानंतर जलदेवतेच्या कृपेने शुचिर्भूत होण्याची संधी मिळाल्यामुळे तिच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी.

 

३. आचमन करणे

स्नानानंतर आचमन करावे. आचमनाने अंतर्शुद्धी होते.

४. अशा अनिष्ट गोष्टी टाळा !

४ अ. ‘सन बाथ’ (सूर्यप्रकाशाने स्नान) नको; त्यापेक्षा नामजप करत उन्हात बसा !

४ अ १. ‘सन बाथ’ (सूर्यप्रकाशाने स्नान) केल्यामुळे केवळ शारीरिक स्तरावर लाभ होणे, तर नामस्मरण करत सूर्यप्रकाशात बसल्यामुळे सूर्याकडून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता आणि चैतन्य जास्त प्रमाणात ग्रहण होऊन शारीरिक आणि आध्यात्मिक या दोन्ही स्तरांवर लाभ होणे

शास्त्र – ‘कोवळे ऊन शरिराला पोषक आणि लाभदायक असते; परंतु कोवळ्या उन्हात विवस्त्र होऊन स्नान (सन बाथ) केल्यामुळे वायूमंडलातील वासनामय वाईट शक्तींचे लिंगदेह स्नान करणार्‍या जिवाकडे आकृष्ट होऊन त्याला त्रास देण्याचा धोका जास्त असतो. सूर्याकडून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता आणि चैतन्य हे सूक्ष्म असल्यामुळे केवळ सूर्यप्रकाशात बसल्यामुळे ते ग्रहण करता येत नाही. त्यामुळे ‘सन बाथ’ केल्यामुळे केवळ शारीरिक स्तरावर लाभ होतो; परंतु आध्यात्मिक स्तरावर काहीच लाभ होत नाही. याउलट नामस्मरण करत सूर्यप्रकाशात बसल्यामुळे सूर्याकडून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता आणि चैतन्य जास्त प्रमाणात ग्रहण केले जाऊन आपल्याला शारीरिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही स्तरांवर लाभ होतो.’

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, रात्री ११.३०)

४ आ. स्नानगृह आणि शौचालय येथे जास्त काळ राहू नका !
४ आ १. स्नानगृह आणि शौचालय येथील वातावरण रज-तमप्रधान असल्याने तेथे जास्त वेळ घालवल्यामुळे व्यक्तीच्या सूक्ष्मदेहांतील रज-तम वाढून तिला त्रास होणे :

शास्त्र – ‘स्नानगृह म्हणजे देहशुद्धीचे एक ठिकाणच होय. स्नानगृहात देहाची शुद्धी होऊन देहावरील रज-तमप्रधान मळ स्नानाच्या पाण्याद्वारे निघून जातो. त्यामुळे स्नानगृहातील वातावरण रज-तमप्रधान असते. या ठिकाणी जास्त वेळ घालवल्यामुळे व्यक्तीच्या सूक्ष्मदेहांतील रज-तम वाढून तिला त्रास होऊ शकतो. ही सूत्रे शौचालयासाठीही लागू पडतात. त्यामुळे स्नानगृह आणि शौचालय या ठिकाणी जास्त काळ राहू नये.’ – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, रात्री ११.१४)

५. स्नान कोणी करू नये ?

अतीवृद्ध व्यक्तीने; ताप, अपचन, अतिसार, डोळे आणि कान दुखी, मज्जासंस्थेचे विकार यांनी पीडित असलेल्यांनी; दृष्टी अन् मुख यांचे रोग झालेल्यांनी; अतिशय भुकेलेल्यांनी; तसेच जेवल्यानंतरही स्नान करू नये.

६. खरे स्नान

६ अ. स्वतःचे शारीरिक आरोग्य चांगले रहाण्यासाठी मानव जेवढा आटापिटा करतो, त्यापेक्षा अधिक प्रयत्न त्याने स्वतःचे मन आणि बुद्धी यांना स्वच्छ आणि निर्मळ बनवण्यासाठी केले पाहिजेत. यालाच खर्‍या अर्थाने ‘स्नान करणे’, असे म्हणता येईल.

६ आ. ‘जिवाचा देह आणि अंतःकरण या घटकांतील मळरूपी विकार काढणार्‍या क्रियेला ‘स्नान’ असे म्हणतात; म्हणून ‘सतत साधना करणे’, हेच खरे स्नान होय.’

– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १६.४.२००७, सायं. ६.१३)

६ इ.

नोदकक्लिन्नगात्रस्तु स्नात इत्यभिधीयते ।
– महाभारत, पर्व १३, अध्याय १११, श्लोक ९

अर्थ : शरिराचे अवयव पाण्याने भिजले म्हणजे त्याला ‘स्नान केलेला’ म्हणत नाहीत. ज्याने इंद्रियनिग्रहरूपी जलाने स्नान केले, तो अंतर्बाह्य शुद्ध होय.

६ ई. ‘नाही निर्मळ मन । काय करील साबण ।।’ – संत तुकाराम महाराज

(येथे संतांनी आपल्याला सांगितलेले साधनेचे महत्त्वही लक्षात येते. – संकलक)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

Leave a Comment